ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
झटपट दूर होईल सनटॅन, करा हे घरगुती उपचार

झटपट दूर होईल सनटॅन, करा हे घरगुती उपचार

ऋतू कोणताही असला तरी सूर्य प्रकाशात फिरण्यामुळे त्वचेवर सनटॅनचे डाग दिसू लागतात. सनटॅनमुळे तुमच्या हातावरच नाही तर चेहऱ्यावरही काळे डाग पडतात. हायपर पिगमेंटेशन आणि  सनटॅनमुळे तुमचा चेहरा काळवंडतो. शिवाय एकदा सनटॅन झालं की ते लगेच कमी होत नाही. त्यामुळे ही समस्या अनेक महिने तुम्हाला सहन करावी लागते. बऱ्याचदा उन्हाळ्यात अथवा वेकेशनवर असताना सनटॅन होण्याची शक्यता दाट असते. मात्र आजकाल कोणत्याही ऋतूमध्ये सनटॅन होऊ शकतं. यासाठीच सनस्क्रिन लावण्यासोबत हे काही घरगुती उपाय जरूर करा. ज्यामुळे तुमचे सनटॅन लवकर कमी होईल. 

सनटॅनसाठी घरगुती उपाय –

सनटॅन पटकन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरू शकतात. 

कोरफडाचा गर –

कोरफडाच्या गरामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर आश्चर्यकारक फरक दिसून येतो. यासाठीच जर तुम्हाला सनटॅन झाले असेल तर त्वचेवर कोरफडाचा गर लावा. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर कोरफडाचा गर लावा आणि सकाळी चेहरा धुवून टाका. जर तुम्हाला रात्रभर कोरफडाचा गर लावायचा नसेल तर कमीत कमी अर्धा तास हा गर चेहऱ्यावर ठेवा. कोरफडाच्या गरामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेचा काळसरपणा कमी होतो. हे ही वाचा सनबर्न कमी करण्यासाठी काय वापरावं, नारळाचे तेल की कोरफडाचा गर

नारळाचे दूध – 

सूर्य किरणांमुळे रापलेली त्वचा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी नारळाचे दूध अतिशय उपयुक्त ठरते.नारळाच्या दुधात त्वचेचे पोषण करणारे आणि त्वचेला हायड्रेट ठेवणारे गुण असतात. नारळाच्या तेलामधील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. सनटॅन कमी करण्यासाठी नारळाचे दूध नक्कीच प्रभावी उपाय ठरू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर कापसाच्या मदतीने नारळाचे दूध लावा. त्वचेवर ते सुकल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. बहुगुणी आहे नारळाचे दूध,असा करा वापर (Coconut Milk Uses In Marathi)

ADVERTISEMENT

केशरयुक्त दूध –

केसरमध्ये त्वचेला उजळ करणारे गुणधर्म असतात. यासाठी प्राचीन काळापासून त्वचेवर केसराचा उपयोग केला जातो. दूधात केसर मिसळून त्वचेला लावण्यामुळे त्वचेवरील सनटॅनमुळे झालेले काळे डाग कमी  होतात. केशराचे दूध यासाठी नियमित चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

दही आणि मध –

दही सनटॅनसाठी एक नैसर्गिक डि टॅन पॅक प्रमाणे काम करते. दह्यामध्ये त्वचा मुळापासून स्वच्छ करणारे गुणधर्म असतात. दह्यात मध मिसळल्यामुळे त्वचेवर आणखी चांगला परिणाम होतो. कारण मध हे अॅंटि इनफ्लैमटरी आहे. कडक उन्हामुळे भाजलेल्या त्वचेला मध आणि दह्याच्या मिश्रणामुळे थंडावा मिळतो आणि त्वचा लवकर पूर्ववत होते. यासोबतच पावसाळ्यात भिजण्याआधी अशी तयार करा तुमची त्वचा

चंदन आणि हळद –

चंदन आणि हळद चेहऱ्यावर लावण्यामुळे तुमच्या  त्वचेचं सौदर्य अधिक खुलून येतं. चंदन त्वचेला थंडावा देतं आणि हळदीमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. ज्यामुळे सनटॅन कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो. चंदन आणि हळदीच्या मिश्रणामुळे त्वचा उजळ आणि चमकदार होते.

28 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT