आयुष्यात चांगले मित्रमैत्रिणी मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही. कारण चांगले मित्र मैत्रीण तुम्हाला कधीच एकटं सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळात ते तुम्हाला खंबीर साथ देतात, जेव्हा वेळ पडते तेव्हा स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाहीत, तुम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवतात, एवढंच नाही पण तुम्ही आयुष्यात कायम आनंदी कसे राहाल याची काळजी घेतात. म्हणूनच मैत्रीचं नातं जगातील सर्वात बेस्ट नातं समजलं जातं. विशेष म्हणजे तुमचा स्वभाव कसाही असो, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी असा सच्चा मित्र अथवा मैत्रीण असतेच. खरंतर अशा चांगल्या मित्रमैत्रिणींमुळेच या जगात आजवर मैत्री टिकून आहे. मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी जगभरात मैत्री दिन साजरा केला जातो, कारण मैत्री ही एक अशी अद्भूत गोष्ट आहे जी एखाद्याच्या आयुष्याचं सोनं करू शकते. सुदाम्याला जसा कृष्ण भेटला तसा प्रत्येकाला कोणी कोणी तरी खरी साथ देणारा मित्र या जगात असतोच. अशा जीवलग मित्रमैत्रिणींचं एकमेकांवर असलेले निखळ,निस्वार्थी प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे मैत्री दिन… अशा या खास दिवशी तुमच्या आयुष्यातील स्पेशल मित्रमैत्रिणींना पाठवा हे खास भावनिक मैत्री कोट्स (Emotional Friendship Quotes in Marathi) तसंच मित्रांसोबत शेअर करा मस्त मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends, मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश | Birthday Wishes For Friend In Marathi, मित्रमैत्रिणींसाठी स्पेशल गिफ्ट्स (Friendship Day Gift Ideas In Marathi), Friendship Day Quotes In Marathi – मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि कोट्स
भावनिक मैत्री कोट्स | Emotional Friendship Quotes in Marathi
मैत्रीचे बंध न जुळवता जुळतात म्हणूनच ते टिकवून ठेवावे लागतात. तुमच्या आयुष्यातील असेच काही हळुवार रेशमी बंध बांधून ठेवण्यासाठी शेअर करा हे भावनिक मैत्री कोट्स (Emotional Friendship Quotes in Marathi)
1. माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल, पण ती कळल्यावर , तुला माझं वेड लागेल
2. मैत्री करावी दिवाळीतल्या पणतीसारखी, अंधारात प्रकाश देईल आणि सतत तेवत राहील
3. निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो, माणूस एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा बंध हवा असतो
4. आयुष्या नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईकांकडून चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बॅंक बनून तुम्हाला जे वाचवतात ते खरे मित्रमैत्रीण
5. जन्म एका टिंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम त्रिकोणासारखं असतं मात्र मैत्री कायम वर्तुळासारखीच असते कारण तिला कधीच शेवट नसतो.
6.अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो
7. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी आपल्या मैत्रीचा सुंगध सगळ्यांना कायम येत राहील.
8. आपल्यासाठी तोच मित्र खास असतो ज्याबद्दल घरचे म्हणतात, ” याच्यासोबत पुन्हा दिसलास तर तगंड तोडीन”
9. आपल्या सावलीपासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणून आयुष्यभर मैत्रीचं हे रोप असंच जपत राहावं
10. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपले पण सवयी कधीच सुटत नाहीत.
Emotional Athavan Quotes In Marathi
इमोशनल हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स | Emotional Heart Touching Friendship Quotes in Marathi
मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या मनातील अशी एक जागा जिथं जाण्यासाठी कुठलंच बंधन बाळावं लागत नाही. अशाच तुमच्या हक्काच्या मित्रमैत्रिणींना साद घालण्यासाठी वाचा हे इमोशनल हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स ( Emotional Heart Touching Friendship Quotes in Marathi)
1. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री असं म्हणतात
2. जीवनात अशी मैत्रीण मिळवा जी तुमच्या मनातील भावना ओळखेल, जसं मेडिकलमध्ये काम करणाऱ्या लोकांना डॉक्टरचं अक्षर ओळखता येतं.
3.देवा जास्त काही नको पण एक असा मित्र हवा जो माझ्या खिषातील वजन पाहून बदलणार नाही
4. मोजकेच पाहीजे पण जीवाभावाचे मित्र पाहीजे
5. मैत्रीचा हटके अंदाज हवा, तुझ्या ह्रदयात आठवणींचा हळुवार कप्पा हवा, तू फोन कर अथवा नको पण मला तुझा दररोज एक मेसेज तरी हवा.
6. त्रास फक्त प्रेमात होतो असं नाही, एकदा जीवापाड मैत्री करून पाहा, प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
7. आयुष्यात तुमचे मित्र आरसा आणि सावलीसारखे असावे, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
8. माहीत नाही लोकांना चांगले मित्र कुठून सापडतात, मला तर सगळेच्या सगळे नमुनेच भेटले आहेत.
9. खरे मित्र कधीच दूर जात नाहीत, जरी दररोज ते तुमच्यासोबत बोलत नसले.
10. अनेक जण प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत
आयुष्यावर इमोशनल फ्रेंडशिप कोट्स | Emotional Friendship Quotes In Marathi About Life
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र अथवा मैत्रीण अशी असते जी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असते. अशा जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींना तुमच्याकडून कधीच कसली अपेक्षा नसते, आयुष्यात असे मित्रमैत्रीण कमावण्यासारखं दुसरं समाधान नाही. अशा तुमच्या बेस्ट फ्रेंड्ससाठी हे खास आयुष्यावर इमोशनल फ्रेंडशिप कोट्स – Emotional Friendship Quotes In Marathi About Life
1. पावसात जेवढा ओलावा नसेल तेवढा जिव्हाळा मैत्रीत असतो, मैत्रीतल्या सावलीचा अर्थ प्रत्येकाला उन्हात गेल्यावरच कळतो
2. जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं, आपलं आयुष्य किती बदललं आहे.
3. कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजे खरी मैत्री
4. मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ… जी मला मिळाली तुझ्या रूपात
5. मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी जन्मोजन्मींची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, मैत्री असावी तुझ्या आणि माझ्यासारखी
6. लोक रूप पाहतात आणि आम्ही ह्रदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात आणि आम्ही सत्य पाहतो, लोक जगात मित्र पाहतात आणि मित्रांमध्ये जग पाहतो.
7. मैत्रीचे नाचे तेव्हाच घट्ट असते, जेव्हा त्यांच्यासोबत बोलताना तुम्हाला विचार करावा लागत नाही.
8. यश जिद्दीने मिळवता येतं, जिद्द मित्र वाढवतात आणि असे मित्र फक्त भाग्यानेच मिळतात
9. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो.
10. मैत्रीचे नाते कल्पना शक्तीच्या बाहेरील आहे, या नात्याला किंमत द्या आणि मनापासून विश्वास ठेवा.
भावनिक मैत्री संदेश | Emotional Friendship Messages On Friendship
मैत्रीचं नातं खऱ्या अर्थाने भावनिक असतं, कारण ते तुम्हाला रक्ताने मिळत नाही मैत्रीचे बंध तेव्हाच जुळतात जेव्हा एखाद्यासोबत तुमचं मन जुळतं. अशा मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही मनातील प्रत्येक गुज करू शकता. तुमच्या आयुष्यातील चांगलं, वाईट सर्वच त्यांना माहीत असतं. म्हणूनच तुमच्या अशा जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी हे खास भावनिक मैत्री संदेश – Emotional Friendship Messages On Friendship
1. अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होणं म्हणजे मैत्री
2. मित्राला दिलेले पैसे कधीच मागायचे नसतात, कारण मागितले तरी तो ते परत देत नाही
3. मैत्रीत वयाचं काहीच देणं घेणं नसतं, जिथे विचार जुळतात ना तिथे आपोआप मैत्री होते.
4. मैत्री करायची असेल तर पाण्यासारखी निर्मळ करा, दूर असूनसुद्धा जी तुम्हाला पारदर्शक दिसेल.
5. आयुष्य आनंदात जगायला शिकवते ती म्हणजे मैत्री
6. चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळातही हात न सोडणे म्हणजे मैत्री
7. माझ्या आयुष्यातील विक पॉईंट शोधून नकोस मित्रा, कारण तू पण त्यातलाच एक आहेस
8. इतरांच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता ही जाणीव म्हणजे मैत्री
9. गर्दीत मित्र ओळखायला शिका नाहीतर, संकटाच्या वेळी मित्र गर्दी करणं विसरतील.
10. खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या खऱ्या नावाने हाक मारत नाही.
Conclusion – तुमच्या जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे भावनिक मैत्री कोट्स – Emotional Friendship Quotes in Marathi, इमोशनल हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स – Emotional Heart Touching Friendship Quotes in Marathi, आयुष्यावर इमोशनल फ्रेंडशिप कोट्स – Emotional Friendship Quotes In Marathi About Life, भावनिक मैत्री संदेश – Emotional Friendship Messages On Friendship तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट बॉक्स मध्ये जरू कळवा.