ADVERTISEMENT
home / आरोग्य
benefits of black tea

कॉफीऐवजी प्या ब्लॅक टी, होतील भरपूर फायदे  

वर्षानुवर्षे दिवसाची सुरुवात कॉफीने करण्याची सवय असल्यास अचानक एक दिवस उठून कॉफी सोडणे सोपे काम नाही. जेव्हा तुम्हाला त्या सकाळच्या कॅफीन किकची गरज असते तेव्हा कॉफी सोडल्याचे विथड्रॉअल सिम्प्टम्स तुम्हाला त्रास देऊ शकतात. कॉफीचे काही अनिष्ट दुष्परिणाम आहेत त्यामुळे तुम्ही जर कॉफी सोडण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम निर्णय आहे. कॉफी सोडून तुम्ही ब्लॅक टी घ्यायला सुरुवात केली तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हाला जाणवतील. परंतु तुम्ही स्विच करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

कॉफी सोडून चहा का प्यायला हवा 

कॉफी प्यायल्याने कॅफीन मिळते, त्यामुळे जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यास शरीरात जास्त प्रमाणात कॅफीन जाते.  जास्त कॉफी प्यायल्याने तुमच्याकडे असणारी जास्तीची उर्जा तुम्हाला नियंत्रण करणे कठीण होते. तसेच भरपूर प्रमाणात कॉफी पिणाऱ्यांना तब्येतीची इतर लक्षणे देखील जाणवू शकतात. कॉफीमुळे ऍसिडिटी ट्रिगर होऊ शकते. तसेच ऍसिड रिफ्लक्स आणि IBS (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) चा त्रास होऊ शकतो. तुमच्या कॉफीच्या सवयीमुळे स्नायूंना दुखापत होऊ शकते आणि काही वेळेला रक्तदाबातही वाढ होऊ शकते. जर तुम्ही सहसा तुमची कॉफी भरपूर साखर आणि दूध घालून प्यायली तर , ते तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीसाठीही चांगले नाही.कॉफीप्रमाणेच चहा हा देखील कॅफिनचा स्रोत आहे. परंतु कॉफीप्रमाणे चहाचे इतके तीव्र साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कॉफी सोडून ब्लॅक टी घेणे सुरु शकता. कॉफीपेक्षा ब्लॅक टी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. 

आतड्याच्या आरोग्यासाठी चांगला 

काळा चहा हा आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.काळ्या चहामध्ये आढळणारे प्रतिजैविक गुणधर्म आतड्यांतील मायक्रोबायोममध्ये आढळणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करतात. ज्यामुळे तुमच्या आतड्यांवर सकारात्मक परिणाम होतो. काळ्या चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने, ते फ्री रॅडिकल्सच्या प्रभावामुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानापासून तुमचे संरक्षण करू शकते. फ्री रॅडिकल्स ही एक प्रकारची संयुगे आहेत ज्यामुळे हृदयरोगापासून कर्करोगापर्यंत अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.. इतकेच नाही तर अकाली वृद्धत्वासाठी देखील फ्री रॅडिकल्स कारणीभूत असतात. त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि निस्तेज त्वचेसाठी फ्री रॅडिकल्स कारणीभूत असतात. मोठ्या संख्येत फ्री रॅडिकल्स असले की पेशींवर ऑक्सिडेटिव्ह तणाव होतो. हा ऑक्सिडेटिव्ह ताण पेशी आणि सेल्युलर प्रक्रियांचे नुकसान करतो. काळ्या चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे कॉफीमध्ये नसतात. तसेच चहामध्ये पॉलिफेनॉल, टॅनिन आणि कॅटेचिन असतात ज्यांचे अनेक फायदे आहेत.

मेंदूच्या आरोग्यासाठी चांगला काळा चहा 

ब्लॅक टी मेंदूसाठीही खूप चांगला मानला जातो. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या न्यूरोलॉजिकल रोगांच्या प्रतिबंधाशी त्याचा जवळचा संबंध आहे. जे लोक नियमितपणे काळ्या चहाचे सेवन करतात त्यांच्या मेंदूची झीज कमी होते असे अभ्यासात आढळले आहे. अमेरिकन क्लिनिकल फायटोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात 32 व्यक्तींवर काळ्या चहाच्या सेवनाचे परिणाम तपासले गेले. संशोधकांना आढळले की काळ्या चहामुळे संज्ञानात्मक कमजोरी कमी होण्यास मदत होते. काळ्या चहाचे सेवन करणाऱ्या सहभागींनी जलद प्रतिसाद आणि चांगली स्मरणशक्ती दाखवली.

ADVERTISEMENT

काळ्या चहाने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते  

काळा चहा पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काळ्या चहाने अन्नपचन सुधारते, पोट खराब होणे, मळमळणे  हे त्रास कमी करण्यास मदत होते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की चहा आतड्यांतील निरोगी बॅक्टेरियाला प्रोत्साहन देतो आणि साल्मोनेला आणि पोटात अल्सर निर्माण करणारे वाईट बॅक्टेरिया काढून  टाकतो.इतकेच नाही तर काळ्या चहामध्ये अतिसारविरोधी गुणधर्म देखील असतात जे अतिसारावर उपचार करण्यास मदत करतात.

म्हणूनच कॉफी सोडा आणि काळा चहा घेण्यास सुरुवात करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

02 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT