पॅनिक अटॅक काही वेळा धोकादायक आणि अचानक उद्भवू शकतात.म्हणजेच केव्हाही त्याचा सामना करण्याची तयारी असायला हवी. तज्ज्ञांच्या मते पॅनिक अटॅकसाठी समुपदेशन आणि वैद्यकीय सहाय्य खूप महत्वाचे आहे, परंतु योगिक श्वासोच्छवासाचे तंत्र तुम्हाला पॅनिक अटॅक व्यवस्थापित करण्यास आणि त्यांचे परिणाम कमी करण्यास सक्षम करतात. पॅनिक अटॅक हे सहसा अचानक उद्भवतात आणि वैद्यकीय मदत लवकर उपलब्ध होईलच असे नाही. म्हणूनच अशा परिस्थितीवर नियंत्रण कसे ठेवायचे हे आपल्याला माहित असले पाहिजे.
पॅनिक अटॅक आलाय हे कसे ओळखायचे
जर्नल डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्सच्या मते, पॅनिक अटॅक ही अशी समस्या आहे जी भीतीच्या वेळी उद्भवते, नंतर काही मिनिटांत व्यक्तीला प्रचंड अस्वस्थ वाटू लागते. जेव्हा पॅनिक अटॅक येतो होतो तेव्हा पुढील लक्षणे दिसतात. पॅनिक अटॅकच्या वेळी, व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागते. त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वाढतात. त्यांना खूप घाम येतो आणि त्यांचे हात पाय थरथरू लागतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि घसा कोरडा होऊ लागतो. काहींना अस्वस्थ वाटून उलट्या आणि पोटदुखीचा त्रासही होतो. यावर कण्ट्रोल न मिळवल्यास व्यक्तीला चक्कर देखील येऊ शकते. पॅनिक अटॅक वाढल्यास व्यक्ती स्वतःलाही ओळखत नाही आणि त्यांना मरणाची भीती सतावू लागते.
पुढील उपाय केल्यास पॅनिक ऍटॅकमध्ये तात्काळ आराम मिळेल
जेव्हा तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागेल किंवा चक्कर आल्यासारखे वाटेल तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. नाकातून हळूहळू श्वास घ्या. त्यानंतर थोडा वेळ श्वास रोखून धरल्यानंतर हळू हळू श्वास सोडा आणि पुन्हा दीर्घ श्वास घ्या. तसेच तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात नकारात्मक विचार येण्यापासून रोखा. मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात प्रथम नकारात्मक विचार येऊ लागतात. त्या काळात स्वत:ला हाताळताना नकारात्मक विचार येण्यापासून रोखले पाहिजे. पॅनिक अटॅकची लक्षणे बघून इतर लोकांना वाटते की आता ती व्यक्ती बेशुद्ध होईल. पण पॅनिक अटॅकने ब्लड प्रेशर कमी झाल्यास किंवा वाढल्यास व्यक्ती बेशुद्ध पडण्याची शक्यता नसते. जेव्हा आपल्याला वाटते की आपण स्वतःवरील नियंत्रण गमावले आहे तेव्हा आपण जिथे आहोत तिथे आरामात बसायला हवे. बर्याच प्रकरणांमध्ये, लोक पॅनिक अटॅकला हृदयविकाराचा झटका मानतात आणि त्यांचा मृत्यू होईल अशी त्यांना भीती वाटते. पण घाबरू नका. पॅनिक अटॅकमध्ये मृत्यूची शक्यता नसते. अचानकपणे पॅनिक अटॅकचा त्रास झाल्यास पुढील गोष्टी करा.
दीर्घ श्वास घेणे
हायपरव्हेंटिलेट होणे हे पॅनिक अटॅकचे सामान्य लक्षण आहे. जेव्हा आपण फुफ्फुसातून जास्त कार्बन डायऑक्साइड काढून टाकतो आणि अधिक श्वास घेऊ लागतो तेव्हा हे उद्भवते.या प्रकारच्या श्वासोच्छवासामुळे आपली चिंता आणि असहायतेची भावना वाढते, ज्यामुळे मज्जासंस्था विस्कळीत होते. अशावेळी दीर्घश्वसन करा. आपल्या सभोवतालच्या गोष्टींवर आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. हा त्या क्षणी स्वतःला केंद्रित ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही पाहू शकता अशा पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, एखादी गोष्ट जिला तुम्ही स्पर्श करू शकता, एखादी गोष्ट जी तुम्ही ऐकू शकता, एखादी गोष्ट जिचा तुम्ही वास घेऊ शकता आणि एखादी गोष्ट जिची तुम्ही चव घेऊ शकता अशा पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला तुमच्या पाच इंद्रियांचा वापर करून वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, आणि तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यास मदत करते.
ज्या लोकांना पॅनिक अटॅकचा त्रास होत आहे त्यांनी प्राणायाम आणि योगाचा त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करावा.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक