ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
घाईघाईत जेवण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या दुष्परिणाम

घाईघाईत जेवण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या दुष्परिणाम

धकाधकीचे जीवन आणि कामाची चिंता यामुळे सध्या माणसाला निवांतपणे जेवण्यासही पुरेसा वेळ नसतो. दिवसभरात सुरू असलेल्या धावपळीत भुक लागल्यावर मग भरभर काहितरी पोटात ढकलायचं आणि पुन्हा पुढच्या कामाला सुरुवात करायची असाच अनेकांचा दिनक्रम असतो. या सवयीचा परिणाम इतका होतो की एखाद्या दिवशी निवांत वेळ असला तरी आपण जेवण लवकरच आटोपतो. असं घाईघाईत जेवणं आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. यासाठी जाणून घ्या भरभर जेवण्याचा तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो.

अन्नाचे अती सेवन –

पटपट जेवण्याच्या सवयीमुळे तुम्हाला तुमच्या पोटाचे संकेत समजत नाहीत. ज्यामुळे लवकर भुक लागू नये यासाठी तुम्ही प्रमाणापेक्षा अती खाता. ओव्हर इटिंगचे आपल्या शरीरावर हळू हळू परिणाम दिसू लागतात. अचानक वजन वाढणं आणि आरोग्य समस्या डोकं वर काढणं हे प्रमाणापेक्षा जास्त जेवण्याची लक्षणं आहेत. घाईघाईत जेवण्यामुळे तुम्हाला तुमच्या पोटाचा नीट अंदाज येत नाही आणि तुम्ही जास्त जेवता.

लठ्ठपणा –

आजकाल लठ्ठपणा ही अनेकांसाठी मोठी समस्या होऊ बसली आहे. घाईघाईत जेवण्यामुळे तुम्ही काय आणि किती खाता यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जात नाही. भुक लागल्यावर खावून घ्यायचं हेच तुमचा उद्दिष्ट असतं. कामाच्या गडबडीत अशा गोष्टींकडे फार लक्ष द्यायला मिळत नाही. पण त्यामुळे तुमच्या शरीरावर मात्र याचे परिणाम दिसू लागतात. अती प्रमाणात चुकीचे पदार्थ नियमित खाण्यामुळे तुमचे वजन अती प्रमाणात वाढते.

पचनक्रियेत बिघाड –

कामाच्या गडबडीत पटापट खाण्यासाठी तुम्ही मोठे मोठे घास तोंडात भरता. ज्यामुळे तुमचा कामाचा वेळ वाचेल असं तुम्हाला वाटतं. मात्र मोठे मोठे  घास भरभर पोटात ढकलल्यामुळे ते व्यवस्थित चावून खाल्ले जात नाहीत. अन्नपदार्थ नीट पचण्यासाठी प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा असं सांगितलं जातं. मात्र बत्तीस वेळा चावण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसतो. ज्यामुळे तुम्ही घाईघाईत जेवता आणि तुम्ही खाल्लेले अन्न नीट पचत नाही. असं नेहमी जेवण्यामुळे हळू हळू तुमची पचनक्रिया बिघडते आणि तुम्हाला पचनाच्या समस्या निर्माण होतात. 

ADVERTISEMENT

मधुमेहाचा धोका –

घाईघाईत जेवणाऱ्या लोकांना मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असते. याचं  कारण असं भरभर जेवल्यामुळे तुमच्या शरीरात अचानक रक्तातील साखर वाढते. ज्याचा परिणाम इन्सुलीनला प्रतिरोध होतो आणि तुम्ही मधुमेही होता. मधुमेह हा एक जीवनशैली विकार आहे आणि आज भारतातील दहापैकी प्रत्येकी तीन व्यक्तींना मधुमेह असल्याचं आढळून आलेलं आहे. मधुमेह झाल्यास अनेक  आरोग्य समस्या हळू हळू वाढत जातात. यासाठी वेळीच घाईघाईत जेवण्याची सवय बदला आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.

भारतीय आहार शास्त्रात अन्न हळू हळू आणि कमीत कमी बत्तीस वेळा चावून खाण्यास सांगितले आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार माणसाच्या खाण्यापिण्याच्या अनेक सवयी सध्या बदलत आहेत. ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठीच जीवनशैलीत योग्य ते बदल करण्याची गरज आहे. 

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

रात्री उशीरा जेवायची सवय असेल तर वेळीच तुम्ही सावध व्हा, होईल वजनवाढ

वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

12 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT