प्रत्येकाचे केस हे वेगळे असतात आणि काही काळानंतर प्रत्येक माणसाच्या केसांमध्ये बदलही होत असतो. पांढऱ्या केसांपासून सुटका मिळविण्यासाठी सर्वात उत्तम आणि नैसर्गिक उपाय म्हणजे मेंदी लावणे. याशिवाय मेंदीच्या वापराने केस अधिक चमकतात. म्हणूनच आपल्या केसांसाठी महिला मेंदीचा उपयोग करतात. मेंदी अतिशय थंड असून अंगातील उष्णता कमी करण्यासाठीही मदत करते. पण काही जणांना मेंदी लावल्यानंतर केस कोरडे होण्याचा त्रास होतो. तसंच यामुळे केसगळतीचा त्रासही होतो. त्यामुळे मेंदी लावल्यानंतर जर केस कोरडे पडत असतील तर याची विशेष काळजी घेतली पाहिजे. केवळ केस धुणे हा एकमेव उपाय नाही तर यासह काही सोप्या टिप्स फॉलो करणंही गरजेचं आहे.
केसांना मेंदी लावण्याची पद्धत
Shutterstock
केसांना केवळ मेंदी न लावता त्यामध्ये काही घटक समाविष्ट करणे गरजेचे आहे. मेंदीमध्ये अंडे, आवळा, कॉफी पावडर अशा काही गोष्टींचा समावेश करून घ्या. यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या केसांसाठी योग्य नसेल तर ती तुम्ही वापरू नका. वास्तविक या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत. त्यामुळे याचा उपयोग केल्याने केसांना पोषणच मिळते. तुमचा स्काल्प तेलकट (ऑईली) असेल तर अंड्याच्या जागी तुम्ही यामध्ये दही मिक्स करून घेऊ शकता. मेंदीचा पॅक केसांना लावा आणि रात्रभर केसांवर तसंच ठेवा. तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर मात्र तुम्ही सकाळी दोन ते तीन तास मेंदी लावा आणि ठेवा.
केसांना हवा तसा रंग द्यायचा असेल तर मेंदी अशी तयार करा
मेंदी लावण्यापूर्वी लावा तेल
Shutterstock
मेंदी केसांना लावण्यापूर्वी केसांना व्यवस्थित तेल लावा आणि मसाज करा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही नारळाच्या तेलाऐवजी मोहरीचे तेलही लावू शकता. मेंदीच्या हेअर पॅकमध्ये मोहरीचे तेल मिक्स केल्यास, तुम्हाला अगदी मुळापासून केसांना पोषण मिळते.
हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या
मेंदी केसांना लावा आणि मग अशा प्रकारे धुवा
Shutterstock
मेंदी केसांना लावल्यानंतर शँपू करू नका. 12 तासानंतर तुम्ही शँपूने केस धुवा. त्याआधी केसांना पाण्याने धुवा. तुमच्या स्काल्पमध्ये खाज येत असेल तर अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एक बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात एक चमचा अॅप्पल साईड व्हिनेगर घाला आणि मग या पाण्याने केस धुवा. यामुळे केसाला कोरडेपणा येत नाही.
सुकल्यानंतर केसांना लावा तेल
मेंदी लावल्यानंतर स्काल्प आणि केसांना तेलाने मसाज करा. यासाठी तुम्ही नारळ तेलाचा वापर करू शकता. बऱ्याचदा मेंदी स्काल्पमध्ये रूतून बसते. त्यामुळे खाजही येते. पण तेल लावा आणि पाच मिनिट्स मसाज करा. त्यानंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवा आणि तो पिळून केसांना लावा. हा प्रयोग तुम्ही साधारण 3-4 वेळा करा. मेंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शँपूने केस धुवा आणि कंडिशनर लावा.
मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी
झोपताना केसांना लावा कॉटनचा कपडा
रात्री झोपताना मेंदीचा रंग तुमच्या उशीला लागू नये यासाठी तुम्ही कॉटनचा कपडा लावा. तसंच तुमचे केस कोरडे होऊ नयेत यासाठी याचा वापर करणे योग्य ठरते. मेंदीचा रंग उतरत नाही आणि केसही मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक