ADVERTISEMENT
home / Care
Essential Oils That Are Packed With Wonderful Benefits

एसेन्शियल ऑईल जे ठरतात तुमच्यासाठी उपयोगी

नैसर्गिक तेल आपल्या सौंदर्यात नेहमीच भर टाकत असतात. वास्तविक एसेन्शियल ऑईल्स तुम्ही इतरही अनेक गोष्टींसाठी वापरू शकता. जसं की, आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी अथवा घरात छान अरोमा येण्यासाठी… कारण एसेन्शियल ऑईल्स वनस्पतींच्या अर्कापासून काढली जातात. त्यामुळे त्या वनस्पतीच्या पानांचा, फळांचा, फुलांचे गुणधर्म त्या तेलात असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर गुलाबाच्या फुलांपासून रोझ ऑईल काढलं जातं, लव्हेंडर नावाच्या वनस्पतीपासून लव्हेंडर तेल मिळतं. आजकाल बाजारात विविध प्रकारची एसेन्शियल ऑईल सहज मिळतात. यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत पाच महत्त्वाची एसेन्शियल ऑईल्स जी तुमच्या घरात असायलाच हवीत. 

लव्हेंडर एसेन्शियल ऑईल ( Lavender Essential Oil)

लव्हेंडर ऑईल हे आजकाल जगभरात लोकप्रिय ठरत असलेलं एक एसेन्शियल ऑईल आहे. सुंगधित असल्यामुळे तुमच्या मनाला आणि शरीराला यामुळे त्वरीत आराम मिळतो. लव्हेंडर या वनस्पतीच्या फुलांच्या अर्कापासून हे तेल काढले जाते. ज्याचा वापर तुम्ही केसांसाठी, त्वचेसाठी आणि घरात अरोमा निर्माण करण्यासाठी करू शकता. ताणतणाव कमी करण्यासाठी आणि घरात आल्हाददायक वातावरण निर्मितीसाठी याचा चांगला उपयोग होतो. यासाठी जाणून घ्या लव्हेंडर तेलाचे फायदे आणि महत्त्व | Benefits And Meaning Of Lavender Oil In Marathi सोबत आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत ऑर्गेनिक हारवेस्टचे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं लव्हेंडर ऑईल

फायदे 

  • शंभर टक्के नैसर्गिक
  • क्रुअल्टी फ्री
  • पेराबेन फ्री
  • सर्व वयोगटाच्या महिला आणि पुरूषांसाठी उत्तम
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य

टी ट्री एसेन्शियल ऑईल (Tea Tree Essential Oil)

तुम्ही तुमच्या सौंदर्याबाबत जागरूक असाल तर तुमच्या घरी टी ट्री एसेन्शियल ऑईल असायलाच हवं. याचं कारण त्याचे फायदे आणि उपयोग अनेक आहेत.  तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी ते वापरू शकता, केसांच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त आहे, नखांची निगा राखण्यासाठी उत्तम आहे, हात निर्जंतूक करण्यासाठी, जीवजंतू नष्ट करण्यासाठी, सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, नखांचे इनफेक्शन कमी करण्यासाठी, एक्ने कमी करण्यासाठी, त्वचेचा दाह कमी करण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही हे ऑर्गेनिक हारवेस्टचे नैसर्गिक टी ट्री ऑईल वापरू शकता. सोबत वाचा अधिक सविस्तर टी ट्री ऑईलच्या वापराचे फायदे (Benefits Of Tea Tree Oil In Marathi)

ADVERTISEMENT

फायदे –

  • शंभर टक्के नैसर्गिक
  • वेगन आणि क्रुअल्टी फ्री
  • पेराबेन फ्री
  • अॅंटि व्हायरल, अँटी फंगल, अॅंटि बॅक्टेरिअल
  • पुरूष आणि महिलांसाठी उत्तम
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी

रोझ एसेन्शियल ऑईल ( Rose Essential Oil)

सौंदर्य खुलवण्यासाठी गुलाब आणि गुलाबाच्या अर्काचा खूप चांगला फायदा होतो. यासाठी त्वचा आणि केसांसाठी गुलाबजल चे फायदे (Rose Water Benefits In Marathi) जरूर वाचा. स्कीन केअर रुटीनमध्येही यासाठीच रोझ एसेन्शियल ऑईल वापरायला हवं. तुमच्या डेली स्कीन केअर रूटीनसाठी तुमच्या सीरम अथवा क्रीममध्ये तुम्ही थोडं रोझ एसेन्शियल ऑईल मिसळलं तर तुमच्या त्वचेत चांगले बदल दिसून येतील. केस आणि त्वचेसाठी वापर करण्यासाठी तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टचं हे रोझ ऑईल नक्कीच ट्राय करू शकता.

फायदे 

  • शंभर टक्के नैसर्गिक
  • क्रुअल्टी फ्री
  • पेराबेन फ्री
  • पुरूष आणि महिलांसाठी योग्य
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त

लेमन एसेन्शियल ऑईल (Lemon Essential Oil)

लिंबाच्या सालीच्या अर्कापासून काढलेलं तेल म्हणजे लेमन एसेन्शिअल ऑईल. नैसर्गिक पद्धतीने काढलेलं हे तेल तुमच्या अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्वचा स्वच्छ करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, बॅक्टेरिआ दूर ठेवण्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.

ADVERTISEMENT

फायदे 

  • शंभर टक्के नैसर्गिक
  • क्रुअल्टी फ्री
  • पेराबेन फ्री
  • पुरूष आणि महिलांसाठी योग्य
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त

जोजोबा एसेन्शियल ऑईल( Jojoba Essential Oil)

जोजोबा ऑईलचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनात केला जातो. जसं की मॉईस्चराईझर, बॉडीलोशन, शॅम्पू, कंडिशनर, फेस क्रीम. कारण त्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचे चांगले पोषण होते. त्वचा, केस आणि नखांची निगा राखण्यासाठी तुम्ही जोजोबा ऑईल वापरू शकता. आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत ऑर्गेनिक हारवेस्टचं जोजोबा एसेन्शियल ऑईल

फायदे 

  • शंभर टक्के नैसर्गिक
  • क्रुअल्टी फ्री
  • पेराबेन फ्री
  • पुरूष आणि महिलांसाठी योग्य
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
10 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT