महिलांसाठी दागिने हे फार महत्वाचे असतात. गळ्यातील दागिने प्रकार आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कानातल्यांचे वेगवेगळे प्रकारही आपण नक्कीच ट्राय करतो. पण तुम्हाला तुमच्या साध्या कानातल्यांना थोडासा वेगळा गेटअप आणायचा असेल तर तुम्ही कानातल्यांसाठी काही खास साखळ्या वापरु शकता. पूर्वीच्या काळात कानातल्यांच्या साखळ्या अगदी सगळ्यांकडे असायच्या पण मधल्या काळात साखळ्यांचे प्रकार हे फारच कमी पाहायला मिळत होते. पण आता कानातल्या साखळ्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आता हे प्रकार टिपिकल राहिलेले नाहीत तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतात. जे तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत.
गुट्टूपुशाला चैन
सध्या साऊथ इंडियन कानातल्यांचे प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. गुट्टुपुशाला हा थोडा हेवी कानातल्यांच्या चैनचा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला टेंपल डिझाईन्स आणि मोती, स्टोन्स असे वेगवेगळे वर्क केलेले दिसतात. यामध्ये मोत्यांची वेगवेगळ्या पद्धतीने रचना केलेली असते. कानातल्या या पट्टया हेवी असतात. त्यामुळे तुम्हाला हेअर ॲसेसरीज घालायची फारशी काही गरज नसते. त्यामुळे तुम्ही मस्त अशा चैन घेऊ शकतात. साडी किंवा ट्रेडिशनल लेहंगा असे काही निवडले असतील तर तुम्हाला हे चैन घालता येतील.
झुमका चैन
झुमक्याचा जसा आकार असतो. त्याची गुंफण करुन तयार केलेल झुमका चैन दिसायला खूप सुंदर दिसतात. झुमका चैन या देखील थोड्या हेव्ही असतात. पण ते दिसायला खूपच सुंदर दिसतात. झुमका चैनमध्ये तुम्हाला दोन किंवा एक लेयरच्या चैन मिळतात. जर तुम्ही कानात झुमके घातले असतील तर तुम्ही झुमका चैन घालायला हरकरत नाही. झुमका चैनमध्ये तुम्हाला तुमच्या कानातल्यांनुसार डिझाईन्स निवडता येतात. या शिवाय तुम्हाला मुंडावळ्यांचे प्रकार जाणून घ्यायला हवेत.
मोत्यांच्या साखळ्या
मोत्यांच्या साखळ्या या पारंपरिक आणि ट्रेडिशनल आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही. तुमच्या कानातल्यांना न्याय देण्यासाठी मोत्यांच्या या सरी खूपच सुंदर दिसतात. तुम्ही जर मराठमोळा साज केला असेल तर तुम्हाला मोत्यांच्या साखळ्या घालता येतील. मोत्यांच्या साखळ्या या देखील खूप सुंदर दिसतात. मोत्यांच्या साखळ्या एक- दोन किंवा त्याहून अधिक हेव्ही साखळ्या मिळतात. त्या ट्राय करायला काहीच हरकत नाही.त्यांच्या साखळ्या
स्टोनस्टडेट साखळ्या
स्टोन्सचे वर्क केलेले दागिने तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला स्टोनस्टडेट साखळ्या ट्राय करायला काहीच हरकत नाही. स्टोन्सस्टडेट साखळ्या तुम्हाला सिंगल आणि मल्टी लेयरमध्ये देखल मिळतात. तुम्ही एखादी डिझायनर साडी नेसली असेल तर तुम्हाला तुमच्या कानातल्यांसोबत अशा प्रकारच्या साखळ्या देखील घालता येतील.
आता साखळ्यांचे प्रकार तुम्हाला ट्राय करायचे असतील तर तुम्ही नक्कीच कानांची शोभा वाढवण्यासाठी साखळ्यांचे हे प्रकार ट्राय करायला हवेत.