ADVERTISEMENT
home / रेसिपी
थंडी एन्जॉय करा

थंडी छान वाढलीय, या रेसिपीने एन्जॉय करा थंडी

 गेल्या काही दिवसापासून वातावरणात इतका मस्त थंडावा आला आहे की, याचा आनंद घ्यावासा नक्कीच वाटत असेल. मुंबईकरांना थंडीचा हा अनुभव फारच कमी वेळा अनुभवता येतो. आता या मस्त थंडीचा अनुभव तेव्हात येईल ज्यावेळी तुम्ही काहीतरी छान प्लॅन कराल. तुम्हालाही या थंडीचा अनुभव घेण्यासाठी आणि कुटुंबासोबत थोडासा वेळ घालवण्यासाठी काही खास पदार्थ  करायचे असतील तर तुम्ही या काही रेसिपी ट्राय करु शकता.

हॉट चॉकलेट

हॉट चॉकलेट

लहान मुलांपासून सगळ्यांना आवडणारे एक पेय म्हणजे हॉट चॉकलेट. घरच्या घरी ते बनवणे खूपच सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ चॉकलेट आणि गरम गरम दूध लागेल. दूध गरम झाले की, एका भांड्यात घेऊन त्यामध्ये तुमच्या आवडीचे चॉकलेट टाका. ते चांगले विरघळले की, हॉट चॉकलेट तयार… मस्त थंडीत हा गोडवा चहालाही मागे टाकेल असा आहे. त्यामुळे तुम्ही मस्त घरी हॉट चॉकलेट बनवा आणि ते प्या. तुम्हाला नक्कीच त्याचा आनंद घेता येईल.

उकडलेले मके

मका हा हल्ली बाराही महिने मिळतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला अगदी आरामात करता येते. खूप लहान मुलांना उकडलेले मके खूप आवडतात. मक्याचे दाणे काढून तुम्ही ते चांगले वाफवून घ्या.  आता एका भांड्यामध्ये उकडलेले मके घेऊन त्यामध्ये मस्त एक चमचा बटर, चाट मसाला, काळीमिरी पूड असे घालून घ्या. मक्याचे दाणे गरम गरम खायला खूपच जास्त मजा येते. इतकेच नाही तर त्याला सुटणारे खारट पाणी खायलाही मजा येते.

मसाला दूध

मसाला दूध

 थंडीत मस्त गरम गरम काहीतरी खायचे असेल तर तुम्ही मस्त मसाला दूध प्या. मसाला दूध हे कायमच चविष्ट आणि बेस्ट असा पर्याय आहे. हल्ली रेडिमेड मसाला पावडर मिळते. त्यामुळे तुम्हाला फारसा वेळ वाया घालावा लागत नाही. मसाला दूध हे शरीराला उर्जा आणि उष्णता देण्याचे काम करतात. त्यामुळे तुम्ही मसाला दूध बनवा आणि प्या. तुमची छान सोसायटी असेल किंवा चाळीतलं घर असेल तर सगळे जण एकत्र मिळून मस्त एन्जॉय करु शकता.  

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी आहे उत्तम, बाजरी की मका

रगडा पॅटीस

चाटमधील असा प्रकार जो छान गरम गरम खाता येतो तो म्हणजे रगडा पॅटीस. गरम गरम रगडा आणि त्यावर कांदा, टोमॅटो, शेव असे घातल्यानंतर ही रेसिपी इतकी मस्त लागते की त्याचा आनंद घेता येतो. रगडा पॅटीस गरम गरम खायला खूपच मजा येते. एक दिवस तोच तोच डाळ भात खाण्यापेक्षा मस्त रगडा पॅटीस खा. तुम्हालाही थोडा चेंज मिळेल.

गाजराचे किंवा टोमॅटोचे सूप

गाजराचे किंवा टोमॅटोचे सूप

जर तुम्हाला हेल्थ जास्त महत्वाची वाटत असेल तर तुम्ही मस्त सूप्सही पिऊ शकता. गाजराचे किंवा टोमॅटोचे सूप चवीला आणि शरीरासाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास असे सूप्स प्या तुम्हाला नक्कीच त्याचा आनंद मिळेल. 

आता थंडीत मस्त या रेसिपीज करा आणि पावसाळा एन्जॉय करा.

ADVERTISEMENT
10 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT