थंडी बऱ्याच जणांना आवडते, कारण या ऋतूमध्ये गरम कपड्यांसह कम्फर्टेबल खाणे खायला मिळते. पण यासह आरोग्यासंबंधित काही समस्यांनाही सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला यासह थंडीच्या दिवसात नेहमी तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढत तर नाही ना याकडे लक्ष द्यावे लागते. थंडीच्या दिवसात येणारा आळस मधुमेही व्यक्तींच्या डाएटमध्ये तफावत आणतो आणि त्यामुळे ब्लड शुगर वाढते अर्थात रक्तातील साखरेची पातळी वाढते. मग मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची तब्बेत खराब होते आणि मग ब्लड शुगरला आवरा अशी म्हणण्याची वेळ येते. पण आम्ही दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ब्लड शुगरला नक्कीच आवरू शकता.
प्लांट बेस्ड पदार्थांचा पर्याय निवडा
हा एक अत्यंत सोपा पर्याय आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी फायदा करून घेऊ शकता. तुम्ही आपल्या डाएटमध्ये प्लांट बेस्ड फूडचा समावेश करून घेता येईल हे नक्की पाहा. उदाहरणार्थ तुम्ही जर हॉट चॉकलेट अथवा कॉफी – चहा पित असाल तर तुम्ही त्याऐवजी ग्रीन टी पिऊ शकता. तसंच संध्याकाळी लागणाऱ्या भूकेच्या वेळी तुम्ही भूक शमविण्यासाठी गरम व्हेज सूप प्या. एका शोधानुसार, ज्या व्यक्ती प्लांट बेस्ड फूडचा समावेश करून घेतात, त्यांना मधुमेहाच्या त्रासापासून दूर राहण्यास मदत मिळते.
प्रमाणावर ठेवा नियंत्रण
खाणे महत्त्वाचे आहे, पण आपण किती प्रमाणात खातो आहोत, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण आणा आणि लक्ष द्या. वास्तविक आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि ऊर्जायुक्त पदार्थांची आवश्यकता असतो. मात्र ब्लड शुगरवर कार्बोहायड्रेट अधिक परिणाम करते. त्यामुळे तुम्ही जे पदार्थ खात आहात त्यामध्ये योग्य प्रमाणात मॅक्रोन्यूट्रिएंटचे प्रमाण वाढवा आणि आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच गोड पदार्थ अधिक प्रमाणात तुमच्या पोटात जाणार नाहीत याचीही काळजी घ्या. पदार्थांमधून कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात पोटात जाणार नाही याची काळजी मधुमेही व्यक्तींनी घ्यायला हवी.
नियमित व्यायाम करायला हवा
बऱ्याचदा खाण्यानंतर अथवा नियमित व्यायाम करायला अनेक जण कंटाळतात. पण कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिव्हिटी (Physical Activity) अर्थात व्यायाम हा शरीरातील इन्शुलिन लेव्हल व्यवस्थित राखण्यासाठी मदत करतो. तुम्हाला दिवसातून 15 मिनिट्सचा व्यायामही फायदेशीर ठरतो. तुमच्या शरीरातील ग्लुकोजचा स्तर प्रभावित करण्यासाठी आणि अगदी दिवसभर तुमचा मूड अधिक चांगला ठेवण्यासाठी मधुमेही व्यक्तींनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्लड शुगरचा स्तर योग्य प्रमाणात राखण्यासाठी तुम्ही किमान दिवसभरातून काही वेळ चालण्याचा अथवा शारीरिक हालचाली होतील असा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
तणावात राहू नका
तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल की, तुम्ही तणावात असलात की, त्याचा परिणाम हा तुमच्या रक्तातील साखरेवरही होत असतो. पण रक्तातील साखर वाढण्याचे कारण केवळ तणाव आहे असंही नाही. पण तणाव आणि टाईप – 2 मधुमेहाचा संबंध मात्र नक्कीच आहे. वाढलेल्या तणावामुळे कोर्टिसोलचे उत्पादन अधिक होते आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाडते. त्यामुळे तुम्ही अधिक वेळ तणावात राहणार नाही याची काळजी घ्या. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जणांना तणावामुळे अगदी कमी वयातही मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
नियमित ब्लड शुगर लेव्हल तपासत राहा
साधारण थंडीच्या दिवसात ब्लड शुगर लेव्हल ही वाढतेच. कारण या दिवसात अधिक भूक लागते. त्यामुळे खाण्यापिण्यासह रक्तातील साखरेची पातळीदेखील वाढते आणि त्यामुळे तुम्ही नियमित ब्लड शुगरची लेव्हल तपासत राहायला हवी. जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही त्रासाला सामोरे जायला लागू नये.
सूचना – हे सर्व नैसर्गिक उपाय अत्यंत सोपे आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा. तसंच तुमची जी औषधे चालू आहेत ती सोडून घरगुती उपाय स्वतःच्या मनाने करू नका.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक