स्वत:च्या लग्नात सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. लग्नाच्या काही काळ आधी मुली या त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स, उन्हापासून त्वचेचा बचाव असं काही केल्यामुळे त्वचेमध्ये नक्कीच फरक पडतो. पण लग्नाच्या याच मौसमात काही चुका या देखील आपल्याकडून अगदी हमखास होऊ लागतात. शॉपिंगच्या निमित्ताने सतत बाहेर गेल्यामुळे काही गोष्टी केल्या तरी देखील त्याचा म्हणावा तसा परिणाम त्वचेवर होताना दिसत नाही.अशावेळी तुमच्या आहारात काही फळांचे रस असतील तर तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळेल. हा ग्लो वरुन नाही तर आतून मिळतो. जाणून घेऊया असे काही फळांचे रस जे त्वचा करतील फारच सुंदर
मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर
काकडी- बीटचा रस
काकडी आणि बीट हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. काकडीची सालं काढून आणि बीट स्वच्छ सोलून तुम्ही त्याचे बारीक तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. लगदा गाळून त्यातून रस काढून घ्या. या रसाचे सेवन रोज नाश्त्यानंतर करा. हा रस तुम्हाला डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो. बीटामध्ये डिटॉक्स करणारे घटक असतात. तर काकडीमध्ये त्वचेला ग्लो आणणारे घटक असतात. काकडीमध्ये असलेले पाणी त्वचा नरिश करण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही काकडी-बीटच्या रसाचे सेवन करा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ कमी होतील. डाग कमी होतील. त्वचा छान चमकू लागेल.
(या रसाचे सेवन त्वरीत करायला हवे. यात मीठ किंवा चवीसाठी साखऱ घालण्याची मुळीच गरज नाही)
मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार
संत्र्याचा रस
व्हिटॅमिन C हे शरीरासाठी फारच फायद्याचे आहे. जर तुमच्या आहारात लिंबू वर्गातील फळं असतील तर तुम्हाला त्यापासून अधिक फायदे मिळतील. संत्र्याचा रस घेतल्यामुळे त्वचेला ग्लो मिळतो. त्वचेखाली असणारे कोलॅजन वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुमची त्वचा ही अधिक चांगली दिसू लागते. त्वचेखाली असणारे कोलॅजन वाढले की, त्वचा अधिक काळासाठी चिरतरुण राहते. त्यामुळे फक्त लग्नासाठीच नाही तर त्यानंतरही तुमच्या त्वचेचा ग्लो कायम टिकून राहण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या रसाचे सेवन करायला हवे. तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी स्नॅक्सच्यावेळी तुम्ही संत्र्याचा रस घ्यायला हवा. त्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल.
नवरीची मेहंदी ही तिच्या नवऱ्याचं तिच्यावरील प्रेम दाखवते (Navrichi Mehndi Design)
गाजराचा रस
गाजर हे देखील तुमच्या त्वचेसाठी फारच चांगले आहे. हल्ली बाजारात केशरी रंगाचे गाजर जास्त मिळतात. अशा गाजरांचा रस करुन प्यायला तरी देखील चालू शकेल. गाजर सोलून तो मिक्सरमधून काढून घ्या. त्याचा रस दिवसातून दोन वेळा तरी घ्या. गाजरामध्ये व्हिटॅमिन A आणि काही मिनरल्स असतात. जे केवळ त्वचा चांगली करत नाही. तर ते तुमच्या डोळ्यांचे आरोग्य देखील चांगले करतात. त्यामुळे गाजराचा रस ही घ्यायला हवा. गाजर तुम्हाला नुुसते खायला आवडत नसेल तर तुम्ही काकडी- बीट सोबत त्याला वाटून घेऊन शकता. तिघांपासून तयार केलेला रस देखील नक्कीच चांगला लागतो.
नववधू होणाऱ्या प्रत्येकीने आपल्या आहारात या काही गोष्टींचा समावेश केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुमची त्वचा नक्कीच खूप सुंदर आणि ग्लो देईल.