Advertisement

DIY लाईफ हॅक्स

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

Aaditi DatarAaditi Datar  |  Jun 27, 2019
तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

तुम्ही नुकतीच कॉलेजला जायला सुरूवात केली आहे का किंवा नुकतंच जॉबला जाऊ लागला आहात का? खरंतर प्रत्येकजणच मग तो विद्यार्थी असो गृहिणी असो वा नोकरदार व्यक्ती असो. प्रत्येकाचीच होणारा खर्च आणि खर्चाला मिळणारी रक्कम याबाबतीत ओढाताण सुरू असते. कितीही पगार असला तरी तो पुरतच नाही, असं प्रत्येकजण म्हणतो. ते खरंही असेल पण कधीकधी असं होतं की, एखाद्या गोष्टीवर आपण नाहक खर्च करतो. ज्यामुळे आपलं महिन्याचं किंवा त्या आठवड्याचं बजेट डळमळीत होतं. तुम्हाला हे पटतंय का? मग जाणून घ्या कोणत्या सवयींमुळे होत आहे तुमचा नकळत खर्च आणि बिघडतंय बजेट. 

1. कटींग आणि कॉफी

Unsplash

चहा किंवा कॉफी घेणं हे तसं पाहायला गेल्यास सामान्य खर्च वाटतो. पण नीट विचार केलात तर तुम्हाला कळेल की, एखाद्या टपरीवर जाऊन रोज चहा पिणं किंवा कॅफेमध्ये जाऊन कॉफी पिणं हे नक्कीच खर्चिक आहे. अगदी साधी 100 रूपयांची कॉफी जरी म्हटली तरी रोजच्या बजेटसाठी ती नक्कीच इकोनॉमिकल नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा फक्त वीकेंडला कॅफेची कॉफी एन्जॉय करणं हा चांगला पर्याय आहे. 

2. सतत बाहेर जेवणं

वीकेंडला मित्रमैत्रिणींसोबत डीनर किंवा लंच आऊटींगला जाणं हे आजकाल रिच्युअल झालं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाणं वगैरे ठिक आहे पण त्यापेक्षा घरीच जेवणं हे तुमच्या वॉलेटसाठी चांगलं आहे. हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा फ्रेंड्सच्या घरी पार्टी करा किंवा पॉटलंच ठेवा. हे शक्य नसल्यास महिन्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर जेवायला जाणं नक्कीच बजेट फ्रेंडली आहे.

पर्सनल केअर प्रोडक्ट्सवर जास्तीचा खर्च

प्रत्येकजण स्वतःची काळजी घेतो, ते महत्त्वाचंही आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की, त्यावर जास्त खर्च केलाच पाहिजे. महागड्या ब्रँड्सवर खर्च करण्याआधी त्याला एखादा स्वस्त ऑप्शन आहे का, हेही पाहिलं पाहिजे. मुख्य म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीचं ब्रीदचं आहे तुम्हाला महागड्या आणि नको असलेल्या गोष्टी तुमच्या गळ्यात मारणं. त्यामुळे तुमच्या गरजा ठरवा आणि नीट रिसर्च करून मगच पर्सनल केअरच्या गोष्टी खरेदी करा. 

ग्रोसरी शॉपिंगला जातान लिस्ट न करणे

Unsplash

तुमच्यासोबत असं होतं का की, मोठ्या ग्रोसरी स्टोरमध्ये गेल्यावर काही गोष्टी उगाच घेतल्या गेल्या. ज्यांची खरंतर काहीच गरज नसते. अशा मोठ्या दुकानातल्या स्कीम्स आणि ऑफर्स आपल्याला भुरळ पाडतात आणि आपण गरज नसलेल्या गोष्टीही उगाच घेतो. त्यामुळे अशा दुकानांमध्ये जाण्याआधी ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याची लिस्ट करा आणि मगच जा.

वापर नसताना सबस्क्रिप्शन घेणं

तुमच्याकडे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार असं सगळ्याचं सबस्क्रिप्शन आहे का? मग खर्च तर होणारच ना. तुम्हाला खरंच या सगळ्या अॅप्सच्या सबस्क्रिप्शनची गरज आहे का? एकट्याने अशा अॅप्सचं सबस्क्रिप्शन घेण्यापेक्षा फ्रेंडस मिळून घ्या. त्यामुळे तुमचा खर्च नक्कीच कमी होईल.

वीजेची बचत करा

बऱ्याच जणांना सवय असते एका खास मल्टीटास्कींगची. हे मल्टीटास्कींग म्हणजे एकाच वेळी मोबाईलवर खेळणं आणि लॅपटॉपवरही चित्रपट बघणं किंवा टीव्ही लावून ठेवणं. बऱ्याच जणांना नाहक घरातल्या पॅसेजचा लाईट चालू ठेवायची सवय असते. तर काहीजण झोपण्याआधी अर्धा तास बेडरूम गार व्हावं म्हणून एसी लावून ठेवतात. आता अशा सवयी असल्यावर खर्च तर वाढणारच ना. त्यामुळे वेळीच अशा सवयी बदला, वीज वाचवा आणि पैसेही.

कॅलरीज बर्न करा पैसे नाही

Unsplash

अनेकजणांचा नवीन वर्षाचा संकल्प असतो की, मी फिट होणार आणि वजन कमी करणार. मग यासाठी हौशीने मेंबरशिप घेतली जाते. त्यासाठी खास अक्सेसरीज घेतल्या जातात. पण जिमला जाण्याचा उत्साह काही दिवसातच बारगळतो आणि मेंबरशिपचे पैसे वाया जातात. त्यापेक्षा रोज जॉगिंग किंवा वॉकला जा. सायकलिंग करा. जे तुम्ही काही दिवसानंतर नाही केलंत तरी पैसे नक्कीच वाचतील. 

आम्हाला असं नक्की वाटतं की, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही हे छोटे छोटे बदल केलेत तर तुमचे बऱ्यापैकी पैसे वाचतील आणि मग आईबाबही म्हणणार नाहीत, पैसे झाडाला लागतात का?

हेही वाचा –

श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुम्हाला माहीत आहेत का शरीराशी निगडीत हे 15 शॉकींग फॅक्ट्स