ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
dont-make-these-common-mistakes-while-applying-turmeric-for-skin-in-marathi

चमकदार त्वचेसाठी हळद वापरताना करू नका या चुका

प्रत्येकाला वाटतं की, आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी, त्वचेवर कोणतेही डाग नसावेत आणि कायम तजेलदार दिसावी. यासाठी अनेकदा हजारो रूपयांचा खर्च करण्यासाठीही महिला तयार असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? यासाठी लागणाऱ्या उत्पादनांचा सतत वापर करून तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक निघून जाते आणि मग तुमचा चेहरा अधिक निस्तेज दिसू लागतो. त्यापेक्षा तुम्ही घरगुती उपचार केले, तर तुम्हाला याचा परिणाम मिळविण्यासाठी वेळ लागतो. मात्र तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज कायम टिकून राहाते. यामध्ये अनेकदा हळदीचा वापर करण्यात येतो. हळद केवळ खाण्यातच स्वाद वाढवत नाही तर हळदीचा वापर उटण्यामध्ये करून सौंदर्यामध्येही भर घालण्यात येते. लग्नातही हळद लाऊन नवरीचे तेज वाढविण्यात येते. हळदीचे सौंदर्यासाठी अनेक फायदे (Turmeric Benefits For Glowing Skin) आहेत. अनेकदा घरगुती स्किन केअरमध्ये आणि नितळ त्वचा हवी असेल तर हळदीचा वापर करण्यात येतो. यामध्ये नैसर्गिक घटक असून याचा त्वचेला फायदा मिळतो. अँटीएजिंग फेसपॅक (Anti Aging Face Pack) म्हणून याचा वापर करण्यात येतो. पण हळदीचा वापर (Turmeric Use) नक्की कसा याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही चमकदार त्वचेसाठी हळद वापरत (Turmeric Use For Glowing Skin) असाल तर तुम्हाला त्याचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत असायला हवे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम त्वचेवर होताना दिसतात. हळदीचा वापर तुमच्या त्वचेवर करण्यापूर्वी तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात. 

हळद मिक्स करताना चुकीचे पदार्थ वापरू नका 

हळद हे त्वचेसाठी उत्तम मानले जाते. मात्र यासह कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे हे तुम्हाला माहीत असायला हवे. बरेचदा हळदीमध्ये गुलाबपाणी, दूध आणि पाणी मिक्स करण्यात येते. मात्र त्यासह कोणतेही वेगळे पदार्थ मिक्स करू नका. याचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो. बेसन, हळद, उटणे, मध, गुलाबपाणी या घटकांचा वापर तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम ठरू शकतो. याव्यतिरिक्त हळदीसह कोणतेही अन्य पदार्थ तुम्ही मिक्स करू नका. 

अधिक काळ हळद लाऊन ठेऊ नका 

हळद लावल्यानंतर बरेचदा चेहऱ्यावर हळदीचा पिवळा रंग चढतो. त्यामुळे तुम्ही हळद लावल्यानंतर तुम्ही ती किती वेळ लाऊन ठेवत आहात, याकडे लक्ष द्या. तुम्ही जर अधिक काळ हळदीचा फेसपॅक लावलात तर तुमचा चेहरा पिवळा दिसू शकतो. त्यामुळे फेसपॅक सुकल्यानंतर त्वरीत पाण्याने स्वच्छ धुवा आणि चेहरा मॉईस्चराईज करायला विसरू नका. अधिक काळ हळद लाऊन ठेऊ नका. 

साबणाचा वापर करू नका 

बरेचदा हळद लावल्यावर चेहरा धुताना साबणाचा वापर करण्यात येतो. मात्र असं अजिबात करू नका. हळदीच्या फेसपॅकचा परिणाम हा चेहऱ्यावर साधारण 24 तासाने दिसायला लागतो. त्यामुळे तुम्ही साबण लावल्यास, चेहरा काळा पडण्याची शक्यता असते. याशिवाय साबण लावल्यास, चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक निघून जाते. त्यामुळे हळदीचा फेसपॅक लावल्यानंतर साबण लावण्याची चूक सहसा करू नका. केवळ स्वच्छ पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवा. 

ADVERTISEMENT

चेहरा धुताना गरम पाणी वापरू नका 

हळद लावल्यावर गरम पाण्याने चेहरा धुणे हे चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे हळद काढण्यासाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करावा. तसंच हळद चेहऱ्यावर राहू देऊ नका. संपूर्णतः निघून जाईल अशा पद्धतीनेच तुम्ही चेहरा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय पाण्याने चेहरा धुतल्यावर कोरडा करा आणि त्यावर मॉईस्चराईजर क्रिम लावायला  विसरू नका. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहणार नाही हे लक्षात ठेवा. 

या काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचा चेहरा हळद लावल्यावर चमकदार राहू शकतो. याचा दुष्परिणाम चेहऱ्यावर होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT