उन्हाळ्यात शरीराची लाही लाही झालेली असते. अशावेळी शरीर कुल ठेवण्यासोबतच त्वचा कुल ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते. तुम्हालाही घरी आल्यानंतर किमान चेहरा कुल राहावा असे वाटत असेल तर आम्ही तुम्हाला काहीखास ट्रिक सांगणार आहोत. घरी आल्यानंतर किंवा रात्री झोपताना तुम्ही चेहरा या काही उपायांनी थंड ठेवू शकता. त्यामुळे तुमची त्वचा उन्हाळ्याता काळवंडणार नाही शिवाय तुमची त्वचा या दिवसात चांगली राहण्यासही मदत मिळेल. हे उपाय करणे एकदम सोपे आहेत. तुम्हाला अगदी कुठेही या सगळ्या गोष्टी मिळू शकतील. चला जाणून घेऊया चेहऱ्याला कुल ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्स
काकडी कुलर

काकडी ही या सीझनमध्ये थंडावा देण्यासाठी एकदम छान आहे. घरी काकडी आणल्यानंतर ती कडू निघाली असेल तर अशी काकडी अजिबात फेकून देऊ नका. तुम्ही ही काकडी घेऊन किसा आणि ती थेट तुमच्या चेहऱ्याला लावा. असे केल्यामुळे तुम्हाला थंडावा मिळू शकतो. काकडीचा किस घेऊन त्यामध्ये तुम्हाला काहीही लावण्याची गरज नाही. काकडीचा मूळ स्वभावच थंडावा देण्याचा असतो. त्यामुळे तुम्हाला काकडीचा काहीही त्रास होत नाही. काकडीमुळे त्वचेवरील टॅन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेवर आलेल्या रॅशेशही कमी होण्यास मदत मिळते.
नारळपाणी
नारळपाणी हे देखील थंड असते. नारळाचे पाणी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून चेहरा धुतला तरी चालू शकतो. नारळपाणी घेऊन तुम्ही त्याने चेहरा धुतला तरी देखील चेहऱ्याची झालेली लाही लाही कमी होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर तुम्ही नारळपाणी घेऊन त्यामध्ये तुमच्या आवडीचा फेसपॅक घेऊ शकता. तो घालून तुम्ही तो एकत्र करुन चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक चांगला होण्यास मदत मिळते. नारळपाणी आणल्यानंतर आठवड्यातून एकदा तुम्ही हे ट्राय करु शकता. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते.
ताक

ताकाचा उपयोग देखील अनेक जण चेहऱ्यचा कुलर म्हणूून वापरला जातो. चेहरा ताकाने धुतला तर चेहऱ्याला थंडावा मिळतो. शिवाय चेहऱ्याला खरी चकाकी मिळण्यास देखील ताकामुळे मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास ताकाचा उपयोग करुन चेहरा स्वच्छ करायला हवा. उन्हाळ्याता तुम्हाला ताकाचा वापर करुन चेहरा अधिक तुकतुकीत आणि चांगला करता येऊ शकतो. त्यामुळे नक्कीच याचा प्रयोग एकदा करुन बघू शकता. ताक हे या दिवसात अगदी आवर्जून प्यायले जाते. पण चेहऱ्याला लावताना ताकामध्ये मीठ देखील असता कामा नये.
संत्र्याचा अर्क
उन्हाळ्याच्या दिवसात अनेक छोटी संत्री बाजारात मिळतात. अशी संत्री देखील तुम्हाला थेट चेहऱ्याला लावता येतात. त्यामुळे तुम्ही अशी संत्री आणून चेहऱ्याला लावाय चेहऱ्याला तुम्ही संत्र्याचा अर्क लावा. संत्र्यामुळे चेहऱ्याला व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे त्वचा कुल राहण्यास ही मदत मिळते.
आता उन्हाळ्यात चेहऱ्याला कुल ठेवण्यासाठी तुम्ही नक्कीच हे काही उपाय करायला काहीच हरकत नाही