आपल्याकडे विशेषतः मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ अशा कुटुंबांमध्ये पूजाकार्याला खूपच महत्त्व देण्यात येते आणि त्यातही सर्वात जास्त महत्त्व देण्यात येते ते म्हणजे शंखाला. आपल्याला नेहमी आजूबाजूच्या घरातून आरती आणि शंखाचे आवाज ऐकू येत असतात. शंखाच्या आवाजाने एक प्रकारे नक्कीच समाधान मिळते. पूजाअर्चा करून झाल्यावर शंखाचा नाद हा खूपच छान वाटतो. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी घराच्या आसपास एखादे मंदीर असेल तर हा नाद कानाला सुखद वाटतो. आपल्या घरातही शंख असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा वापर करत असाल. पण बऱ्याचदा घरातील शंखाच्या स्वच्छतेचा त्रास होतो. कारण शंखाचा असणारा आकार हा थोडा वेगळा असतो आणि मग त्यामध्ये आतापर्यंत स्वच्छता करता येत नाही. पण तुम्हालाही नियमित घरातील शंखाची स्वच्छता अप्रतिम करायची असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या काही टिप्स नक्की वाचू शकता. यांचा वापर करून तुम्ही तुमच्या देवघरातील शंखाची स्वच्छता करा.
पहिल्यांदा करा तयारी
अन्य गोष्टींच्या तुलनेत शंखाची स्वच्छता करताना खूपच लक्ष देऊन काम करावे लागते. शंखामध्ये पाणी घातलं धुतलं आणि त्याची स्वच्छता केली असं होत नाही. शंखाची स्वच्छता करताना तुम्हाला पहिल्यांदा काही सामानाची तयारी करून घ्यावी लागते. आता म्हणजे नक्की काय सामान असा प्रश्न तुम्हाला पडणार हे निश्चित. तर शंखाची स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला शेव्हिंग क्रिम, बेकिंग सोडा, अॅप्पल साईड व्हिनेगर, लिंबाचा रस, नेलपेंट रिमूव्हर, ब्रश आणि स्वच्छ कॉटन अर्थात सुती कपडा या गोष्टींची तयारी करून घ्यायला हवी. यामुळे तुम्ही अगदी सहज शंखाची स्वच्छता करू शकता.
शेव्हिंग क्रिमचा करा वापर
Freepik
यासाठी सर्वात पहिले तुम्ही एका स्वच्छ भांड्यात शेव्हिंग क्रिम काढून घ्या आणि मग त्यात दोन कप पाणी घालून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणात तुम्ही शंख साधारण 5 मिनिट्स बुडवून ठेवा. त्यानंतर बाहेर काढून शंख उपडा करून ठेवा. त्यानंतर सॉफ्ट ब्रशने तुम्ही शंख आतून आणि बाहेरून घासून घ्या. ब्रशने स्वच्छ करून झाल्यावर स्वच्छ कपड्याने पुसा. तुमचा शंख तुम्हाला पहिल्या तुलनेत अधिक चमकदार आणि स्वच्छ दिसून येईल. तसंच आतूनही हा अत्यंत स्वच्छ होतो.
नेलपेंट रिमूव्हर आहे उत्तम क्लिनर
नेलपेंट रिमूव्हर हे उत्तम क्लिनर म्हणून वापरता येते. काही शंख असे असतात ज्यावर चित्र असतात अथवा काही शब्द लिहिलेले असतात. या चित्रांच्या मधल्या भागामध्ये धूळ साचते त्यामुळे शंख दिसायला खराब दिसतो. तुम्ही या खोचांमधून घाण काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करू शकता. याच्या वापराने तुम्हाला पटकन चांगला परिणाम दिसून येतो. यसाठी तुम्ही कापूस नेलपेंट रिमूव्हरमध्ये बुडवा आणि अगदी आरामात या खाचांमधून पुसून काढा. आतमधील घाण यामुळे निघायला मदत मिळते.
व्हिनेगर आणि लिंबाचा वापर
Shutterstock
व्हिनेगर आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही शंखाची स्वच्छता करा. त्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि व्हिनेगर एकत्र मिक्स करून घ्या. आता यामध्ये कापसाचा लहानसा बोळा बुडवा आणि त्याने शंखाची स्वच्छता करा. याशिवाय तुम्ही याचे जास्त प्रमाण घेऊन त्यामध्ये शंख काही वेळ बुडवूही ठेऊ शकता. त्यानंतर 10 मिनिट्सने तुम्ही कापूस अथवा ब्रशने व्यवस्थित साफ करून घ्या. व्हिनेगरचे अनेक उपयोग होतात.
लिंबू आणि बेकिंग सोड्याचा करा असा उपयोग
Shutterstock
लिंबू आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण हे शंखाचीच नाही तर घरातील अनेक गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी फायदेशीर ठरते. शंखाची स्वच्छता करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही समप्रमाणात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा याचे प्रमाण घअया. आता हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये शंख काही वेळ ठेवा. नंतर त्यातून शंख काढा ब्रशने त्याची स्वच्छता करा. त्यानंतर पाण्यात धुवा आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करा. याशिवाय तुम्ही हायड्रोजन पॅराक्साईड, सर्फ अथवा साबणानेही शंखाची स्वच्छता करू शकता. तुम्हाला केवळ याची संपूर्ण स्वच्छता हवी असेल तर आम्ही सांगितलेल्या टिप्सचा तुम्ही नक्की वापर करून पाहा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक