हिवाळ्यात पंखा, एसी आणि फ्रीजचा वापर झाल्यामुळे वीज बिल वाढतं तर हिवाळ्यात घराला उबदार ठेवण्यासाठी हिटर आणि गरम पाण्यासाठी गिझरचा वापर वाढतो त्यामुळे विजेच्या बिलाच अचानक वाढ होते. वाढत्या महागाईमुळे सध्या सर्वांना पैसे वाचवण्याची अत्यंत गरज आहे. घर खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आधी काही बिलांवर नियंत्रण आणायला हवं. विजेचा वापर नियंत्रणात आणून आपण फक्त विजेचं बिलच कमी करू शकतो असं नाही तर यामुळे राष्ट्रीय संपत्तीचंही सरंक्षण होतं. बिज बिल नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय आणि ट्रिक्स तुम्ही वाापरू शकता. यासाठी जाणून घ्या वीजेचं बिल नियंत्रणात आणण्यासाठी काही सोपे उपाय.
सुर्यप्रकाशाचा पूरेपुर वापर करा –
घर विकत घेणे आणि त्याची सजावट करणे हा निर्णय तुमच्या हातात असतो. त्यामुळे घर विकत घेताना आणि त्याची सजावट करताना घरात पुरेसा सुर्यप्रकाश येईल अशी रचना करा. सुर्यप्रकाश घरात आल्यामुळे घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न राहते. सुर्यप्रकाशामुळे घरातील तापमान नियंत्रणात राहते. शिवाय आपल्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळण्यासाठीदेखील सुर्यप्रकाशाची गरज असते. दिवसभर असा सुर्यप्रकाश घरात येत असेल तर तुम्हाला दिवे लावण्याची अथवा हिवाळ्यात हिटर लावण्याची मुळीच गरज नाही. दिव्यांचा आणि हिटरचा वापर कमी झाल्यामुळे तुमच्या वीजबिलामध्ये खूप फरक जाणवू शकतो.
आर्यन रॉड हिटर वापरू नका –
हिवाळ्यात काही घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी आर्यन रॉडसारखे गिझर वापरण्यात येतात. मुळातच असे हिटर पाणी गरम करण्यासाठी सुरक्षित नसतात शिवाय यामुळे तुमचं वीजेचं बिल वाढतं. यासाठी घरात नामांकित कंपनीचे गिझर लावून घ्या. शिवाय गिझरचा वापर कामापुरताच करा. त्याचप्रमाणे दिवसभर गिझर सुरू ठेवू नका. कारण असं केल्यामुळे तुमचं वीजेचं बिल वाढू शकतं. वेळीच गिझरचे बटण बंद करण्याची सवय स्वतःला लावा.
सोलर ऊर्जेचा वापर करा –
आजकाल सोलर ऊर्जेची साधने आणि त्याचा वापर याविषयी अनेक संशोधने केली जात आहेत. ज्यामुळे तुमच्या सोयीनुसार सौरऊर्जेचा वापर तुम्ही तुमच्या घरासाठी करू शकता. हिवाळ्यात दुपारी सुर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे या काळात या सुर्यप्रकाशाचा वापर योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. पाणी गरम करण्यासाठी, प्रकाशयोजनेसाठी, अन्न शिजवण्यासाठी तुम्ही जर सौर ऊर्जेचा वापर केला तर तुमच्या वीजेच्या बिलाचे खूप पैसे वाचवता येऊ शकतात.
Shutterstock
फ्रिजचा वापर कमी करा –
हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होत नाहीत. अशा काळात तुम्ही फळं, भाज्या फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजबाहेरही व्यवस्थित साठवून ठेवू शकता. फ्रीजचा दरवाजा सतत उघड झाप केल्यामुळे वीजेचं बिल वाढू शकतं. यासाठीच या काळात फ्रीजच्या वापरावर नियंत्रण आणून तुम्ही विजेचं बिल कमी करू शकता.
घरातील वीजेवर चालणाऱ्या साधनांची सर्व्हिंसिंग करून घ्या –
बऱ्याचदा वीजेवर चालणारी साधने काही प्रमाणात नादुरूस्त झाल्यामुळे वीज बिलात वाढ होते. यासाठीच नियमित वीजेवर चालणाऱ्या साधनांची सर्व्हिंसिंग करून घ्या. ज्यामुळे तुमचे वीज बिल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. एसी, पंखे, मिक्सर, ओव्हन वेळच्या वेळी चेक केल्यामुळे वीज बिल कमी करणे नक्कीच शक्य आहे.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत