मराठी मालिका असो अथवा हिंदी मालिका आजकाल प्रत्येक मालिकांमध्ये नायक आणि नायिकेचे बाहेर अफेअर (Extra marital affair) दाखवलेच जाते. महिला सक्षम आहेत. मालिका या समाजावर काही प्रमाणात नेहमीच प्रभाव टाकत असतात हे कितीही अमान्य करायचा प्रयत्न केला तरीही हे सत्य आहे. पण आजकाल दर एका मालिकेत नायिकांना सक्षम दाखविण्यासाठी नायकांना बाहेरख्याली दाखविले जाते. याची खरंच गरज आहे का असा एक सामान्य प्रेक्षक म्हणून खरंच प्रश्न पडतो. अर्थात मालिका पाहणाऱ्यांना हा प्रश्न किती त्रास देत असेल हे न विचारलेलेच बरे. बरेच जण काय मालिका आणि काय विषय आहेत असं तोंडावर म्हणतात मात्र त्याच मालिका अगदी रस घेऊन पाहतात. त्यामुळेच तर मालिकांचा टीआरपी (TRP of the serial) वाढत आहे हे वेगळं सांगायला नको.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘विठ्ठला विठ्ठला’ प्रेमगीत प्रदर्शित
सोशिक नायिका अचानक होते सक्षम
महिला सोशिक असतात हे मान्यच आहे. तो त्यांचा स्वभाव असतो कारण त्यांना लहानपणापासूनच दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे त्यामुळे कसं वागायचं याचं शिक्षण देण्यात येतं. मालिकांमध्येही यामध्ये कधीच बदल दाखविण्यात येत नाही. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मालिका सोडल्या तर इतर मालिकांमध्ये हेच दाखविण्यात येते. घर कितीही मोठं असो नायिका मात्र सोशिकच असते. नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा समोर आला की, तिला तिच्यातील गुण आठवून अचानक सर्व काही नोकरी, धंदा यामध्ये लाभ होतो. खरंच खऱ्या आयुष्यात हे घडतही असेल काही महिलांच्या बाबतीत. पण अचानक सक्षम होण्याची ताकद कोणामध्येही नसते. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते हे जरी खरं असलं तरीही अशा मालिकांमधून सतत प्रेक्षकांवर आजही नायिका सोशिकच आहे हे थोपवलं जात आहे असं वाटत नाही का? पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्याकडे पुरूषप्रधान संस्कृती असल्याने प्रत्येकवेळी पुरूषाचा बाहेरख्यालीपणा दाखवण्याची का गरज भासते. सर्वच पुरूष तसे असतात का? बरं पुरूषाने जो काही बाहेरख्यालीपणा केलेला असतो त्यात दुसऱ्या एका बाईलाच वाईट ठरवले जाते. म्हणजे एका बाजूने सोशिकता दाखवायची आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाईला वाईट दाखवयाचं यातून नक्की काय साध्य करायचं असतं?
रितेश देशमुख पुन्हा मराठीत , पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस “अदृश्य”साठी एकत्र
मालिकांचे विषय नक्की बदलणार कधी
आजही आपल्याकडे या कथांच्या मालिका तितकाच रस घेऊन पाहिल्या जातात. त्यामुळेच प्रेक्षकांना जे आवडतं तेच दाखवयला हवं असं म्हणून टीआरपीच्या नावाखाली वेगळ्या विषयांना हात घालण्याचं धाडस फारच कमी निर्माते आणि दिग्दर्शक करतात. पूर्वीच्या मालिका अत्यंत सुंदर होत्या आणि त्यांना विषय होता असं वरचेवर ऐकू येतं. पण त्याच प्रकारे मालिकांचे विषय नक्की कधी बदलणार असे विचारणारे प्रेक्षक वाढले तर नक्कीच हे चित्र पालटू शकेल. जोपर्यंत प्रेक्षक अशा मालिका पाहत राहणार तोपर्यंत नायिकांना सक्षम दाखविण्याच्या नादात नायकांवर अन्यायही होत राहणारच आहे. पण त्याआधी मुळातच वेगळे विषय पाहण्याचा रस प्रेक्षकांनीही दाखवणे गरजेचे आहे. पण तोपर्यंत तरी किमान मालिकांचा काही वेगळा ट्रॅक सुरू व्हावा अशीच एक प्रेक्षक म्हणून इच्छा करायला काहीच हरकत नसावी.
घाबरण्यासाठी व्हा सज्ज, येतेय गूढ मालिका
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक