ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा 2022 | Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे नाव माहीत नाही असा माणूस नक्कीच नाही. 14 एप्रिल हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. देशाच्या संविधानाला ज्या व्यक्तीने जन्म दिला आणि ज्या व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. गोरगरिबांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येकाला स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी झटलेला हा माणूस अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित करून अस्पृश्यांना समस्याच्या दरीतून बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांचे प्रेरणादायी आणि महान विचार (Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi) आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार (Babasaheb Ambedkar Quotes In Marathi) आपल्याला सर्वांनाच आयुष्यात प्रेरणादायी ठरतात. स्वतःचा विकास करून घेण्यासाठी सहकार्य करतात. भीम जयंती (Bhim Jayanti Quotes In Marathi) लवकरच येत आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी काही स्टेटस आणि मेसेज (Ambedkar Jayanti Status In Marathi) आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो
Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला एक वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले. 14 एप्रिलला आंबेडकर यांची जयंती असते. या निमित्ताने त्यांचे काही महत्वाचे कोट्स आपण जाणून घेऊया. 

 • माणसाला दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसाकरिता आहे 
 • तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे – आंबेडकर 
 • जो तो परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महत्पदाला चढतो 
 • समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही 
 • मी अशा धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो – आंबेडकर 
 • माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी 
 • जेथे एकता तेथेच सुरक्षितता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही 
 • आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग – डॉ. आंबेडकर

वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर शायरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

 • शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!
 • बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी धैर्य असले पाहिजे 
 • स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा
 • स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • सेवा जवळून, आदर आतून आणि ज्ञान आतून असावे 
 • काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका – आंबेडकर 
 • जे खरे आहे तेच बोलावे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
 • जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो
 • शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे – डॉ. आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धन | Dr. Ambedkar Jayanti Wishes In Marathi

बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो | Dr. Babasaheb Ambedkar Suvichar In Marathi
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानले जाते. डॉ. आंबेडकरांची माहिती आणि त्यांची महती आपल्या सर्वांना ज्ञात आहेच त्यांचे विचार हे आपल्या आयुष्याला एक उत्तम दिशा देतात. असेच काही ठराविक सुविचार खास तुमच्यासाठी 

ADVERTISEMENT
 • पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.
 • जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
 • आपल्याला कमीपणा येईल असा पोषख करू नका 
 • पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
 • आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे? आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.
 • शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 • उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
 • एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
 • आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.

भीम जयंती कोट्स मराठीमध्ये | Bhim Jayanti Quotes In Marathi

Bhim Jayanti Quotes In Marathi | babasaheb ambedkar images with quotes
Bhim Jayanti Quotes In Marathi

भीम जयंती ही प्रत्येकासाठी खूपच महत्वाची असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या दिवशी जन्म झाला. आंबेडकरांना भीम नावानेही ओळखले जाते.  भीम जयंती कोट्स (Bhim Jayanti Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी. 

 • बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
 • शील, करूणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • कोणत्याही समजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते
 • एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
 • तिरस्कार माणसाचा नाश करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा!
 • लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत. –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात. स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. (ambedkar jayanti wishes in marathi)
 • मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते – बाबासाहेब आंबेडकर
 • दुसऱ्याच्या सुखदुखाःत भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे 
 • तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार | Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

 • समता, स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो 
 • देवावर भरवसा ठेऊ नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • धर्म हा जर कार्यवाहित राहायवचा असेल तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय – डॉ. आंबेडकर  
 • धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे
 • प्रत्येक पिढी हे नवे राष्ट्र घडवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 • बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकारच्या राशी प्रेमाने वितळतात
 • बुद्ध हेच खरे विचारवंत होते, त्यांच्यासारखा थोर विचारवंत. अजूनपर्यंत जगात झालाच नाही. 
 • बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका
 • भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात
 • पती – पत्नीमधील नाते हे मित्राप्रमाणे असायला हवे

आंबेडकर जयंती स्टेटस मराठीमध्ये | Ambedkar Jayanti Status In Marathi

Ambedkar Jayanti Status In Marathi | babasaheb ambedkar images with quotes

Ambedkar Jayanti Status In Marathi

आंबेडकर जयंती स्टेटस आता आपण आपल्या मोबाईलवरही ठेऊ शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की, आपल्या महामानवाचे विचार इतरांपर्यंतही पोहचायला हवेत तेव्हा आपण आपल्या मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेऊ शकतो. 

 • अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
 • रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही 
 • अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो
 • मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती वा स्वास्थ्यापेक्षा अधिक असते – आंबेडकर 
 • माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल
 • माणसू कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्याइतकी स्वतःलामोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. 
 • मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो
 • लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • वाचाल तर वाचाल – आंबेडकर

१४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठी | Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

 • विज्ञान आणि धर्म या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की, धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे. 
 • शंका काढण्यासदेखील ज्ञान लागते 
 • शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा – डॉ. आंबेडकर
 • शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील 
 • सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततःही भारतीय आहोत ही भूमिका घ्यावी  
 • स्त्री जात समाजाचा अलंकार आहे
 • साऱ्या देशाला एकाच भाषेत बोलायला शिकवा, मग बघा काय चमत्कार घडतो ते 
 • हिंसा ही वाईट गोष्ट आहे. पण गुलामी ही त्याहीपेक्षा वाईट गोष्ट आहे – डॉ. आंबेडकर 
 • लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसामाणसांत भेद मानणारी संस्कृती
 • तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मेसेज | Dr Bhim Jayanti Messages In Marathi

Dr Bhim Jayanti Messages In Marathi | babasaheb ambedkar images with quotes
Dr Bhim Jayanti Messages In Marathi

आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काही मेसेज मराठीमध्ये तुम्ही पाठवू शकता. असेच काही जयंतीच्या शुभेच्छा देणारे मेसेज खास तुमच्यासाठी 

ADVERTISEMENT
 • जीवन लांब नाही तर महान असायला हवे 
 • एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 • जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेन. 
 • ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 • तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हा. पृथ्वीसारखे परप्रकाशित होऊ नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर विचारावर नक्की चाला. 
 • द्वेषाला सहानुभूतीने आणि निष्कपटाने जिंका 
 • यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक  आहे.
 • ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.
 • लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा
 • आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग?

वाचा – प्रेरणात्मक कोट्स करतील आयुष्यात अधिक प्रेरित

डॉ. आंबेडकर जयंतीच्या मराठीत शुभेच्छा | Ambedkar Jayanti Wishes In Marathi

 • एखादा प्रियकर ज्याप्रमाणे प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे. बाबासाहेबांप्रमाणेच पुस्तकांवर प्रेम करा आणि करा ज्ञान प्राप्त 
 • ग्रंथ हेच गुरू 
 • इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
 • करूणेशिवाय विद्या बाळगणारा हा कसाई असतो 
 • कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.
 • या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त घेऊ शिक्षणाचा वसा. चालवू शिक्षणाचा वारसा 
 • अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
 • आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे 
 • चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अण्णाभाऊ साठे शायरी

डॉ. बाबासाहेब जयंतीच्या शुभेच्छा | Dr Bhim Jayanti Wishes In Marathi

Dr Bhim Jayanti Wishes In Marathi | babasaheb ambedkar images with quotes

Dr Bhim Jayanti Wishes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीच साजरी केली जाते. या जयंतीसाठी खास शुभेच्छा. मराठीमध्ये द्या आप्तेष्टांना शुभेच्छा!

ADVERTISEMENT
 • सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
  तुम्ही येणार म्हटल्यान
  नसानसांत भरली स्फूर्ती 
  आतुरता फक्त आगमनाची
  जयंती माझ्या बाबांची.
  #जय भीम
 • राजा येतोय संविधानाचा 
  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
  सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
 • निळ्या रक्ताची धमक बघ
  स्वाभिमानाची आग आहे,
  घाबरू नको कुणाच्या बापाला 
  तू भीमाचा वाघ आहे…..
  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
  दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
  कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला 
  ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला
 • माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
  मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सूर्यही छोटे
  जयंतीच्या शुभेच्छा!
 • हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
  वेग होता…
  अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा 
  इरादा नेक होता….!
  असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
  लाखात नाहीतर तर जगात एक होता..
 • मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
  तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
  तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
  तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
  खरे महामानव होते
  महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा!
 • जगातला असा एकमेव विद्यार्थी 
  ज्यांचा शाळेचा पहिला दिवस 
  ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
  अशा महान “विद्यार्थीची” जयंती
  आहे.
  #भीमजयंती
 • डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
  रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
  मग मी वाचत असतो ,
  ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
  थेट काळजामध्ये पेटते.
  अशा महामानवाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 • दगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,
  माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
  हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
  पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
  आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
  तर आई शपथ ,फक्त आणि फक्त 
  जय भीमवालाच होईल
  महामानवाला मानाचा मुजरा!

हेही वाचा –

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी कोट्स
सावरकरांचे विचार सावरकरांच्या जयंतीनिमित्त
महात्मा ज्योतिबा फुले
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
बुद्ध पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा
लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार
Gautam Buddha Quotes On Life In Marathi

13 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT