ADVERTISEMENT
home / आरोग्य
चायनीज पदार्थ लहान मुलांना अजिबात भरवू नका

लहान मुलांना चायनीजची सवय लावणे पडू शकते महागात

हल्ली लहान मुलांना चटपटीत पदार्थ खायला आवडतात. त्यांना घरी केलेला वरण- भात किंवा भाजी पोळी नकोशा होतात. पण त्यांना तिखट आणि तळलेले पदार्थ दिसे तर असे पदार्थ मुलं मटामट गिळतात. हल्ली अगदी एक वर्षाचे मुलं देखील असे चटपटीत पदार्थ खाण्याच्या आहारी गेलेले आहेत. तिखट किंवा कितीही जड आणि खायला कठीण असे पदार्थ असले तरी ते लहान बाळांकडून खाल्ले जातात. भारतात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे ‘चायनीज’ चीनमध्येही जसे बनवले जात नाही तसे चायनीज भारतात मिळते. भारतात मिळणारे चायनीज चटपटीत आणि चटकदार असते. पण लहान मुलांना याची सवय लावणे महागात पडू शकते. लहान मुलांना त्याचा काय त्रास होऊ शकतो ते जाणून घेऊया.

पोट बिघडणे

पोट बिघडणे

लहान मुलांचे पोट लगेच बिघडते. चायनीजमध्ये इतके मसाले असतात की, त्यामुळे त्यांचे पोट लगेच बिघडू शकते. त्याची थोडी वेगळी चव असल्यामुळे ते खाण्याची इच्छा मुलांना होते. अनेकदा मुलं घरचं खात नाहीत. पण हे पदार्थ खातात म्हटल्यावर डोक्याला ताप म्हणून त्यांना आवडीचे पदार्थ देतात. पण त्यामुळे मुलांना जुलाब होण्याची शक्यता असते. लहान मुलांना पोट बिघण्याचा त्रास झाला की, तो निस्तरताना अधिक त्रास होतो. त्यामुळे चायनीज खाण्याची सवय लागली असेल तर ती सवय आताच सोडून द्या

शौचाला त्रास होणे

चायनीज पदार्थ घरी जरी बनवले तरी देखील आपण त्यामध्ये व्हिनेगर आणि वेगवेगळे सॉस घालतो. या सॉसमध्ये असलेले घटक लहान मुलांच्या पोटासाठी अजिबात चांगले नसतात. त्यामुळे मुलांचे पोट बिघडू शकतेच. पण काहींना त्यामुळे शी शी न होण्याचा त्रास देखील होऊ लागतो. खूप जणांना अशावेळात पोट साफ होत नाही. चायनीज चटपटीत असते की, त्यानंतर जर योग्य प्रमाणात पाणी प्यायले गेले नाही तरी देखील त्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मुलांच्या पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही नक्कीच असे पदार्थ वगळायला हवेत.

मुलांना आवड असले तरी हे स्नॅक्स अजिबात देऊ नका

ADVERTISEMENT

तोंड फुटणे

चटपटीत पदार्थ खाल्ल्यामुळे अगदी मोठ्यांनाही होणारा त्रास म्हणजे तोंड फुटणे. यालाच आपण अल्सर असे म्हणतो. मोठ्यांना अल्सर झाला तर त्यांना सांगता येते. पण लहान मुलांना ते सांगता येत नाही. त्यामुळे ते खूप चिडचिड करु लागतात. त्यांना रोजचे जेवण खाता देखील येत नाही. अल्सरचा त्रास सतत होणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही या सगळ्या गोष्टी देणे थांबवा. त्यामुळे तुमच्या मुलाचे आरोग्य धोक्यात येते. असा त्रास झाला असेल तर मुलांना तूप खायला द्या त्यामुळे त्यांना आराम मिळण्यास मदत मिळेल.

लहान मुलांच्या आहारात चांगल्या गोष्टी असणे फारच गरजेचे असते. बरेचदा लहानपणी लावलेल्या या सवयी मोठेपणी अधिक त्रासदायक ठरु शकतात. लहान मुलांमधील स्थुलपणा हा देखील यासाठी कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्या.

29 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT