ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

अंडरआर्म्स काळेपणा असणं ही एक सामान्य समस्या आहे. सतत येणारा घाम, परफ्यूम अथवा डिओड्रंट अंडरआर्म्सवर सहसा डायरेक्ट लावल्यामुळे ही समस्या निर्माण होते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अंडरआर्म्सला क्रीम लाऊन अथवा शेव्ह करून साफ करण्याऐवजी वॅक्स करणं हा सोपा आणि चांगला उपाय आहे. कारण हेदेखील काळेपणाचं कारण आहे. पण कितीतरी वेळा अचानक प्लॅन तयार होतात, त्यावेळी पटकन वॅक्स करणं शक्य होत नाही. अशावेळी क्रीम अथवा शेव्ह करणं हाच एक उपाय असतो. त्याचाच परिणाम अंडरआर्म्स काळे पडण्यामध्ये होतो. असे अंडरआर्म्स असतील तर आपल्याला स्लीव्हलेस कपडे कितीही आवडत असले तरीही ते घालण्याची लाज वाटते. पण आता तुम्हाला अशी लाज वाटण्याची गरज नाही. कारण आम्ही असे काही झटपट घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरीच अंडरआर्म्स स्वच्छ करून त्याचा काळेपणा घालवू शकता आणि तुमचे अंडरआर्म्सदेखील स्वच्छ दिसतील.

उपाय 1: 2 चमचे हळद, 1 चमचा बेकिंग सोडा, 3 चमचे मध आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करून घट्ट पेस्ट करून घ्या. हा एक नैसर्गिक ब्लीचचा प्रकार आहे. हे मिश्रण तुम्ही साधारण15 से 20 दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेऊ शकता. हे तुमच्या अंडरआर्म्सना लावण्यापूर्वी तुमचे अंडरआर्म्स वॅक्स्ड आणि स्वच्छ असायला हवेत. ही पेस्सट तुम्ही आपल्या बोटांनी काखेत लावा. 20 मिनिटांनंतर हे धुऊन घ्या आणि ओल्या गरम टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर त्वचेला नारळाचे तेल अथवा मॉईस्चराईजर क्रिम लावा. पहिल्याच वेळी तुम्हाला तुमच्या अंडरआर्म्समध्ये बदल दिसण्यास सुरुवात होईल. असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता.

clean underarms

उपाय 2: एक वाटीत 1/4 कप साखर, 1 चमचा मीठ, 1 मोठा चमचा मध, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे 3 थेेंब घालून याची एक पेस्ट करून घ्या. आता ही पेस्ट थोडं पाणी लाऊन अंडरआर्म्सला लावा आणि साधारण 3 मिनिटांपर्यंत मसाज करा. काही आठवड्यातच तुमच्या अंडरआर्म्समधील काळेपणा निघून जाईल.

ADVERTISEMENT

उपाय 3: 1 चमचा मध आणि 1 मोठा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर यासह 2 चमचे दही मिक्स करा. ही पेस्ट थोड्या जाड्या थरामध्ये अंडरआर्म्सच्या त्वचेला लावा. 20 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

potato for underarms

उपाय 4: तुम्हाला माहीत आहे का? बटाटे अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ब्लीचप्रमाणे हा बटाटा काम करतो. बटाट्याचे काप काढून ते त्वचेवर घासा अथवा बटाट्याचा रस काढून तुम्ही अंडरआर्म्सला लाऊन साधारण 15 मिनिट्स तसाच ठेवा. यामुळे काही दिवसातच तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ दिसू लागतील.

उपाय 5: 1/2 चमचा ऑरेंज पील पावडर घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करा. याची एक पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर अप्लाय करा आणि 15 मिनिट्स असंच ठेऊन द्या. नंतर कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा. तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम दिसून येईल.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या

अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

ADVERTISEMENT

भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी

26 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT