उन्हाळ्यात उष्णतेसोबत डासांचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे या काळात मलेरिआ, चिकनगुनिया, डेंग्यूसारखे डासांमुळे पसरणारे आजारही वाढतात. घरात डासांचे प्रमाण वाढले की ते कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. वास्तविक डास कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय आहेत. मात्र तरिही लोकांना झटपट उपाय हवा असतो, ज्यामुळे घरात सतत मॉसक्वीटो कॉईल जाळणं, डास मारण्याची इलेक्ट्रिक रॅकेट वापरणं असे उपाय केले जातात. डास मारण्यासाठी जी साधनं वापरली जातात, त्यामधून धूर निर्माण होतो. हा धूर फक्त डासांनाच मारत नाही तर त्यामुळे हळू हळू तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. यासाठी डास मारण्याचा उपाय करण्यापूर्वी याबाबत सावध व्हा.
डास मारण्याचे उपाय माणसासाठी घातक
अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, डास मारण्यासाठी वापरण्यात येणारी कॉईल अथवा अगरबत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो. या धुराच्या सतत संपर्कात आल्यामुळे माणसाच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. रूममधील डास मरण्यासाठी आणि नवे डास रूममध्ये न येण्यासाठी तुम्ही घराचे दार आणि खिडक्या बंद करता. अशा बंद खोलीत हा धुर आणि वास अधिक उग्रपणे जाणवतो. काही संशोधनात तर याची तुलना धुम्रपानासोबत करण्यात आलेली आहे. कारण याचा परिणाम धु्म्रपानाप्रमाणेच शरीरावर जाणवतो.
धुर न येणाऱ्या कॉईल्सचा शरीरावर होणारा परिणाम
अनेकांना वाटतं की आम्ही वापरत असलेल्या मॉसक्वीटो कॉईलमधून धूर येत नाही. कारण आजकाल लिक्वीड स्वरूपात अशी साधनं उपलब्ध असतात. मात्र असं असलं तरी त्यातून कार्बन मोनोक्सॉईड निर्माण होत असते. याचाही परिणाम तुमच्या फुफ्फुसांवर होतच असतो. कारण रूम बंद असल्यामुळे तीच हवा तुम्ही सतत तुमच्या शरीरात श्वासावाटे घेत असता. म्हणूनच घरातील डास कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय करा. घराच्या आजूबाजूला पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. घराची बाग अथवा आजूबाजूला असणारी झाडं नियमित स्वच्छ ठेवा. झोपताना घरात मच्छरदाणीचा वापर करा. कापूर, कडूलिंब अथवा इतर नैसर्गिक तेलांच्या वासाने डासांना पळवा.
तुम्ही डास कमी करण्यासाठी कोणते उपाय करता आणि आम्ही दिलेल्या माहितीचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक