नागिन या सुपरनॅचरल मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या मालिकेचा चौथा सिझन संपून प्रेक्षक आता पाचव्या सिझनची वाट पाहत आहेत. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे कारण नागिनचा पाचवा सिझन लवकरच सुरू होत आहे. सध्या या सिझनचा प्रोमो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. या प्रोमोमधून या सिझनची इच्छाधारी नागिण हिना खान असून लवकरच ती या शोमधून धुमाकूळ घालायला तयार आहे असं दाखवण्यात येत आहे. पण या सिझनची नागिण खरंच हिना खान आहे का दुसरं कोण हे सिझन सुरू झाल्यावरच समजेल.
कधी सुरू होणार नागिनचा पाचवा सिझन
नागिन हा एकता कपूरचा एक सुपरहिट टेलीव्हिजन शो आहे. हा शो सुपरनॅचरल थीमवर आधारित असून आतापर्यंत त्याचे चार सिझन पूर्ण झाले आहेत. वाहिनीकडून नुकताच या शोचा टिझर आणि प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानुसार हा शो 9 ऑगस्टपासून टिव्हीवर सुरू होणार आहे. दर शनिवार आणि रविवारी रात्री आठ वाजता टिव्हीवर हा सुपरनॅचरल शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पाचव्या भागाचे प्रमोशन करण्यासाठी वाहिनीने इंन्स्टा पोस्टमधून शेअर केले आहे की, “घडून गेलेल्या घटना पुन्हा जगण्यासाठी येत आहे इच्छाधारी नागिन” तर यासोबत जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात हिना खान हात जोडून उभी आहे आणि प्रोमोत लिहिण्यात आले आहे की, “जे राहिले आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी येत आहे इच्छाधारी नागिन पुन्हा नव्या रूपात” या सिझनची नागिण हिना खान असून ती पहिल्यांदाच अशा स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षक या सिझनची नक्कीच आतूरतेने वाट पाहत आहेत.
कशी असणार पाचव्या सिझनची नागिण
पाचव्या सिझनची नागिण म्हणजेच हिना खानही एक शक्तीशाली नागिण असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात हिना खानची भूमिका थोडीच असणार आहे. कारण त्यानंतरचा नागिणची भूमिका सुरभि चंदना साकारणार आहे. हिनाची भूमिक पूर्ण झाल्यावर सुरभिच या शोची मुख्य नायिका असेल. या सिझनमध्ये यो दोघींसोबतच धीरज धूपर आणि मोहीत मल्होत्रा यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. मात्र सध्यातरी या सिझनची नागिण हिनाच आहे असं दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे या सिझनमधील पुढील गुढ कथा पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत.
एकता कपूरच्या नागिन शोमधील आधीच्या नायिका
एकता कपूरच्या नागिनचा हा पाचवा सिझन सुरू होत आहे. याआधीच्या चारही भागांना आणि त्यातील इच्छाधारी नागिणींना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. मौनी रॉय, सुरभि ज्योती, निया शर्मा यांनी या आधीच्या भागात नागिणीच्या भूमिका साकारलेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे या मालिकेचा चौथा सिझन अपूरा राहिला होता. मात्र लॉकडाऊन संपल्यावर तो भाग पूर्ण करण्यात आला. तो भाग संपून आता पाचव्या सिझनला पुढील आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. एकता कपूरच्या मते सिझन पाच हा तिच्या आधीच्या सर्व सिझनपेक्षा हटके आणि नवीन असणार आहे. आता या सिझनमध्ये नेमकं काय गुपित दडलेलं आहे ते पाचवा सिझन सुरू झाल्यावर कळेलच…
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग
कपूर खानदानात जाणार ‘स्टुडंट’, तारा-आदरने स्वीकारलं नातं
करिना कपूरने नेपोटिझमवर सुनावले खडे बोल, यावर चर्चा होणंच विचित्र वाटतं