ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
जेवणात मीठ जास्त झालंय का, मग करा या सोप्या ट्रिक्स

जेवणात मीठ जास्त झालंय का, मग करा या सोप्या ट्रिक्स

जेवण बनवणं ही खरं तर एक कलाच आहे. काहीही केलं आणि जेवणात काहीही मिसळलं असं होत नाही. तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा प्रत्येक पदार्थाचे योग्य प्रमाण तुम्हाला जेवणात लागते. सर्वात महत्वाचे प्रमाण असते ते मीठाचे. नाहीतर आपल्याकडे ‘जेवणात मीठाचा खडा पडला’ ही म्हण रूजलीच नसती. बाकी एकवेळ इथे तिथे पदार्थाचे प्रमाण नक्कीच चालून जाते पण मीठाचे प्रमाण जेवणात जास्त झाले की संपूर्ण जेवणाची चव बिघडते. पण तुम्हाला माहीत आहे का? जेवणाच्या पदार्थांमध्ये मीठ जास्त झाले तर तुम्ही काही सोप्या ट्रिप्स वापरून हा पदार्थ नक्कीच पुन्हा सुधारून खाऊ शकता. आता हे कसं? अर्थात आपल्या गृहिणी काही कच्च्या नाहीत. अगदी मुरलेल्या आहेत. त्यामुळे घरच्या काही सोप्या ट्रिक्स तुम्हाला यासाठी मदत करू शकतात. अशाच काही ट्रिक्सची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

कणीक

कणीक

Shutterstock

आपल्याकडे घरात कणीक नेहमी भिजलेली असते. पोळ्या करण्यासाठी आपण कणीक भिजवून ठेवतो. एखाद्या पदार्थामध्ये अर्थात आमटी अथवा भाजीमध्ये जर मीठ जास्त झाले तर तुम्ही कणकेचे तीन चार लहान गोळे करून घ्या आणि ते आमटी अथवा भाजीच्या रसामध्ये मिक्स करा. यामुळे भाजी अथवा आमटीमध्ये जास्त झालेले मीठ कमी होण्यास मदत मिळते. मीठाचा खार कणकेमध्ये मुरल्यामुळे त्याचा खारटपणा कमी होतो आणि पुन्हा तो पदार्थ तुम्ही खाऊ शकता. 

ADVERTISEMENT

तूप

तूप

Shutterstock

कोणत्याही पदार्थामध्ये जर मीठ जास्त झालं तर तुम्ही त्या पदार्थांमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालू शकता. यामुळे मीठाचे प्रमाणात संतुलित राहण्यास मदत मिळते. तुपामुले मीठाचा खारटपणा कमी होतो. 

तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची

ADVERTISEMENT

बेसन

बेसन

Shutterstock

स्वयंपाकघरात बेसन नसेल असं कधीही होत नाही. त्यामुळे एखाद्या पदार्थांमध्ये मीठ जास्त झालं तर तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. बेसन भाजी आणि आमटीमधील अधिक असणारे मीठ शोषून घेते आणि पुन्हा पदार्थ खाण्याइतपत व्यवस्थित करते. बेसन नसेल तर भिजलेली चणाडाळदेखील तुमच्या पदार्थातील मीठ कमी करण्यास उपयोगी ठरते. 

दही

दही

ADVERTISEMENT

Shutterstock

कोणत्याही पदार्थात मीठ जास्त झालं तर तुम्ही दह्याचाही वापर करू शकता. तुम्ही साधारण दोन ते तीन चमचे दही (गोड दही आणि आंबट दही चव बघून घ्या) पदार्थ कोणता आहे ते पाहून तुम्ही याचा वापर करू शकता. आमटी अथवा कोणतीही रसभाजी असेल तर तुम्ही दह्याचा वापर करून मीठाचे प्रमाण कमी करू शकता. एखाद्या पालेभाजीमध्ये मात्र याचा वापर करू नका.  

हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

ब्रेड

ब्रेड

ADVERTISEMENT

Shutterstock

ब्रेडचे काठ सहसा आपण खात नाही. पण जेवणामध्ये मीठ जास्त झाले तर हा ब्रेड आणि त्याचे काठ आपल्या नक्कीच उपयोगी ठरतात. ब्रेडचे काठ तुम्ही तुकडे करून रसामध्ये टाकले अथवा आमटीमध्ये टाकले तर पदार्थांमध्ये जास्त झालेले मीठ शोषून घेण्यास ब्रेडची मदत होते. ब्रेडमध्ये मीठ पटकन शोषून घेतले जाते आणि मग पदार्थ खाण्यालायक होतो. त्यामुळे तुम्ही ट्रिकदेखील नक्की करून पाहू शकता. 

काजूची पेस्ट

पदार्थांमधील मीठाचा खारटपणा कमी करायचा असेल तर काजूची पेस्टही तुम्हाला उपयोगी ठरते. बऱ्याच पंजाबी भाज्यांमध्ये याचा उपयोग केला जातो. पण तुम्ही एक चमचा काजूच्या पेस्टच्या उपयोग घरातील वेगळ्या भाजीमधील मीठाचा खारटपणा कमी करण्यासाठीही करू शकता. 

मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT