ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
easy-hacks-for-hiding-bra-strap-from-back-in-marathi

कपड्यातून ब्रा पट्टी दिसत असेल तरी कशी लपवावी, सोपे हॅक्स

उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात स्लीव्हलेस आणि बॅकेलस कपडे घालणं खूपच चांगलं वाटतं. इतकंच नाही तर डीप नेक ब्लाऊजही या दरम्यान अनेकांना घालायला आवडतो. पण या कपड्यांमध्ये ब्रा ची पट्टी अर्थात ब्रा स्ट्रेप्स (Bra Straps) दिसते असं वाटत राहिल्याने अनेक मुली कम्फर्टेबल नसतात. ब्रा ची पट्टी सतत दिसत राहिली तर मुलींना अथवा महिलांना सतत त्रासदायक वाटते आणि लक्ष तिथेच राहाते. खरं तर असहज वाटण्याचं काही कारण नाही. पण समाजातील नजरांमुळे मुलींना असं वाटणं साहजिक आहे. पण कपडे घातल्यानंतर ब्रा ची पट्टी दिसणार नाही यासाठी काही हॅक्स आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. 

रेजरबॅक टँक आणि नूडल स्ट्रॅप टँक टॉपमधून कसे लपवणार 

सर्वात पहिल्यांदा आपण या ऋतूमध्ये सर्वात जास्त आरामदायी असणाऱ्या टँक टॉप्सबाबत जाणून घ्या. रेजरबॅक आणि नूडल स्ट्रॅप टँक टॉप्समध्ये बरेचदा ब्रा च्या पट्टी लपविणे अथवा ट्यू ब्रा लपविणे कठीण होतं. अशा परिस्थितीत तुम्ही हा पर्याय निवडू शकता. रेजरबॅक टँक टॉपसाठी कोणत्याही ब्रा क्लिप अथवा सेफ्टी पिन्सच्या मदतीने तुम्ही ब्रा स्ट्रेप्स क्रॉस आकारात बांधून घ्या. यामुळे तुमच्या टॉपप्रमाणे त्याचा आकार होतो आणि तुम्ही तुमच्या टॉपप्रमाणे याची अॅडजस्टमेंट करू शकता. 

नूडल स्ट्रेपवाल्या टँक टॉपसह तुम्ही ट्यूब ब्रा घालणार असाल तर सेफ्टी पिन ही ब्रा कपच्या अगदी वर लावा जिथे नूडल स्ट्रॅप कपशी जोडली जाते. अशा पद्धतीने टँक टॉपसह तुम्ही ब्रा जोडू शकता, ज्यामुळे ब्रा खाली घसरणार नाही. 

लोबॅक ब्लाऊज अथवा लोबॅख टॉपसाठी करा ब्रा स्ट्रॅप कन्व्हर्टरचा उपयोग 

मार्केटमध्ये अगदी सहज पद्धतीने ब्रा स्ट्रॅप कन्व्हर्टर्स मिळतात. तसंच तुम्हाला याचा उपयोग अनेक कामांमध्ये करून घेता येतो. लोअर स्ट्रॅप लपविण्यासाठी हे सर्वात अधिक कामी येतात. याशिवाय बॅकलेस ड्रेससाठीही याचा उपयोग करून घेता येतो. तुम्ही कोणत्याही ब्रा सह हे जोडू शकता ज्यामुळे ब्रा चा बॅक स्ट्रेप क्रिस – क्रॉस आकारात करून घेता येतो. हे तुमच्या कमरेपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला त्रासही होत नाही. 

ADVERTISEMENT

डीप नेक ब्लाऊजसाठी ब्रा हॅक्स 

तुमच्या जवळ डीप नेक ब्लाऊज आहे आणि तुम्ही हा घालू शकत नाहीये कारण त्यामधून तुम्हाला ब्रा ची पट्टी बाहेर दिसण्याची सतत चिंता वाटते आहे. तर तुम्ही त्यासाठी ब्रालेटचा उपयोग करून घेऊ शकता. ब्रालेट्स आजकाल अधिक ट्रेंड्समध्ये आहेत. ब्रालेट वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहेच. काही ब्रालेस्टसह तर तुम्हाला ब्लाऊज घालण्याचीही गरज नाही. याशिवाय तुम्ही ब्लाऊजमध्ये कप शिऊन घेऊ शकता. ट्यूब ब्रा पेक्षा यामध्ये स्टिकऑन कप्स अधिक चांगल्या प्रकारे फिट बससात आणि याचा उपयोग होतो. ब्लाऊज असाही घट्ट असतो त्यामुळे स्टिकऑन कप्स जागचे हलत नाहीत आणि फिटिंग व्यवस्थित राहाते. स्टिकऑन ब्रादेखील अशाच असतात.

ऑफ शोल्डर ड्रेससाठी हॅक्स 

तुम्ही जर ऑफ शोल्डर ड्रेस घालण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी स्लायडरमधून पट्टी काढणे योग्य ठरते. त्याजागी तुम्ही ब्रॉड शोल्डर स्ट्रेप्सचा वापर करून त्याची स्टाईल करू शकता. तुमची ब्रा ची पट्टी जर निघत नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूने ही पट्टी खांद्यावरून क्रॉस करून घ्या. त्यामुळे ब्रा व्यवस्थित जागी फिट बसते आणि ब्लाऊजमधून बाहेर दिसणारही नाही. यासाठी तुम्ही ब्रा स्ट्रॅप्सचा आकार मोठादेखील बनवून घेऊ शकता. स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा निवडावी

लुप्सच्या मदतीने लपवा ब्रा स्ट्रॅप्स 

ब्रा स्ट्रॅप्ससाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रेसमध्ये नेहमी लुप्स शिऊन घेऊ शकता. ज्यामुळे ब्रा ची पट्टी दिसणारच नाही. हे टॉप्स, ड्रेस, ब्लाऊज या सगळ्यामध्ये सापडते. त्यासाठी तुम्ही हुक्सचा वापरदेखील करू शकता. मात्र हे आतल्या बाजूने असायला हवे. 

हे काही सोपे हॅक्स आहेत, जे तुमच्या कपड्यातून ब्रा ची पट्टी न दिसण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. तुम्हाला स्टायलिश ड्रेस घालणे आवडत असेल, पण ब्रा स्ट्रॅप्सची समस्या येत असेल तर या हॅक्स तुम्ही नक्की ट्राय करून पाहा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT