पोटावरील चरबी वाढायला नको असेल अथवा पोट वाढायला नको असेल तर आपण नेहमी आपली पचनक्रिया योग्य आहे की नाही याची तपासणी करून घेतो. निरोगी राहणं हे खरं तर आयुष्यात खूपच महत्त्वाचं असतं आणि निरोगी राहणं म्हणजे काय तर स्वतःची काळजी घेणं. आपण रोज प्रचंड धावपळ करत असतो. पण भूक भागवण्यासाठी आपण जे कष्ट घेतो तेच नीट करत नाही. अर्थात वेळेवर जेवण आपण घेत नाही आणि त्याचा परिणाम होतो ते आपल्या आरोग्यावर. सर्वात जास्त परिणाम होतो तो पोटावर. पोटामध्ये कधीही काहीही ढकलत राहिलं तर आपल्याला अन्न पचन होण्यास त्रास होतो आणि त्यामुळे जेवल्यानंतर पोट फुगल्याची समस्या अनेक जणांना जाणवल्याचं तुम्ही ऐकलं असेल. तुम्हीही त्यापैकी एक आहात का? तुम्हालाही जेवल्यानंतर पोट फुगल्याचा त्रास होतो का? असा त्रास असेल तर वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हा त्रास संपूर्ण शरीराशी निगडीत आहे. याचा परिणाम काळानुरूप सर्व शरीरावर होत असतो. आपण बऱ्याचदा अनियमितपणे जेवतो, जंकफूडचा भडिमार असतो. तसंच आजकाल बऱ्याचदा बाहेरचे खाणेही वाढले आहे. या सगळ्यामुळे पोट फुगण्याची समस्या जोर धरते. पण त्यावर आपण काही सोपे उपाय करू शकतो आणि ते काय आहेत ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
1. आहारात केळी आणि रताळ्यांचा समावेश करा
Shutterstock
पोटदुखी अथवा पोट फुगण्यावर आपल्याकडे भारतीय आहार पद्धतीमध्ये अनेक गोष्टींचा पूर्वापार समावेश करण्यात आला आहे. आपल्या आहारामध्ये आपण केळी, रताळी अशा पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा समावशे करून घेतला तर त्याचा फायदा होतो. पोटामध्ये जास्त जागा व्यापत असल्याची भावना निर्माण करणारे पदार्थ यांच्या सेवनाने द्रवपदार्थांच्या मार्फत शरीरातून सहजपणे बाहेर फेकले जातात. त्यामुळे या पदार्थांचा वापर आपल्या आहारात नक्की करा आणि आपल्या पोट फुगण्याची समस्या दूर करा.
पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई
2. सकाळच्या नाश्त्यामध्ये खा अधिक प्रोटीन
Shutterstock
बरेच जण सकाळी वेळ नाही म्हणून नाश्ता करत नाहीत. पण हे अत्यंत चुकीचे आहे. सकाळी वेळ काढून तुम्ही नाश्ता करायला हवा. इतकंच नाही सकाळचा नाश्ता हा भरपेट करायला हवा. यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा तुम्ही समावेश करून घ्या. असं केल्याने दुपारचं जेवण अतिरिक्त प्रमाणात जेवलं जात नाही. सकाळीच पोट व्यवस्थित भरले असेल तर तुम्ही दुपारी आपोआपच कमी जेवता त्यामुळे जेवण अति होऊन पोट फुगण्याची समस्या निर्माण होत नाही. त्याप्रमाणेच रात्रीचे जेवणही हलकेच घ्या. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहून तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. तसंच सकाळचा नाश्ता चुकवला तर तुम्ही पोटदुखीला आमंत्रण स्वतःहून देता. त्यामुळे असं करू नका.
चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस
3. व्यायामाचीही असू द्या सोबत
Shutterstock
परिपूर्ण आहारासह तुम्ही शरीराला योग्य व्यायामाचीही सवय लावा. शरीराच्या योग्य समतोलासाठी आहार आणि व्यायाम यांच्यामध्ये समतोल असायला हवा. शरीराची हालचाल झाल्यावरच अन्नाचे पचन योग्यरित्या होते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी तुम्ही नियमित योगा अथवा नियमित काही व्यायामाची अथवा किमान रोज अर्धा तास चालण्याची सवय लावून घ्यायला हवी. व्यायाम करणे म्हणजे केवळ जिमला जाऊन घाम गाळणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर तुम्ही रोज काही वेळ बागेत फिरायला जा. अथवा घरातील काही कामं अशी करा ज्यामुळे तुमच्या शरीराला व्यायाम मिळेल. जेवल्यानंतर त्वरीत जाऊन बसलात अथवा काहीही काम केलं नाह तर तुम्हाला पोट फुगण्याचा आणि पोटातील चरबी वाढण्याचा त्रास सुरू होतो.
पोटावरील चरबी घटवण्यासाठी करा 4 सोपे उपाय
4. पाणी पिण्याची गरज
Shutterstock
पाणी व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात पिण्याची गरज आहे. अन्नाचे पचन होण्यासाठी पाणी पिण्याची क्रिया योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे. पण एकाच वेळी बाटलीभर पाणी पिऊ नका. त्याने नक्कीच पोट फुगू शकते. त्यामुळे दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने किमान दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितके तुम्ही डिटॉक्स व्हाल हे लक्षात घ्या.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.