कुरळे केस सेट करणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. कारण कुरळे केस सेट करण्यासाठी गरजेचे असतात योग्य हेअर टुल्स. जर तुमच्याजवळ योग्य साधनं असतील तर तुम्ही सहज तुमचे कुरळे केस सेट करून रेडी होऊ शकता. कुरळ्या केसांची निगा राखण्यासाठी मेहनत आणि संयमाची गरज असते. मात्र काही स्मार्ट टेकनिक्स आणि हेअर टूल्स वापरून तुम्ही तुमचे केस हवे तसे सेट करू शकता. या हेअर टूल्समुळे तुमच्या केसांचे टेक्चर, व्हॉल्युम आणि मऊपणा कायम राहतो. यासाठी तुम्हाला फक्त या काही खास गोष्टींची मदत घ्यावी लागेल.
मायक्रोफायबर टॉवेल (Microfiber towel)
कुरळ्या केसांना वाळवण्यासाठी तुमच्याजवळ मायक्रो फायबर टॉवेल असणं फायदेशीर ठरतं. मायक्रो फायबर टॉवेल मऊ कापडापासून बनवलेला असतो. ज्यामुळे केस वाळवण्यासाठी तुम्ही जरी तो केसांवर घासला अथवा रगडला तरी तुमच्या केस आणि केसांच्या मुळांवर ताण येत नाही. शिवाय केस कोरडे करण्यासोबत यामुळे केसांची गुंता अथवा फ्रिजिनेसही कमी होतो. हा टॉवेल मऊ असल्यामुळे केस पुसताना तुमचे केस तुटत नाहीत. केसांमधले पाणी व्यवस्थित पुसले गेल्यामुळे केस फआर कोरडेपण होत नाही. कुरळ्या केसांची योग्य निगा राखण्यासाठी तुमच्याजवळ यासाठीच मायक्रो फायबर टॉवेल असायला हवा.
वॉटर स्प्रे (Water Spray)
कोणत्याही केसांची हेअर स्टाईल करताना तुम्हाला हे साधन उपयुक्त ठरते. प्रत्येक पार्लर आणि सलॉनमध्ये हेअर स्टायलिस्टच्या हातात हेअर स्प्रे असतोच. कुरळ्या केसांच्या मुलींकडे केस सेट करण्यासाठी हेअर स्प्रे असायला हवा. याचं प्रमुख कारण म्हणजे केसांना थोडं मऊ करण्यासाठी हेअर स्प्रे फायदेशीर ठरतो. स्टाईल करण्याआधी हेअर स्प्रे केसांवर शिंपडल्यामुळे केस तात्पुरते सरळ होतात. ज्यामुळे तुम्हाला स्टाईल करणं सहज आणि सोपे जाते. मात्र यासाठी तुम्ही पाण्याने केस ओले करू शकत नाही कारण ते खूप ओले झाले तर तुमची स्टाईल खराब होते. हेअर स्प्रेने फक्त गरजेपुरतंच पाणी केसांवर शिंपडलं जातं. ज्यामुळे केस खूप ओले न होता फक्त थोडे मऊ होतात.
वेट डिटॅंगलिंग ब्रश (Wet Detangling Hair Brush)
केसांचा गुंता काढण्यासाठी तु्म्ही कंगवा अथवा हेअर ब्रशचा वापर करता. मात्र कुरळे केस सतत एकमेंकांमध्ये गुंतत असल्यामुळे ते सोडवताना बरेच केस तुटतात आणि गळतात. केसांचा गुंता सोडवणे हा केस तुटण्याचा एक कार्यक्रमच होतो. ज्यामुळे कुरळे केस असणाऱ्या मुलींसाठी केसांचा गुंता काढणं ही मोठी समस्याच असते. यासाठी नेहमी मोठ्या दातांचा कंगवा अथवा हेअर ब्रश वापरा. यासाठी जर तुमच्याकडे वेट डिटॅंगलिंग ब्रश असेल तर तुमचे काम अगदी सहज होऊ शकतं. याचं कारण असं की, या हेअर ब्रशला अगदी मऊ दात म्हणजेच ब्रिसल्स असतात. हा ब्रश खास ओल्या केसांचा गुंता सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ओले केस सोडवताना प्रत्येक मुलीकडे हा ब्रश असायला हवा. मात्र कुरळ्या केसांच्या मुलींसाठी हा ब्रश म्हणजे एक गिफ्टच आहे.
हेअर रॅप (Hair Wrap)
हेअर रॅप प्रत्येक कुरळे केस असलेल्या मुलीकडे असायलाच हवी. याचं कारण असं केस रॅप करणं तुमच्या नेहमीच उपयोगी पडू शकते. एखाद्यावेळी पटकन तयार होण्यासाठी आणि तुमचे खराब झालेले केस दिसू नयेत यासाठी तुम्ही ते वापरू शकता. शिवाय यामुळे तुम्ही स्टायलिश दिसता. कारण आजकाल असं हेअर रॅप वापरणं हे ट्रेंडमध्ये आहे. ज्यामुळे तुम्हाला निरनिराळ्या स्टाईल, पॅटर्न आणि रंगात ते बाजारात मिळू शकतं.
हेअर पिक (Hair Pick)
हेअर पिक हे असं एक हेअर टूल आहे जे कुरळ्या केस असलेल्या मुलींना नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. केसांना व्हॉल्युम देण्यासाठी आणि व्यवस्थित शेप देण्ययासाठी तुम्ही हेअर पिक वापरू शकता. केस सोडवण्यासाठीदेखील ते तुमच्या उपयोगी पडू शकतं. यामुळे तुमच्या केसांचे नुकसान कमी होते आणि ते जास्त तुटत नाहीत.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
हिटचा वापर करुन केस कुरळे करत असाल तर अशी घ्या काळजी