ओठ हा चेहऱ्यावरील असा भाग आहे. जो उठून दिसतो. ओठांना अगदी काहीही लावले तरी देखील त्यामुळे तुमच्या सगळ्या चेहऱ्याचा लुक बदलून जातो. ओठांवर वेगवेगळे प्रयोग करताना ओठ काळवंडण्याची समस्या अनेकांना जाणवते. काळे आणि शुष्क असे ओठ कोणालाही आवडत नाही. इतकेच नाही तर असे ओठ दिसायलाही फारच निस्तेज वाटतात. त्यामुळे तुमचा चेहराही निस्तेज दिसतो. ओठांसाठी असलेल्या लिप क्लिनिंग पद्धतीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नसेल तर आज ओठांसाठी लिप क्लिनिंग म्हणजे नेमके काय असते ते जाणून घेऊया.
ओठांचे क्लिनिंग म्हणजे काय?
जसे तुम्ही चेहऱ्याचे क्लिनिंग करता अगदी त्याच प्रमाणे खास ओठांचे क्लिनिंग करणेही गरजेचे असते. ओठांच्या या क्लिनिंगमध्ये तुम्हाला ओठांची अगदी नाजूकपणे काळजी घ्यावी. लागते. ओठांच्या क्लिनिंगमध्येही स्क्रबिंग, मॉश्चरायझिंग अशा वेगवेगळ्या स्टेप्स येतात.त्यामुळे ओठांची स्वच्छता राखण्यास नक्कीच मदत मिळते.
अशी फॉलो करा लिप क्लिनिंग पद्धत
ओठांची अधिक काळजी घेण्यासाठी जर तुम्हाला ओठांची स्वच्छता करायची असेल तर तुम्ही या खालील स्टेप्स फॉलो करायला हव्यात. चला जाणून घेऊया या स्टेप्स
- क्लिन्झिंग : ओठांना काही लावले असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला ओठ स्वच्छ करुन घ्यायचा आहे. त्यासाठी जर वाईप्स असतील तर फारच चांगले. ओठ वाईप्स करु त्यावरील सगळे पिग्मेंटस काढून घ्या. त्यानंतरच ओठांवर काही प्रयोग करायला घ्या. जर तुम्ही लावलेली लिपस्टिक किंवा ग्लॉस फारच गडद असेल तर अशावेळी तुम्ही त्यावर एखाद्या सॉफ्ट ब्रिसलचा वापर करुन तो काढून टाका.
- स्क्रब: ओठांनाही स्क्रबची गरज असते. एखादी गोष्ट जर क्लिन्झरने निघत नसेल तर तुम्हाला एखादा माईल्ड स्क्रब घेऊन ओठ चांगले घासता येतात. हल्ली बाजारात खास ओठांसाठीही स्क्रब मिळतात. जे स्क्रब तुमच्या ओठांवरी सगळे पिग्मेंट काढून टाकण्यास मदत करतात.क्लिन्झिंगनंतर ही स्टेप फॉलो करायला अजिबात विसरु नका.
- मसाज: स्क्रब केल्यानंतर त्वचा ही अत्यंत नाजूक झालेली असते. अशावेळी काहींच्या ओठांमधून रक्त येणे देखील स्वाभाविक आहे. ओठ फाटले असतील किंवा ओठांतून रक्त येत असेल तर अशावेळी तुम्ही एखादे चांगले क्रिम घेऊन मसाज देखील करु शकता. या मसाजमुळे ओठ छान दिसतात. हल्ली मोठ्या ओठांची फॅशन आहे. सुरकुतलेल्या ओठांपेक्षा मोठे ओठ खूप जणांना आवडतात. त्यामुळे मसाज हा महत्वाचा आहे.
- रात्री झोपताना देखील तुम्ही ओठांना थोडेसे बदाम तेल अथवा तुमच्या आवडीचे कोणतेही तेल लावून बोटांनी मसाज करु शकता. त्यामुळेही त्वचेच्या वरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळेही ओठ हे खूप सुंदर दिसू लागतात.
- हल्ली खास ओठांसाठी पीलिंग देखील केले जाते. या पीलिंगमुळेही ओठ सुंदर होण्यास मदत मिळते. ओठांवरील मृत त्वचा सेफ केमिकल्सच्या माध्यमातून काढले जातात.
आता ओठांसाठी लिप क्लिनिंग करताना या गोष्टी नक्की लक्षात घ्या.