व्हेलेंटाईनला आता अवघे काही तास उरले आहेत. काय घेऊ ? काय करु? असे म्हणत मॉलमध्ये फिरण्यातच वेळ गेला असेल तर आता थोडं थांबा कारण आता काही धावपळ करुन घेण्यापेक्षा काहीतरी वेगळा बेत आखण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. अगदी झटपट असा हा प्लॅन होऊ शकतो आणि त्यात एक वेगळी मजाही येऊ शकते. तर प्लॅन असा की, तुम्हाला तुमच्या हाताने काही हटके रेसिपीज बनवायच्या आहेत. आता रेसिपी म्हटल्यावर तुम्हाला टेन्शन यायला नको. कारण झटपट आणि मस्त अशा या काही चॉकलेटच्या रेसिपी आहेत. कारण चॉकलेट आवडत नाही असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. त्यामुळे या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील.
व्हेलेंटाईनला द्या असे युजफुल गिफ्टस
चॉकलेट सॅण्डवीच
सॅण्डवीचचा हा प्रकार घरी करायला अगदीच सोपा आहे.
साहित्य- ब्राऊन ब्रेड/मल्टी ग्रेन ब्रेड, डार्क चॉकलेट/ मिल्क चॉकलेट, बटर
कृती- तुमच्या आवडीचा कोणताही ब्रेड घ्या त्याला आवडीप्रमाणे बटर लावा. आणि आता महत्वाचा भाग तुम्हाला त्यावर किसायचे आहे भरपूर चॉकलेट किसा आणि वरुन आणखी एक ब्रेड स्लाईस ठेवून सॅण्डवीच तव्यावर गरम करा. ब्रेड गरम केल्यामुळे चॉकलेट छान वितळते. आता सॅण्डवीच तव्यावरुन काढा आणि छान कट करा. वा! चॉकलेड वितळल्यामुळे ते मस्तच लागते. आता त्याला थोेडे अजून चॉकलेटी करण्यासाठी वरुन चॉकलेट सॉस घाला. तुमची डिश तयार
व्हेलेंटाईन्स डेला या १५ गोष्टी टाळा
स्ट्रॉबेरी डिप इन चॉकलेट
स्ट्रॉबेरी आवडत असतील तर तुमच्यासाठी आणखी एक झटपट रेसिपी आहे. कारण यात विशेष असे काहीच कराव लागत नाही. स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट हे एक चांगले कॉम्बिनेशन आहे. छान फ्रेश स्ट्रॉबेरीज आणा आणि त्या मेल्ट चॉकलेटमध्ये डिप करुन खा. जर तुम्हाला मोल्टन चॉकलेटमध्ये प्रत्येकवेळी डिप करुन खाणे शक्य नसेल तर स्ट्रॉबेरीज चॉकलेटमध्ये डिप करुन बाहेर काढा आणि घट्ट होऊ द्या. त्यावर तुम्हाला हवे ते इडेबल डेकोरेशन करा.
टीप- फ्रेश स्ट्रॉबेरीजपाूसन हा पदार्थ बनला असल्यामुळे तो जास्त काळ टिकू शकत नाही. फ्रिजमध्ये असेल तर फार फार दोन दिवस तुम्ही ही स्ट्रॉबेरीज खाऊ शकता.आता यात तुम्हाला व्हाईट चॉकलेटसुद्धा वापरता येईल. स्ट्रॉबेरीज डिप करायला सोप्या जाव्यात म्हणून तुम्ही त्यावर टुथपीकसुद्धा लावू शकता.
मग केक
केक म्हटल्यावर अनेकांना खूप साहित्य आणि भांडी डोळ्यासमोर येतात. पण तुम्हाला माहीत आहे का काही केक अगदी झटपट तयार होतात. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाहीत की ते तुम्ही बनवलेत आणि त्याचे साहित्यही फार कमी आहेत.
एका कॉफी मगमध्ये तुम्हाला एक ते दोन चमचा मैदा किंवा सेल्फ रायझिंग फ्लोअर. त्यात चिमूटभर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर तुम्ही अंड खात नसाल तर एका अंड्याऐवजी त्यात एक मोठा चमचा तेल घाला. मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यात व्हेनिला इसेन्स आणि आवडीप्रमाणे चॉकोचीप्स घाला. दोन मिनिटांसाठी हा मग मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. मग केक तयार..
आता तुमच्याकडे मायक्रोव्हेव नाही का? अरे मायक्रोव्हेव असायलाच हवा असे काही नाही. तुम्ही कुकरमध्ये हा केक वाफवू शकता. शिटी न लावता केवळ ५ मिनिटांसाठी हा कप तुम्हाला ठेवायचा आहे. छान कुकर मग केक तयार होईल.
चॉकलेट चीप व्यतिरिक्त तुम्ही यात केळ, स्ट्रॉबेरीज किंवा आवडीची फळे, ड्रायफ्रुटदेखील घालू शकता. तो केकही छान लागतो. मस्त कॉफी मग मधले केक घेऊन तुम्ही तुमची संध्याकाळ गोड करु शकता.
(फोटो सौजन्य- Instagram )
प्रपोज करायचयं? मग या खास टिप्स तुमच्यासाठी
चॉकलेट चीप कुकीज
कुकीज आणि कॉफी बेस्टच कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला माहीत आहे का? कुकीज अगदी सहज बनवता येतात. त्यासाठी तुम्हाला लागेल १ कप मैदा, अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप ब्राऊन शुगर, बेकिंग सोडा, व्हेनिला इसेन्स, २ अंडी,१ चमचा कॉर्नस्टार्ज,अर्धी वाटी बटर
एका बाऊलमध्ये बटर घेऊन त्यात पिठी आणि ब्राऊन शुगर एकत्र करुन घ्या. साखर विरघळली की. त्यात अंडी, व्हेनिला इसेन्स घाला. आता वेळ मैदा, बेकिंग पावडर, कॉर्नस्टार्चघालण्याची ते घातल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी घालायचे आहेत चॉकलेट चीप घला. आता कुकीच्या सारणाची कंसिस्टन्सी कशी हवी असा प्रश्न असेल तर त्याचा गोळा होईल इतके पीठ घट्ट हवे.
आता बेकिंगची टीप हवी असेल तर जर तुम्हाला परफेक्ट कुकी हवी असेल तर कुकीचे छोटे छोटे गोळे करा आणि ते फ्रिजमध्ये १ तासभर ठेवा. ओव्हन ३००डिग्रीवर ओव्हर हिट करुन ठेवा. फ्रिजमधून कुकी बाहेर काढल्यानंतर ट्रेमध्ये काढून ओव्हनमध्ये १० मिनिटांसाठी ठेवा. तुमच्या कुकींचा आकार एका सारखाच असेल शिवाय त्या बाहेरुन क्रिस्पी आणि आतून एकदम नरम होतील.
(फोटो सौजन्य- Instagram)
चॉकलेट डोसा
हल्ली सगळ्याच पदार्थात काहीना काही प्रयोग केला जातो. जर तुम्ही साऊथ इंडियन पदार्थाचे चाहते असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच करुन पाहायला हवा. कारण तो तुम्हाला वाटतो तितका कठीण नाही. डोस्याचे बॅटर तव्यावर टाकल्यानंतर तुम्हाला त्यावर बटर टाकायचे आहे. मग तुम्हाला त्यावर चॉकलेट किसून घालायचे आहे. त्याला थोडे अजून चॉकलेटी बनवण्यासाठी तुम्हाला त्यावर चॉकलेट सिरप टाकून डोसा तव्यावरुन काढून मस्त गरम गरम सर्व्ह करा.कारण हा पदार्थ गरमच चांगला लागतो.
तुम्हाला चॉकलेटऐवजी हेजलनट स्प्रेड वापरले तरी चालेल.जर तुम्हाला वाटत असेल डोसा आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन चांगले लागत नाही तर असे मुळीच नाही हे कॉम्बिनेशन मस्त लागते. क्रिस्पी डोसा आणि चॉकलेट एकदम डेडली कॉम्बिनेशन आहे.
(फोटो सौजन्य- Instagram)
चॉकलेट नट्स
घरी असलेले ड्रायफ्रुट चॉकलेटमध्ये डीप केले की तयार झाले चॉकलेट नट्स. बाजारात असे चॉकलेट ड्रायफ्रुट विकत घ्यायला गेलात तर त्याची किंमतही खूप असते.शिवाय तुम्हाला आवडणाऱ्या ड्रायफ्रुटमध्ये ते बाजारात उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे चॉकलेट नट्स तयार करा आणि ते गिफ्ट करा.
(सौजन्य –Instagram)
चॉकलेट शेक
थंड काहीतरी प्यायची इच्छा असेल तर मस्त चॉकलेट शेक बनवा. घरी छान चॉकलेट स्लॅब आणा. ब्लेंडरमध्ये चॉकलेटचे तुकडे, दूध घेऊन फिरवून घ्या. चॉकलेटमध्येच गोडवा असल्यामुळे तुम्हाला साखर घालण्याची गरज नाही. आता चॉकलेट सर्व्ह करण्याआधी ते छान थंड करा. मग त्यात मस्त व्हेनिला आईस्क्रिम घालून मस्त एन्जॉय करा.
तुम्हाला नुसतेच चॉकलेट खायचे नसेल तर त्यात काही फळे घातली तरी चालतील.
(फोटो सौजन्य- Instagram)