ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
essential oil benefits

काय आहेत एसेन्शियल ऑईलचे उपयोग

एसेन्शियल ऑईल (Essential Oil) अर्थात झाडांपासून काढण्यात येणारा अर्क. अरोमाथेरपी, नैसर्गिक उपचार आणि अल्टरनेटिव्ह हेल्थ प्रॅक्टिसमध्ये याचा खूपच उपयोग करण्यात येतो. तसं तर एसेन्शियल ऑईलचे खूपच प्रकार असतात. पण याचे आरोग्यासाठी काय फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत. कोणते एसेन्शियल ऑईल कशासाठी उपयोगी ठरतात ते आपण पाहूया. 

लव्हेंडर एसेन्शियल ऑईल (Lavender Essential Oil)

Lavender Oil

लव्हेंडर ऑईल सर्वात प्रसिद्ध एसेन्शियल ऑईल आहे. याचा उपयोग अनिद्रा, एकाग्रतेची कमतरता, केसांची गळती यासारख्या समस्या असतील तर त्यासाठी करण्यात येतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, चेहरा अधिक उजळविण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरूमं कमी करण्यासाठी सहसा लव्हेंडर ऑईलचा वापर करण्यात येतो. यामुळे चेहऱ्याला झळाळी मिळते आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक राहण्यास मदत मिळते. 

निलगिरी एसेन्शियल ऑईल (Nilgiri Essential Oil)

Nilgiri oil

युकेलिप्टस तेल, निलगिरीच्या पानापासून प्राप्त करण्यात येते. निलगिरी तेलामध्ये असणारे अँटिमायक्रोबियल, किटकनाशक गुण हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. विशेषतः सर्दी अथवा खोकला झाला असल्यास, पाण्यात हे तेल मिक्स करून गरम पाण्याची वाफ घेतल्यास, सर्दी लवकर निघून जाण्यास मदत मिळते. तसंच संक्रमणाचे जीवजंतू निघून जाण्यास याचा अधिक फायदा होतो. 

ADVERTISEMENT

लेमन एसेन्शियल ऑईल (Lemon Essential Oil)

लेमन एसेन्शियल ऑईलमध्ये अँटिमायक्रोबियल आणि अँटिऑक्सिडंटंससारखे गुण आढळतात. याचा वापर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये अधिक प्रमाणात केला जातो. पचनक्रिया आणि डोकेदुखीच्या औषधांमध्ये याचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येतो. लेमन एसेन्शियल ऑईल हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठीही वापरू शकता. तुमच्या चेहऱ्याची त्वचा अधिक उजळविण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच जखम लवकर भरण्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

टी ट्री एसेन्शियल ऑईल (Tea Tree Essential Oil)

Tea tree oil

या तेलामध्ये अँटिमायक्रोबियल गुण अर्थात प्रमाण जास्त असते. यामध्ये अँटिइन्फ्लमेटरी गुणही आढळतात. तुमच्या शरीराला कोणत्याही ठिकाणी सूज असेल तर तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर करू शकता. विशेषतः एक्झिमा आणि सोरायसिसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

कॅमोमाईल एसेन्शियल ऑईल (Camomile Essential Oil)

कॅमोमाईल तेलाचा उपयोग हा प्राचीन काळापासून करण्यात येतो. यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी गुण आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जातात. एका अभ्यासानुसार, कॅमोमाईल तेल हे शरीरातील रासायनिक प्रक्रिया रोखण्यासाठी उपयुक्त असून आलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय पोटातील अल्सर रोखण्याचे कामही हे एसेन्शियल ऑईल अधिक चांगले करते. 

रोझ एसेन्शियल ऑईल (Rose Essential Oil)

गुलाबाच्या तेलामध्ये अनेक सायकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल, एनाल्जेसिक आणि अँटीएन्क्झायटी इफेक्ट्स आढळतात. तुम्हाला मूड स्विंग्ज होत असतील अथवा तुमचा मूड अधिक चांगला करायचा असेल आणि चिंता कमी करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

पेपरमिंट एसेन्शियल ऑईल (Peppermint Essential Oil)

पेपरमिंटमध्ये अँटिसेप्टिक, जीवाणूविरोधी, अँटिव्हायरल, अँटिस्पास्मोडिक, अँटिऑक्सिडंट, मायोरलॅक्सेंट, एनाल्जेसिक असे अनेक घटक आढळतात. पेपरमिंट एसेन्शियल ऑईलचा वापर एनर्जी वाढविण्यासाठी आणि पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी करता येतो. 
विविध एसेन्शियल ऑईलचा उपयोग सौंदर्याप्रमाणेच आरोग्यासाठीही करता येतो. काही जणांना केवळ याचा उपयोग सौंदर्यासाठीच वाटतो. पण असे अजिबात नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT