ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
अति प्रमाणात कराल कॉफीचे सेवन तर तरूणपणीच येतील सुरकुत्या

अति प्रमाणात कराल कॉफीचे सेवन तर तरूणपणीच येतील सुरकुत्या

कॉफी एक रिफ्रेश करणारं आणि मूड बूस्टर पेय असल्यामुळे अनेकांना सतत कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी स्ट्रेस बस्टरदेखील आहे. कारण जेव्हा तुम्ही अति ताणात अथवा थकलेले असता तेव्हा तुम्हाला कॉफी पिण्याने लगेच बरं वाटू लागतं. मात्र जर यासाठी तुम्ही अति प्रमाणात कॉफी पित असाल तर मात्र वेळीच सावध व्हा. कारण तुमचा मूड छान करणारी कॉफी तुमच्या त्वचेसाठी मात्र मुळीच योग्य नाही. अति कॉफी पिण्यामुळे तुम्ही लवकर वयस्तर दिसू शकता. कारण कॉफीमध्ये असलेलं कोर्टिसोल तुमच्या रागाला प्रोत्साहन देतं. अति राग येण्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम जाणवतो. यासाठी जाणून घ्या कॉफीचे दुष्परिणाम आणि दिवसभरात नेमकी किती कॉफी प्यावी. 

कॉफीमुळे का येतात सुरकुत्या 

कॉफी पिण्यामुळे तुम्हाला तहान कमी लागते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. तुमचं शरीर जस जसं डिहायड्रेट होत जातं तस तसा त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. त्वचा कोरडी आणि रूक्ष झाल्यामुळे त्वचेवर वेळे आधीच सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्यांमुळे तुमचा चेहरा वयस्कर दिसतो आणि तुमच्या सौंदर्यावर याचा परिणाम होतो. तसंच आणखी अनेक समस्या तुमच्या त्वचेवर दिसू लागतात. यासाठी वाचा चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय | Chehryavaril Surkutya Kami Karnyasathi Upay

एक्नेची समस्या वाढते

तुमची त्वचा तेलकट आणि एक्नेसाठी पूरक असेल तर कॉफीमुळे समस्या अधिकच वाढू शकते. कॉफीमध्ये दुधाचा वापर केला जातो. ज्या लोकांना दुधाची अॅलर्जी असते. त्यांना कॉफी पिण्यामुळे चेहऱ्यावर सूज येते. काही लोकांच्या चेहऱ्यावर तर यामुळे एक्नेचे प्रमाणही वाढते.यासाठी वापरा चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Cream For Acne Scar In Marathi)

चेहऱ्यावर होतो ताणाचा परिणाम

कॉफीचे अति सेवन करणाऱ्या लोकांना ह्रदयासंबधित समस्या जाणवतात. कारण अशा लोकांच्या ह्रदयाचे ठोके यामुळे वाढतात. हार्ट बिट्स वाढणे, भीती वाढणे असे संकेत कॉफी पिण्याचे परिणाम असू शकतात. कारण कॉफीमुळे शरीरातील कोर्टिसोलचे प्रमाणा वाढते. कोर्टिसोल हे हॉर्मोन तुमचा ताण, तणाव वाढण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळे तुम्हाला राग येतो आणि त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर जाणवतो.

ADVERTISEMENT

एजिंगच्या मार्क्स चेहऱ्यावर दिसतात 

कॉफीमध्ये साखर असेल तर त्यामुळे तुमच्या त्वचेमधील कोलेजीन नष्ट होतं. कोलेजीनमुळे तुमच्या त्वचेमध्ये लवचिकता येत असते. जेव्हा तुम्ही अति प्रमाणात कॉफी पिता तेव्हा तुमच्या त्वचेतील कोलेजीनवर परिणाम होतो. ज्यामुळे सुरकुत्या, फाईन लाईन्स वाढू लागतात. 

कॉफी पिताना कोणती काळजी घ्यावी

कॉफी तुम्हाला खूपच आवडत असेल तर कॉफी पिताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जसं की दिवसभरात एक ते दोन वेळच कॉफी प्या. शिवाय कॉफीमध्ये साखर आणि दूध वापरू नका. कारण अशी कॉफी अॅंटि एजिंग असून शरीरासाठी उत्तम असते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT