ADVERTISEMENT
home / आरोग्य
drinking cold water after workout

व्यायाम केल्यानंतर लगेच थंडगार पाणी पिऊ नका, होतील आरोग्याच्या तक्रारी

सध्या उन्हाची काहिली प्रचंड वाढली आहे. अशा तीव्र उन्हाळ्यात भूक न लागता सतत तहान लागते आणि सतत पाणी प्यावेसे वाटते. काही मेहनतीचे काम केले किंवा बाहेरून आल्यावर आपण घामाझोकळ झालेलो असतो. अशा वेळी आपल्याला थंडगार पाणी प्यावेसे वाटते. कारण कोमट झालेल्या रूम टेम्परेचरच्या साध्या पाण्याने आपली तहान जाणार नाही आणि पाणी प्यायल्याने समाधान होणार नाही असे आपल्याला वाटते. त्यात जर माठातील वाळा घातलेले पाणी प्यायला मिळाले तर ते त्याक्षणी अमृतासारखे वाटते. वाढत्या उन्हात लोक अनेकदा फ्रिजचे थंड पाणी पिणे पसंत करतात. थंड पाणी प्यायल्याने शरीर खूप थंड होते. खास करून व्यायाम केल्यावर आपल्याला भरपूर घाम येतो आणि तेव्हा तहान शमवण्यासाठी आपल्याला थंडगार बर्फाचे पाणी (Drinking Chilled Water After Workout) प्यावेसे वाटते. पण व्यायामानंतर लगेच  थंड पाणी प्यावे का, ते आपल्या शरीरासाठी निरोगी आहे का हा आपण विचार करायला हवा. 

व्यायामानंतर लगेच थंडगार पाणी पिणे हानिकारक 

Drinking Chilled Water After Workout

भरपूर व्यायाम केल्यानंतर लगेच खूप थंड पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. व्यायाम केल्याने आपण कॅलरीज जाळतो आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढते व ते कमी करण्यासाठी आपल्याला घाम येतो.म्हणजेच व्यायामानंतर तुमचे शरीर थोड्या काळासाठी उबदार राहते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान अचानक झटकन कमी होते. अशा परिस्थितीत तुमच्या वर्कआउटची मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून, व्यायामानंतर नेहमी सामान्य तापमानाचे म्हणजेच साधे पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीराचे वजन कमी होईल. आणि तुमच्या शरीराला हानी होण्याची शक्यता कमी होईल. 

वजन वाढण्याची शक्यता 

वर्कआउटनंतर लगेच थंडगार पाणी प्यायल्याने तुमचे वजन वाढू शकते. विशेषत: यामुळे पोट वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही वर्कआऊट करून वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर थंड पाणी प्यायल्याने तुमच्या मेहनतीवर शब्दश: पाणी फेरल्यासारखे होईल. त्यामुळे वर्कआउटनंतर लगेच थंड पाणी पिऊ नका.

हृदयगती कमी होते

व्यायामानंतर थंड पाणी प्यायल्याने हृदयाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो.व्यायाम करताना, खास करून कार्डिओ एक्सरसाइज करताना आपल्याला हृदयाचे ठोके जलद होतात. आणि यावेळी तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरण वाढलेले असते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही अचानक थंड पाणी प्यायले तर त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या अचानक थंड होऊ शकतात. अशावेळी रक्ताभिसरणाचा वेग आणि गती मंदावते.याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो आणि कधीकधी ही स्थिती गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे व्यायामानंतर लगेच थंड पाण्याचे सेवन करू नका.

ADVERTISEMENT
Drinking Chilled Water After Workout
Drinking Chilled Water After Workout

डोकेदुखी व सायनसचा त्रास 

वर्कआउट केल्यानंतर लगेच फ्रिज किंवा नवीन माठातले थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखी आणि सायनसचा त्रास होऊ शकतो. विशेषत: जर तुम्ही आईसबॉक्स मध्ये ठेवलेले पाणी प्यायले तर त्यामुळे तुमच्या मणक्यातील संवेदनशील नसांचे तापमान अचानक कमी होते, याचा तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे डोकेदुखी आणि सायनसची समस्या वाढू शकते.

पचनक्रियेवर परिणाम 

भरपूर हेवी वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात रेफ्रिजरेटेड स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पोटात वेदना होणे, क्रॅम्प्स येणे आणि पाचन समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे व्यायामानंतर लगेच खूप थंड पाणी न पिण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
21 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT