ADVERTISEMENT
home / आरोग्य
does-breast-cancer-affect-your-skin-and-hair

स्तनाचा कर्करोग तुमच्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम करतो का

अनेक शतकांपूर्वी कर्करोगाचा शोध लागला असूनही या आजारांवरच्या उपचारपद्धती अजूनही  प्रगत होत आहेत. स्तनाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी आणि रेडिएशन हे दोन सर्वात सामान्य उपचार आहेत. इतर कर्करोगाच्या उपचारांप्रमाणे स्तनाचा कर्करोग आणि त्याचे उपचार देखील त्वचेवर आणि केसांवर परिणाम करतात.

केमोथेरपी आणि रेडिएशन कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात आणि जवळच्या पेशींनाही कमकुवत करतात. त्यामुळे केस गळतात, त्वचेच्या पोतमध्ये व्यत्यय येतो. सर्वच रुग्णांना रेडिएशन थेरपीचा त्रास होतो असे नाही. कारण, तो स्थानिक उपचार आहे. परंतु केमोथेरपी संपूर्ण शरीरावर परिणाम करते. यातील बहुतांश बदल तात्पुरते आहेत परंतु त्यांच्याबद्दल जागरूक असणे आणि ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे. याबाबत डॉ. रिंकी कपूर, कॉस्मेटिक डमॉटोलॉजिट आणि डर्मेटो-सर्जन, एस्थेटिक क्लिनिक अँड फोर्टिस रहेजा हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले. 

अधिक वाचा – वेळीच निदान ही आहे कर्करोगावर मात करण्याची गुरुकिल्ली – तज्ज्ञांचे मत

· स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे प्रभावित क्षेत्राभोवती त्वचेमध्ये होणारे बदल. स्तन आणि स्तनाग्र क्षेत्राभोवती त्वचा संकुचित किंवा कोरडी दिसू शकते.

ADVERTISEMENT

· जर स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णाला शस्त्रक्रिया करावी लागली असेल, तर काही डाग किंवा चट्टे दिसू शकतात.

·  स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान तुमचे वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते आणि याचा परिणाम त्वचा आणि केसांच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.

·   केमोथेरपी आणि रेडिएशन मुळे केस पातळ होतात आणि केस गळतात जे अगदी सामान्य आणि तात्पुरते आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर काही महिने तुमचे केस परत वाढतील.

·   त्वचेची जळजळ आणि खाज सुटणे हे स्तनाच्या कर्करोगाचे सामान्य दुष्परिणाम आहेत.

ADVERTISEMENT

· रुग्णाला त्वचेवर लालसरपणा येणे, त्वचा सोलवटणे किंवा फोड येणे (सनबर्नसारखे) देखील दिसू शकते.

·  स्तन किंवा स्तनाग्र सुजलेले दिसू शकतात.

·  तुमचे नख गडद दिसू शकतात आणि सहज तुटू शकतात.

·  जर तुम्ही रेडिएशन थेरपी केली असेल तर उपचार क्षेत्रात फोड येणे अगदी सामान्य आहे. केमोथेरपीच्या 

ADVERTISEMENT

रूग्णांसाठी त्वचेवर पुरळ आणि अंगावर उठणा-या पित्ताच्या गाठी आढळतात.

अधिक वाचा – स्तनाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी ब्रेस्ट कन्झर्विंग शस्त्रक्रिया पर्या

शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांसाठी

ज्या स्त्रियांना स्तनाची शस्त्रक्रिया करावी लागते त्यांना बऱ्याचदा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान धोक्यात येऊ शकतो. हा कठीण काळ आहे आणि त्यांना या कठीण काळात कुटुंब आणि मित्रांच्या सर्व पाठिंब्याची गरज आहे. या टप्प्यात त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी मदत करू शकतात.

·  आपल्या त्वचेकरिता सौम्य उत्पादनांचा वापर करा. खराब झालेली त्वचा चोळण्याचा किंवा सोलण्याचा प्रयत्न करू नका

ADVERTISEMENT

· घट्ट कपडे घालणे टाळा

· आरामदायक आणि सूती अंतर्वस्त्राचा वापर करा.

· जर तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ करायची असेल तर मऊ सूती कापड, सौम्य साबण आणि कोमट पाण्याचा वापर करा.

· आपल्या सर्जनशी चर्चा केल्याशिवाय गरम आणि थंड कॉम्प्रेस वापरण्याचा प्रयत्न करू नका

ADVERTISEMENT

· जर तुम्हाला काही स्किन क्रीम किंवा मलम वापरून पाहायचे असतील तर ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

· तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी तीव्र सूर्यप्रकाशात जाणे टाळा. दररोज सनस्क्रीन, टोपी आणि सनग्लासेस वापरा. प्रभावित आणि उपचारित क्षेत्रे नेहमी उन्हापासून संरक्षित ठेवा.

अधिक वाचा – #WorldCancerDay – महिलांमध्ये वाढतोय स्तनांचा कर्करोग

·         जर खूप जास्त केस गळत असतील तर तुम्ही तुमचे केस लहान करू शकता किंवा तुमचे मुंडण करू शकता.

ADVERTISEMENT

·         केसांना विंचरण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर करा.

·         केसांना घट्ट बांधु नका

·         सौम्य शैम्पू आणि कंडिशनर वापरा

·         उन्हात जाण्यापूर्वी नेहमी आपले केस झाकून ठेवा

ADVERTISEMENT

·         त्वचा आणि केसांसाठी कोणतेही रासायनिक उत्पादने वापरणे टाळा जोपर्यंत तुमचे सर्जन ते ठीक करत नाही.

·         तुम्हाला हवे असल्यास नॉन-कॉमेडोजेनिक आणि हलका मेकअप वापरा.

·         त्वचेला नेहमी मॉइश्चरायझ्ड ठेवा

·         काही आठवड्यांच्या उपचारानंतर तुमची त्वचा चांगली वाटू लागेल पण त्वचा आणि केसांचा रंग पूर्वीपेक्षा वेगळा असू शकतो आणि लक्षात ठेवा की उपचारानंतरही तुम्हाला तुमच्या त्वचेची आणि केसांची खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT