ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
makeup ideas for engagement

साखरपुड्याला दिसायचे असेल आकर्षक, तर सोप्या मेकअप टिप्स

लग्नामध्ये करण्यात येणारे विधी सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. तितकेच खास विधी असतात ते म्हणजे साखरपुड्याचे. लग्न असो वा साखरपुडा सर्वात जास्त लोकांचं लक्ष असतं ते म्हणजे नवरीवर. त्यामुळे या दोन्ही विधीमध्ये मेकअप खास असणे अत्यंत गरजेचे आहे. सुंदर, आकर्षक, बोल्ड आणि ग्लॅमरस अशी नवरी आपल्याला विविध ठिकाणी दिसून येते. साखरपुड्यांच्या विधींना सहसा होणारी नवरी ही लाईट मेकअप (light makeup) करणे अधिक सोयीस्कर समजते. तुमचाही लवकरच साखरपुडा होणार असेल आणि आपण अधिक आकर्षक दिसण्यासाठी कसा लुक करायचा याबाबत विचार करत असाल तर तुम्ही या लेखातून काही मेकअप आयडिया (makeup ideas) नक्कीच घेऊ शकता आणि तुमचा मेकअप लुक (Makeup Look) अधिक परफेक्ट बनवू शकता. हे मेकअप लुक्स लाईट असण्यासह नवरीला अधिक सुंदर दिसण्यासाठीही मदत करतात.

जाड लाईनर, बोल्ड आयब्रो आणि लाल लिपस्टिक (Liner, Bold Eyebrow and Red Lipstick)

आपल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही अशा स्वरूपाचा मेकअप नक्कीच करू शकता. हा मेकअप लुक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयब्रोज हायलाईट कराव्या लागतील आणि ओठांना लाल लिपस्टिक लावल्यानंतर ती अधिक बोल्ड असेल याची काळजी घ्या. डोळ्यांची सुंदरता वाढविण्यासाठी तुम्ही जाडसर आयलाईनर लावणे हा एक चांगला पर्याय आहे. असा मेकअप लुक तुमच्या आऊटफिटसाठीही योग्य ठरतो आणि नवरीला अधिक आकर्षक बनवतो. विशेषतः तुम्ही साखरपुड्यात लेहंगा घालत असाल तर हा तुमच्यासाठी परफेक्ट लुक आहे. 

स्मोकी मॅट ब्राऊन आय मेकअप लुक (Smokey Matte Brown Eye Makeup Look)

हा मेकअप लुक करण्यासाआठी मिड टोन शॅडो लाऊन सुरूवात करा. एक सूक्ष्म स्मोकी बेस बनविण्यासाठी तुम्ही ग्रे अथवा ब्राऊन शेडचा पर्याय निवडा. लॅश लाईनवर लायनर लावा. लायनरच्या वर चारकोल अथवा स्मोकी मॅट ब्राऊन रंगाचा टोन शॅडो पुन्हा लावा. शॅडोच्यावर आणि खाली नीट मिक्स करा. खालच्या पापण्यांच्या बेसवर काजळ लावा आणि त्यावर खालची लॅशलाईन लावा. त्यानंतर स्मोकी रंगाच्या फिनिशिंगसाठी तुम्ही तुमच्या बोटांचा वापर करावा. स्मोकी आय मध्ये मस्कारा लावणे हादेखील महत्त्वाचा भाग असतो. मस्कारा लावण्याची पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर ती माहीत करून योग्य स्वरूपात मस्कारा लावा. सर्वात शेवटी फिनिशिंग देण्यासाठी तुम्ही तुमच्या बोटांनी एक चमकदार शॅडो डोळ्यांच्या वर लावा आणि तुमच्या साखरपुड्याचा लुक होईल एकदम परफेक्ट!

शिमरी न्यूड डोळे आणि ग्लॉसी पिच ओठ (Shimmery Nude Eyes and Glossy Lips)

Eye Makeup Tips In Marathi

तुम्ही तुमच्या साखरपुड्यासाठी योग्य लुकचा विचार करत असाल तर हा लुक नक्कीच परफेक्ट आहे. साखरपुड्याचे विधी जर संध्याकाळच्या वेळी असतील तर त्यासाठी हा परफेक्ट, स्मोकी आईज आणि पीच न्यूड लिपस्टिक लुक मिळविणे सोपे आहे. फ्लॉलेस स्मोकी आईज लुकसाठी तुम्ही तुमच्या पापण्यांना प्राईमर लावा आणि त्यावर सेटिंग पावडर लावा जेणेकरून तुमच्या स्किनटोनसह मॅच होईल आणि पॅची दिसणार नाही. त्यानंतर ट्रान्झिशन शेडमध्ये एक नरम ब्राऊन आयशॅडो शेड लावा आणि मग अँगल्ड ब्रशचा उपयोग करा. त्यानंतर आपल्या खालच्या लॅश लाईनवरपण रंग लावा. आपल्या डोळ्यांची आऊटलाईन करून झाल्यावर लिक्विड आयलायनरचा वापर करावा. आपल्या चेहऱ्यावर मिनिमल मेकअप ठेवा आणि चकचकीत ब्लश अजिबात वापरू नका. ओठांसाठी तुम्ही न्यूड शेडच्या लिपस्टिकचा अथवा न्यूड लिक्विड लिपस्टिक अथवा ग्लॉसी पीच लिपस्टिकचा वापर करावा. 

ADVERTISEMENT

मिनिमल मेकअप लुक करा ट्राय

minimal makeup

अशा स्वरूपाच्या मेकअप लुकसाठी आपल्या त्वचेवर क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईजिंगची गरज आहे. त्वचेवरील डाग लपविण्यासाठी तुम्ही पूर्ण कव्हरेज देणारे फाऊंडेशन वापरा आणि आपल्या चेहऱ्याला लावा. यानंतर डोळ्यांखाली, ओठांच्या किनाऱ्यावर आणि आपल्या हनुवटीवर तुम्ही स्पॉट करेक्टर क्रिम लावा. मस्काऱ्याचा वापर करताना तुम्ही पापण्या कर्ल करायला विसरू नका. कर्लिंग टूलचा वापर तुम्ही करू नका आणि मस्काऱ्याचा एकच कोट लावा. याशिवाय तुम्ही आयब्रो सेट करण्यासाठीही मस्काऱ्याचा वापर करू शकता. ओठांच्या मेकअपसाठी तुम्ही गडद अथवा लाऊड लिपस्टिक शेड्सचा अथवा ब्राऊन लिपस्टिकचा वापर करू शकता. तुम्हाला न्यूड रंगाच्या लिपस्टिकचा वापर करायचा असेल तर तुम्ही बेबी पिंक अथवा लिप बामचा वापर करावा. आपली लिपस्टिक अथवा लिप बाम तुम्ही डायरेक्टली ओठावर लावण्यापेक्षा बोटावर घ्या आणि मग लावा. याचा प्रभाव अधिक चांगला दिसून येतो. 

या सर्व मेकअप आयडिया तुम्हाला तुमच्या साखरपुड्याचा लुक अधिक सुंदर दिसण्यास आणि आकर्षक दर्शविण्यासाठी मदत करतील. तसंच तुम्ही सर्वाधिक सुंदर नक्कीच दिसाल. 

06 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT