जेवणानंतर ढेकर आला की, जेवण एकदम मस्त झालं असा आपल्या सगळ्यांचा समज आहे. पोट भरल्यानंतर ढेकर येणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण जेवणानंतर काही तासांनी ढेकर येण्याचा त्रास काहींना तसाच सुरु राहतो. सुरुवातीला सतत ढेकर येणे आणि मग या ढेकरांचे रुपांतर करपट ढेकरांमध्ये होणे. असे करता करता कधी डोकेदुखीला सुरुवात होते हे आपल्यालाही अनेकदा कळत नाही. जेवणानंतर अशाप्रकारे सतत ढेकर येण्याचा त्रास तुम्हाला होत असेल त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत असेल तर अगदी साध्या सोप्या घरगुती उपायांनी तुम्हाला यापासून सुटका मिळवता येईल. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला त्या त्रासातून काहीच मिनिटात सुटका होईल शिवाय पुन्हा हा त्रास होऊ नये यासाठीही हे उपाय आहेत फारच फायदेशीर.चला करुया सुरुवात
पाचक गोळ्या
जेवणाच्या काही वेळानंतर जर तुम्हाला असा त्रास सुरु झाला. तुम्हाला असह्य वाटायला लागले असेल तर लगेचच एखादी पाचक गोळी चघळायला घ्या. अशावेळी पटकन पाणी प्यायला जाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला उलटी होण्याची शक्यता असते. पाचक गोळ्या घाऊन थोडे चाला. असे करताना तुम्हाला वारंवार ढेकर येतील पण तुम्हाला त्यामुळे बरे वाटेल. पाचक गोळ्या या घरीही बनवता येतात किंवा तुम्हाला रेडीमेडही अशा पाचक गोळ्या मिळतात.
टिप: पाचक गोळ्या कारण नसताना खाऊ नका. कारण त्यामुळेही तुम्हाला त्रास होऊ शकतो.
घरच्या घरी तयार करा चिंचेच्या पाचक गोळ्या
पाचक लिक्वीड
अन्न पटकन पचावे यासाठी काही लिक्वीडही मिळतात. एखादे जेवण फार जड झाले असेल किंवा अन्न पचण्यास जड वाटत असेल तर अशावेळी अनेकदा ढेकर येतात. हे ढेकर पोट भरल्याचे नसतात. तर अन्न पचत नसल्यामुळे हा त्रास होतो. सतत ढेकर आल्यामुळे असह्य वाटायला लागते. सतत लागोपाठ ढेकर आल्यामुळे पोटदुखी आणि डोकेदुखी होते. ही डोकेदुखी कोणत्याही बाम किंवा डोकेदुखीच्या औषधामुळे बरी होत नाही. ज्यावेळी पोटाचे गणित चांगले होते. त्यावेळीच हा त्रास कमी होतो. अनेक चांगली पाचक लिक्वीड मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लिक्वीड निवडू शकता.
पुदिना पाणी
पुदिन्यामधील पाचक घटक हे पोटांच्या आरोग्यासाठी फारच चांगले असतात. जर तुम्हाला अन्न पचनाचा त्रास कायमच होत असेल तर तुम्ही प्रत्येक जेवणानंतर पुदिन्याच्या पाण्याचे सेवन करा. पुदिना आणि लिंबाचे पाणी प्यायल्यामुळे अन्न पचते. अन्न सुलभपणे पचल्यामुळे तुम्हाला ढेकर येण्याचा त्रास होत नही. पुदिन्याचे पाणी तयार करणे फारच सोपे आहे. पुदिना- लिंबू- साखर एकत्र करुन उकळून घ्या. लिंबाच्या सरबताप्रमाणे प्या तुम्हाला आराम मिळेल.
पोट जड झाल्यासारखे वाटत असेल तर प्या हे पाचक ड्रिंक्स
बसण्याची पद्धत
जेवल्यानंतर अनेकांची बसण्याची पद्धतही चुकीची असते. जेवल्यानंतर पोटाची घडी करुन बसणे किंवा झोपणे यामुळेही अन्न पचण्याची क्रिया मंदावते. जर तुम्हाला ही घाणेरडी सवय असेल तर तुम्ही ती सवय आताच बदला. कारण बरेचदा फोन पाहण्याच्या नादात आणि घाईने कामाला पुन्हा कामाला बसण्याच्या गडबडीत आपण चुकीच्या पद्धतीने बसतो आणि मग अन्न पचनाचा त्रास आपल्याला होऊ लागतो.
आता तुम्हाला जेवल्यानंतर असा ढेकर येण्याचा असा त्रास होत असेल तर तुम्ही आताच ही सवय बदला.
अन्न चावून खा… अन्यथा होतील हे त्रास