अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) हे नाव नक्कीच प्रेक्षकांना नवे नाही. आपल्या अभिनयाने फारच कमी कालावधीत अनेकांना आपल्या चाहत्यांच्या यादीमध्ये स्नेहलताने सामावून घेतलं आहे. तर सोशल मीडियावरही स्नेहलता वसईकरला अनेक जण फॉलो करतात. दिवसेंदिवस तिचा फॅन फॉलोईंग हा वाढतच चालला आहे. अनेक ऐतिहासिक मालिकांमधून स्नेहलताने काम केलं आहे. तर सध्या तिची हिंदी मालिका ‘अहिल्या’ चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या मालिकेतून गौतमा बाई म्हणून स्नेहलता सध्या समोर येत आहे. मात्र ही मालिका लवकरच लीप (Leap) घेणार आहे आणि स्नेहलताची या मालिकेतून एक्झिट होणार आहे असं प्रेक्षकांना समजल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ चालू आहे. ही मालिका स्नेहलताशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जर स्नेहलता या मालिकेत नसेल तर ही मालिका एक महिन्यापेक्षा अधिक टिकूच शकणार नाही इथपर्यंत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्नेहलताच्या फॅनपेजवर व्यक्त केली नाराजी
स्नेहलताचे अनेक चाहते आहेत. तर तिच्यासाठी सोशल मीडियावर अनेक फॅनपेजही (Fan Page) चालविण्यात येतात. यावर स्नेहलताबाबत अनेक पोस्ट्स शेअर केल्या जातात. दरम्यान अहिल्या ही मालिका आता लीप घेणार आहे आणि त्यामुळे मालिकेतील कलाकार ही बदलले जाणार आहेत असे सांगण्यात येत आहे आणि यानुसार त्या बदलल्या जाणाऱ्या कलाकारांमध्ये स्नेहलताच्या नावाचाही समावेश असल्याचे चाहत्यांच्या कानावर आले आहे. त्यामुळे स्नेहलताच्या चाहत्यांनी फॅनपेजवर विनंतीला सुरूवात केली आहे. तर तिला भरभरून विनंती पाठविण्यातही येत आहे. तिने ही मालिका सोडल्यास, ही मालिका जास्त दिवस टिकू शकणार नाही असेही चाहत्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर याआधीही संभाजी महाराजांच्या मालिकेत स्नेहलताने याआधीही वयोवृद्ध भूमिकाही साकारली होती. छत्रपती संभाजी महाराज मालिकेत सोयराबाई ही व्यक्तिरेखा ही तिने लीलया पेलली, त्यामुळे या मालिकेने लीप घेतली तरीही स्नेहलताला काढणे योग्य नाही असंही अनेकांचं म्हणणं आहे. ‘चंद्र हा एकच असतो आणि बाकी कोणीही कितीही केले तरीही चंद्राचे महत्त्व कमी होत नाही’ असंही एका चाहत्याने विनंती करताना लिहिले आहे. तर अनेक चाहत्यांनी स्नेहलता नसेल तर मालिका पाहण्यात काहीच अर्थ नाही अशा आशयाच्या कमेंट्सदेखील केलेल्या दिसून येत आहे. इतकंच नाही तर स्नेहलताच्या चाहत्यांनी यासाठी गुगल फॉर्म (https://chng.it/DjcjVZF5p5) भरून प्रतिक्रियादेखील विचारायला सुरूवात केली आहे.
स्नेहलताचा तुफान चाहता वर्ग
स्नेहलताचा चाहता वर्ग तुफान आहे. पण यामुळे कधी कधी तिला वेगळे अथवा बोल्ड शूट केल्याचा त्रासही होतो. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी स्नेहलताने अत्यंत बोल्ड असे फोटोशूट केले. तिने याआधीही एका साचेबद्ध भूमिकेत बांधून न राहता बोल्ड फोटोशूट करत आपल्यावर टीका करणाऱ्यांना चपराक लगावली होती. कोणत्याही भूमिकेत अडकून न राहता आपले असे वेगळे अस्तित्व स्नेहलता टिकवून आहे. याशिवाय आपल्या कामाने आणि आपल्या सौंदर्यानेही स्नेहलताने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे मालिकेतून स्नेहलता बाहेर गेल्यास, आता चाहत्यांचा राग कसा शांत होणार आणि स्नेहलताला वेगळ्या कोणत्या भूमिकेतून चाहते पाहू शकणार हे लवकरच कळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक