शरीरातून मल:निस्सारण योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीरात पाणी जास्तीत जास्त असणे गरजेचे असते. पोट स्वच्छ असेल आणि शरीरात पाण्याची योग्य मात्रा असेल तर शरीर हायड्रेट राहण्यासाठी चांगलीच मदत मिळते. त्वचा, केस,पोट यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. पण शरीरातून पाण्याची मात्रा कमी झाली की, आरोग्याच्या काही तक्रारी या अगदी हमखास अनेकांना उद्भवू लागतात. मोठ्यांनाच नाही तर अगदी तान्ह्या बाळांनाही शरीरातील पाणी कमी झाले की, काही त्रास होऊ लागतात. तुम्हालाही असे काही त्रास होत असतील तर कदाचित तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता झाली आहे किंवा तुम्ही फारच कमी पाणी पित आहात हे समजून जावे.
कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा
युरिन इन्फेक्शन
युरिन इन्फेक्शनची अनेक कारणं असू शकतात. पण पाणी कमी पिणे हे देखील त्यापैकी एक कारण आहे. जर पाण्याचे प्रमाण कमी झालं तर लघवीच्या ठिकाणी जळजळ जाणवू लागते. पोटदुखी होऊ लागते. लहान मुलांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले तर त्यांना ते पटकन सांगता येत नाही.त्यांची कुरकुर होऊ लागते. लहान मुलांमध्ये हा त्रास सुरु झाला तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे फारच फायद्याचे ठरते. तुमचेही लहान मुलं सतत कुरकुरत असेल तर एकदा तुम्ही त्याला दिवसातून किती पाणी देत आहात ते देखील तपासा. कारण पाण्याचे प्रमाण कमी झाले की, हा त्रास अगदी हमखास होण्याची शक्यता असते.
विष्ठेला त्रास
पाणी कमी झाले की, पोटाचे विकार हे डोकं वर काढू लागतात. अगदी सगळ्यात त्रासदायक आणि कधीही न संपणारा त्रास म्हणजे बद्धकोष्ठता. जर तुम्हाला आधीच याचा त्रास असेल आणि तुम्ही पाण्याचे सेवन कमी करत असाल तर तुम्हाला अगदी हमखास होऊ शकेल असा त्रास म्हणजे विष्ठेला अडथळा निर्माण होणे. खूप जणांना कडक विष्ठा होणे किंवा एक ते दोन दिवसाआड शौचाला होणे असे त्रास होऊ लागतात. शरीरातून विष्ठा जाणे या कार्यात अडथळा निर्माण झाला की, त्याचा परिणाम हा आपल्या संपूर्ण आरोग्यावर होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर तुम्ही पाणी कमी पित आहात हे समजून जावे.
दात सरळ करण्याच्या या डेंटल पद्धती आहेत फारच फायद्याच्या
थकवा
पाणी हे शरीराला तरतरी आणण्याचे काम करते. ज्याप्रमाणे एखाद्या कोमेजलेल्या झाडाला तरतरीत करण्याचे काम पाणी करते. पाणी घातल्यानंतर झाडाला जशी तरीतरी येते. तसे पाणी प्यायल्यानंतर एक वेगळेच समाधान मिळते. शरीराच्या कार्यांना चालना मिळते. अनेकदा खूप चालून आल्यानंतर ज्यावेळी आपण पाण्याचे सेवन करतो. त्यावेळी आपल्याला फार बरे वाटते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की, मरगळल्यासारखे होते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. खूप जण घसा कोरडा पडला तरी पाणी प्यायला जात नाही. त्याचा परिणाम म्हणजे शरीर थकल्यासारखे जाणवू लागते.
कोरडी त्वचा आणि केस
केसांना आणि त्वचेला वरुन क्रिम लावून चालत नाही. त्यासाठी तुमची आतली यंत्रणाही चांगली असावी लागते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर कालांतराने त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अगदी हमखास दिसू लागतो. चेहरा आणि केस शुष्क दिसू लागतात. त्यांवरील चमक कमी होते. अशा केसांना फाटे फुटण्याची शक्यता जास्त असते. तर अशी त्वचा ही निस्तेज दिसू लागते.
जर तुम्हीही कमी पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच हे काही त्रास होण्याची शक्यता असते.