मधुमेह हा एक दिवसेंदिवस वाढत जाणारा एक जीवनशैली विकार आहे. ज्यामुळे मधुमेहींचे प्रमाण सध्या देशात वाढताना दिसू लागले आहे. आजकाल प्रत्येक घरात एकतरी मधुमेही असतोच. जर मधुमेहापासून वेळीच स्वतःचे रक्षण करायचे असेल तर मधुमेहाची लक्षणं प्रत्येकाला माहीत असायला हवीत. वास्तविक मधुमेह होण्यामागची कारणं जशी वेगवेगळी असतात. तशीच प्रत्येकाची मधुमेहाची लक्षणंही वेगळी असू शकतात. यासाठीच जर तुम्हाला सतत हातापायाला सूज येत असेल तर हे मधुमेह असण्याचं एक गंभीर लक्षण असू शकतं हे ओळखा. कारण हातापायाला सूज येण्याची कारणं इतरही असली तरी ते मधुमेहाचेही एक गंभीर लक्षण आहे. यासाठीच ओळखा तुमच्या शरीराचे संकेत आणि वेळीच घ्या काळजी
Diabetes Diet In Marathi | मधुमेही व्यक्तीचा आहार जाणून घ्या
काय आहे तज्ञ्जांचे मत
मधुमेह टाईप 1 आणि टाईप 2 अशा दोन प्रकारचा असतो. त्यामुळे मधुमेह होण्याची लक्षणे काही वर्षे आधी पासूनच शरीरात दिसू लागतात. ज्याला प्री डायबेटिक लक्षणं असं म्हणतात. सहाजिकच मधुमेहाची लक्षणं सामान्य असू शकतात तसंच मधुमेह वाढताच ती तीव्र आणि गंभीर रूप धारण करू शकतात. प्री डायबेटिक अवस्थेत जर तुम्हाला मधुमेह होण्याचे संकेत मिळाले तर त्यावर वेळीच उपचार करून मधुमेह नियंत्रित करता येतो. यासाठी दर वर्षी नियमित हेल्थ चेकअप करा आणि जीवनशैली आणि आहारात बदल करून आरोग्य राखा असा आरोग्य तज्ञ्ज नेहमी सल्ला देतात.
त्वचेला येत असेल सतत खाज तर तुम्हाला असू शकतो मधुमेहाचा धोका
हाता पायाची सूज आहे मधुमेहाचे महत्त्वाचे लक्षण
मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण म्हणजे सतत हातापायाला सूज येणे अथवा खाज येणे. हातापायाला सूज येणं हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण असू शकते. ज्यावरून तुम्हाला मधुमेह झाल्याचा संकेत मिळतो. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या हातापायाला सूज येण्याची शक्यता असते. यासोबतच वारंवार लघवीला होणं, सतत लहान लागणं, वजन वाढणं,धुरकट दिसणं, अंगात उष्णता वाढणं, गोड खाण्याची तीव्र इच्छा होणं ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. असं असल्यास आपलं शरीर मधुमेहाचे संकेत देत असून आता आपण स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची गरज आहे हे ओळखा.