सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त गरमागरम आणि कुरकुरीत डोसा खायला कोणाला नाही आवडणार. डोसा, इडली हे पदार्थ अनेकांचे फेव्हरेट असू शकतात. एकतर हे साऊथ इंडियन पदार्थ सहज उपलब्ध असतात शिवाय चवीला बेस्ट असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये डोसा असतोच.नाश्त्यासाठी तुम्ही या निरनिराळ्या प्रकारच्या डोसा रेसिपीज ट्राय करू शकता. पण जर तुम्हाला घरी हॉटेलप्रमाणे क्रिस्पी आणि चविष्ट डोसा बनवायचा असेल तर थोडी मेहनत नक्कीच घ्यावी लागते. काही चुका टाळल्या तुम्ही घरीच कुरकुरीत डोसा बनवू शकता.
कुरकुरीत डोसा बनवताना टाळा या चुका
घरी डोसा बनवणं खूप सोपं आहे. एकदा तुमचं बॅटर परफेक्ट असेल तर डोसा बनवणं अगदी सोपं आहे. मात्र बॅटर योग्य असूनही कधी कधी तुमचा डोसा कुरकुरीत होत नाही. याच्यामागे काही चुका कारणीभूत असू शकतात. यासाठी या चुका टाळा आणि बनवा घरीच क्रिस्पी डोसा
तवा गरम नसणे
डोसा कुरकुरीत होण्यासाठी तवा परफेक्ट गरम असणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही गॅस ऑन करतात लगेच तव्यावर बॅटर पसरवलं तर बॅटर चांगलं असूनही तुमचा डोसा कुरकुरीत होत नाही. तवा गरम नसल्यामुळे बॅटर तव्यावर चिकटतं आणि डोसा निघत नाही. यासाठी आधी तवा व्यवस्थित गरम करा. तवा गरम आहे का हे पाहण्यासाठी डोसा बॅटर टाकण्याआधी तव्यावर थोडं थंड पाणी शिंपडा. असं केल्यामुळे तुम्हाला तवा कितपत गरम झालाय याचा अंदाज येईल. तुम्हालाही आवडतात आप्पे तर बनवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने (Appe Recipes In Marathi)
तव्याला तेल न लावणे
डोसा करताना ही एक छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते. आजकाल नॉन स्टिक तवे मिळतात. पण जर तुम्ही तो तवा वापरत नसाल तर तुम्हाला तवा ग्रीस करणं गरजेचं आहे. वास्तविक डोशासाठी जास्त तेल लागत नाही. त्यामुळे फक्त डोसा चिकटणार नाही इतपत थेंबभर तेल तुम्ही डोसा करण्याआधी तव्याला लावायला हवं. तुम्ही कांदा, नारळाची किशी अथवा टीश्यू पेपरने ते तेल तव्यावर पसरवू शकता. ज्यामुळे तुमचा डोसा परफेक्ट होईल.
बॅटर न आंबवणे
कधी कधी बॅटर चांगलं तयार झालं नाही तरी तुमचा डोसा बिघडू शकतो. यासाठी डोशाचं बॅटर चांगल्या पद्धतीने होणे गरजेचं आहे. जर तुमचं बॅटर व्यवस्थित आंबवलेलं असेल तर डोसा टाकताच छोटी छोटी छिद्रे डोशाला पडतात. याचा अर्थ बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. असा डोसा छान कुरकुरीत होतो आणि तव्याला चिकटत नाही.Idli Recipe In Marathi | जाणून घ्या लुसलुशीत इडली कशी बनवतात
बॅटरची कन्सिस्टंसी
डोसा बॅटर तयार केल्यावर ते तव्यावर पसरण्यापूर्वी तुम्ही बॅटरची कन्सिस्टंसी तपासणं गरजेचं आहे. कारण जर ते जास्त पातळ अथवा जास्त घट्ट असेल तरी तुमचा डोसा बिघडू शकतो. यासाठी आधी ते कितपत पातळ आहे हे तपासा आणि मगच डोसा करायला घ्या. ज्यामुळे तुमचे डोसे तव्यावरून पटापट निघतील.
चुकीचा तवा वापरणे
डोशासाठी खास तवा आजकाल बाजारात मिळतो. ज्यामध्ये नॉन स्टिक आणि बिडाचे तवे असतात. या व्यतिरिक्त तुम्ही इतर प्रकारची साधनं डोसा बनवण्यासाठी वापरली तर कदाचित तुम्हाला डोसा करताना त्रास होऊ शकतो. यासाठी डोशाचा तवाच वापरा ज्यामुळे तुमचे डोसे क्रिस्पी होतील.