एखादी शारीरिक क्रिया केल्यानंतर प्रत्येकाला घाम येतो. काख, पाठ, छाती, पोट, मांड्या, चेहरा अशा सगळ्या भागांमधून घाम वाहू लागतो. घाम ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम मदत करते. घाम येण्याचे प्रमाण प्रत्येक शरीराचे एकसारखे असतेच असे नाही. तर काहींना घाम हा जास्त येतो. काहींना घाम हा कमी येतो. हे कमी जास्त घाम येणे देखील अनेक व्याधींना आमंत्रण देणारे असते. खूप घाम येण्याचा त्रास असला तरी देखील तो शरीरासाठी फारसा हानिकारक ठरत नसला तरी त्याचे काही त्रास आपल्याला जाणवतात. तुम्हाला घाम येतो? कमी येतो की जास्त येतो? या नुसार तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे फारच गरजेचे आहे. घाम येणे चांगले की वाईट… जास्त घाम येणे म्हणजे काय? कमी घाम म्हणजे काय ? या सगळ्या गोष्टी आपण अगदी नीट जाणून घेऊया करुया सुरुवात
तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी लहान मुलांची अशी घ्या काळजी
तुम्हालाही खूप घाम येतो?
काही जणांना पाहिल्यानंतर ते घामात सतत डबडबलेले दिसतात. त्यांचे सबंध शरीर हे घामाने भरलेले असते. कोणतीही शारीरिक हालचाल न करता जर एखाद्याचे शरीर घामाने डबडबलेले असेल तर ते आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. खूप घाम येण्याच्या या प्रकाराला हायपरड्रोसिस असे म्हणतात. अधिक घाम येण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात.
- हायपरड्रोसिस असलेल्या व्यक्तींमध्ये घामांच्या ग्रंथी या अधिक सक्रिय असतात.
- शरीरात बॅक्टेरियाचा संसर्ग असेल तरी देखील अशावेळी घामाचा त्रास हा होऊ शकतो.
- तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केले तरी देखील तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो.
- ज्यांचे वजन जास्त असते त्यांना देखील जास्त घाम येण्याचा त्रास होऊ शकतो.
- कॉफी किवा कॅफिनचे प्रमाण शरीरात जास्त असेल तरी देखील तुम्हाला जास्त घाम येण्याचा त्रास होऊ शकतो.
जास्त घाम येणे तुम्हाला ह्रदयरोग, मधुमेह, थायरॉईड असे काही त्रास असू शकतात.
चोरओटी म्हणजे काय आणि गरोदरपणात कधी भरावी
तुम्हाला घाम येत नाही?
काही जणांना तुम्ही पाहिले असेल तर काहींना घाम हा अगदी नावाला येतो. काही जण खूप चालून देखील त्यांना अजिबात घाम येत नाही. असे घाम न येणेही आरोग्यासाठी हानिकारक आहे. घाम आला नाही तर तुम्हाला त्वचारोगाशी निगडीत समस्या आहे असे समजावे. घाम आला नाही तर तुमच्याशरीरातून घाण बाहेर टाकली जाणार नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा विपरित परिणाम दिसून येतो.
शरीरात घामाचे प्रमाण कमी झाले तर काही लक्षण दिसू लागतात
- त्वचा रुक्ष दिसू लागते. त्वचा अगदी कोरडी दिसू लागते.
- त्वचेचा दाह होऊ लागतो.
असा त्रास तुम्हाला होऊ लागला असेल तर तुम्हाला जबरदस्ती घाम आणण्यावाचून पर्याय राहात नाही. तुम्ही थोड्यावेळासाठी जरी उन्हात किंवा गरमीत राहिला तरच तुम्हाला घाम येऊ शकतो. अशा या क्रियेला स्वेदन असे म्हणतात.
आता तुम्हाला कमी घाम येतो की, जास्त घाम ते तपासून घ्या