ADVERTISEMENT
home / केस
Exactly How Much Hair Product You Should Use in Marathi

केसांवर नेमकं किती लावावं हेअर प्रॉडक्ट

केसांची योग्य निगा राखली तर केस सुंदर दिसतातच शिवाय ते निरोगी आणि मजबूत होतात. यासाठी योग्य हेअर केअर रूटिन फॉलो करायला हवं. तुम्ही केसांची निगा राखण्यासाठी विविध प्रकारचे हेअर प्रॉडक्ट वापरत असाल.ज्यामध्ये हेअर ऑईल, शॅम्पू, कंडिशनर, सीरम, हेअर मास्क अशा अनेक प्रॉडक्टचा समावेश असतो. पण तुम्ही योग्य प्रमाणात हेअर प्रॉडक्ट वापरता का? कारण असं केलं नाही तर तुमचे हेअर प्रॉडक्ट लवकर संपतात ज्यामुळे तुमच्या पैशांचे नुकसान होतेच पण तुमच्या केसांचे आरोग्यही बिघडू शकते. यासाठी जाणून घ्या कोणते हेअर प्रॉडक्ट किती प्रमाणात वापरावे.

हेअर प्रॉडक्ट वापरताना लक्षात ठेवा प्रमाण

तुम्ही कोणते हेअर प्रॉडक्ट वापरत आहात त्यानुसार त्याचे योग्य प्रमाण नेहमी लक्षात ठेवा.

शॅम्पू

केसांना शॅम्पू करताना शॅम्पू किती प्रमाणात वापरावं हे तुमच्या केसांची लांबी आणि टेक्श्चरवर अवलंबून आहे. मात्र असं असूनही अनेक जणी जवळ जवळ दोन वेळा दोन मोठे चमचे शॅम्पू तळहातावर घेऊन तो केसांवर लावतात. वास्तविक लांब केसांसाठी दोन टेबल स्पून आणि लहान केसांसाठी एक टेबलस्पून शॅम्पू पुरेसा असतो. त्यामुळे यापेक्षा अती प्रमाणात शॅम्पू वापरणं केसांसाठी योग्य नाही. केसांचे आरोग्य राखण्यासाठी नेहमी सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo) वापरण्याला प्राधान्य द्या.

कंडिशनर  

एकवेळ तुम्ही केसांवर शॅम्पू अती प्रमाणात वापरला तरी चालेल पण कंडिशनर मुळीच जास्त प्रमाणात वापरू नका. अगदी लहान ते मिडीअम लेंथ केसांसाठी तुम्ही अगदी एखाद्या लहान बोराच्या आकारापर्यंत कंडिशनर केसांवर लावायला हवं. जर तुमचे केस जास्त लांब असतील तर त्याप्रमाणे प्रमाण थोडं वाढवत जावं. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा कंडिशनर कधीच केसांच्या मुळांना लावू नका. मध्यापासून केसांच्या टोकापर्यंत कंडिशनर लावत जावं.

ADVERTISEMENT

हेअर मास्क

केसांना फाटे फुटणे, केस निस्तेज दिसणे अशा समस्या असतील तर केसांवर हेअर मास्क लावण्याची गरज असते. पण पुन्हा तुम्हाला ते योग्य प्रमाणातच लावायला हवं. नाहीतर चांगल्या परिणामापेक्षा नुकसान होण्याची शक्यताच जास्त असू शकते. तुम्ही एक चमचाभर हेअर मास्क तुमच्या केसांवर व्यवस्थित लावू शकता. ज्यांचे केस पातळ असतील त्यांनी थोडं कमीच हेअर मास्क केसांवर लावावं.

सीरम 

केसांचे बाहेरील वातावरण, धुळ, माती आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही केसांवर सीरम लावणं खूप गरजेचं आहे. पण ते लावण्यापूर्वी त्या प्रॉडक्टवर दिलेल्या सूचना जरूर वाचा. कारण काही प्रॉडक्ट फक्त ओलसर केसांवर आणि केसांच्या टोकांवर लावण्यासाठी बेस्ट असतात. तुम्ही केसांवर एखाद्या नाण्याच्या आकारा इतकं सीरम लावू शकता. जर पातळ केस असतील तर एखाद्या शेंगदाण्याइतकं प्रमाण सीरमचं घ्या आणि ते केसांवर लावा. तसंच केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi) तुम्ही नक्की करून पाहा.

हेअर जेल 

तुमचे केस पातळ आहेत की जाड यावरून तुम्ही केसांवर किती जेल लावावं हे ठरू शकतं. त्यामुळे अती प्रमाणात केसांवर जेल लावू नका कारण त्यामुळे तुमची हेअर स्टाईल बिघडेलच शिवाय केसांचे नुकसानही होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay) करणे हे केसांसाठी उत्तम ठरते.

04 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT