ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
दसरा लुक

दसऱ्याला व्हा झटपट तयार,करा असा लुक

नवरात्रीची सांगता दसरा या सणाने होते. दसऱ्याची माहिती सर्वांनाच आहे. देवीला भावूक होऊन निरोप देताना आपटयाची पाने वाटून आपण आपला आनंद साजरा करत असतो. संध्याकाळी सगळे तयार होऊन आपट्याची पाने वाटण्यासाठी तयार होतात. जर तुम्ही बिल्डींग किंवा चाळीत राहात असाल तर या दिवशी सगळीजण तयार होऊन मस्त सोने लुटण्याचा कार्यक्रम करतात. जर तुम्हालाही या दसऱ्यासाठी एकदम वेगळा लुक करायचा आहे आणि झटपट तयार व्हायचे असेल तर हे लुक येतील कामी . चला करुया सुरुवात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना!

साडी

साडी ही एव्हरग्रीन असा पर्याय आहे. खूप जण या दिवशी खास साडी नेसतात. जर तुम्हीही साडी या गटात मोडणारे असाल तर तुम्हाला नेमकी कोणती साडी नेसायची आणि ती कशाप्रकारे नेसायची या ची आधीच तयारी करुन घ्या. सणासुदीच्या दिवसात काठापदराच्या साड्या या अधिक चांगल्या दिसतात. त्यामुळे एखादी काठापदराची साडी निवडा. ती अधिक चांगली दिसते. साडी नेसतानाच्या टिप्स लक्षात घेत साडी नेसा. एखादा चोकर सेट आणि  आंबाडा हेअरस्टाई किंवा मोकळे केस सोडून तुम्ही पटकन तयार होता. जर तुम्हाला आंबाडा घालायचा असेल तर तुम्ही मोगऱ्याचा गजरा मुळीच विसरु नका. कारण तो खूप छान उठून दिसतो. तुमचा लुक पूर्ण करतो. 

खणाच्या या ब्लाऊजचा ट्रेंड जो या फेस्टिव्ह सीझनसाठी आहे परफेक्ट

पंजाबी ड्रेस

खूप जणांना साडीपेक्षा पंजाबी ड्रेसहा कधीही घालायला आवडतो. कारण त्यामुळे बराच वेळ वाचतो. खास दसऱ्यासाठी जर तुम्हाला ड्रेस घालायचा असेल तर या काळात कॉटन ड्रेस टाळा. काऱण अशा ड्रेसला लवकर चुण्या पडतात. त्यामुळे तुम्ही सिल्क किंवा अशा प्रकारातील ड्रेस निवडू शकता. सध्या स्टाईलमध्ये असलेले गरारा ड्रेस किंवा तुमच्याकडे असलेला कोणताही फेस्टिव्ह ड्रेस घाला. जर तुम्हाला या ड्रेसला थोडा ट्रेडिशनल टच द्यायचा असेल तर तुम्ही हेअरस्टाईल अशी सेट करु शकता. तुम्ही आंबाडा घालू शकता. गजरा लावू शकता. पंजाबी ड्रेसवर खूप ज्वेलरी नाही घातली तरी चालू शकते. तुम्ही हेवी कानातले आणि थोडा लाईट मेकअप केला की तुमचा लुक हा मस्त दिसतो.

ADVERTISEMENT

खास कार्यक्रमांच्या हेअरस्टाईलसाठी निवडा ही सुंदर फुले

इंडोवेस्टर्न साड्या

तुमच्या घरात असलेल्या काही कपड्यांसाठी हीच ती वेळ आहे. ज्यावेळी तुम्ही कपाटात ठेवलेले कपडे घालू शकता. इंडोवेस्टर्न साड्यांचा प्रकार हा अनेकांकडे असतो. पण तो फारसा घातला जात नाही. जर तुम्हीही तो कपाटात ठेवून दिला असेल तर तुम्ही या साड्या या खास दिवशी नेसू शकता. या साड्या नेसायला फारस सोप्या असतात. त्यामुळे तुम्हाला अगदी कसेही वावरता येते. या अशा प्रकारच्या साड्यांवर सरळ केस किंवा कुरळे केलेले केस अधिक चांगले दिसतात. यावर हेवी ब्लाऊज असल्यामुळे त्यावर ज्वेलरी घालण्याची काहीही गरज नाही.  तुम्ही फक्त कानातले आणि थोडासा मेकअप केल्यानंतर हा लुक छान दिसतो.

आता तुम्हालाही व्हायचे असेल झटपट रेडी तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्याच कपड्यांचा करु शकता वापर आणि दिसू शकता सुंदर! 

तुम्हीही वापरत आहात का अशा ब्रा, करतात तुमच्या त्वचेचे नुकसान

ADVERTISEMENT
14 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT