ADVERTISEMENT
home / आरोग्य
eye exercises for kids

मुलांचा स्क्रीनटाईम वाढतोय, हे डोळ्यांचे व्यायाम करायलाच हवेत

डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा पण नाजूक अवयव आहे. लहान मुलांचे डोळे हे तर काचेसारखे नाजूक असतात. एकदा डोळे खराब झाले की ते परत आधीसारखे होऊ शकत नाहीत म्हणून डोळ्यांची खूप काळजी घ्यायला हवी. एकदा चष्मा लागला की डोळे कमजोर होतात. लहानपणीच चष्मा लागला तर नंबर स्थिर होईपर्यन्त तो खूप वाढत जातो. म्हणूनच चष्मा लागणे जितकी वर्ष टाळता येईल तितके बरे असते. पूर्वी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांचं इतकं प्रस्थ नव्हतं. लहान मुलं मैदानावर मनसोक्त खेळायची. टीव्ही मर्यादित असल्याने स्क्रीनटाईम सुद्धा कमी होता. पण हल्ली मात्र लहान मुलांचा स्क्रीनटाईम प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. 

टीव्ही-मोबाईल हे डोळ्यांचे शत्रू  

हल्ली लहान मुलांना बालपणापासूनच टीव्ही, मोबाईल ,लॅपटॉपचा ऍक्सेस मिळतो. लहान मुले खूप लवकर स्क्रीन बघायला शिकतात. मोबाईलची स्क्रीन तर सर्वात घातक पण अगदी एकदिड वर्षाची मुलेही आईवडिलांचा मोबाईल घेऊन युट्युबवर त्यांच्या आवडीचे कार्टून बघत असतात. थोडे मोठे झाले की मग त्यांना व्हिडीओ गेम्सचे जग खुणावते आणि तासन्तास व्हिडीओ गेम खेळण्यात निघून जातात.

लॉकडाऊन मुळे तर शिक्षणच ऑनलाईन झाले आहे त्यामुळे या सगळ्यात शाळेच्या स्क्रीनटाईमची भर पडली आहे. इतका जास्त स्क्रीनटाइम मुलांच्या डोळ्यांसाठी खूप घातक आहे. फार लहानपणीच मुलांना चष्मे लागत आहेत. जसा शरीराला व्यायाम आवश्यक असतो तसाच डोळ्यांना देखील व्यायाम आवश्यक आहे.  लहान मुलांसाठी डोळ्यांचे काही व्यायाम आहेत जे त्‍यांच्‍या डोळ्यांचे स्‍नायू सुदृढ ठेवतील आणि त्यामुळे नेत्रस्‍नायूंना सतत रक्‍ताचा पुरवठा होईल. यामुळे मुलांची दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते. 

अधिक वाचा – डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने

ADVERTISEMENT

लहान मुलांसाठी डोळ्यांचे व्यायाम 

पेन्सिल एक्सरसाइज  

एक मध्यम आकाराची पेन्सिल एका हाताच्या लांबीवर धरा आणि तिच्यावर लक्ष केंद्रित करा.हळूहळू पेन्सिल  नाकाच्या जवळ आणा. जोपर्यंत पेन्सिलवर फोकस करू शकत नाही तोपर्यंत पेन्सिल दृष्टीपासून दूर न्या.  हा व्यायाम दिवसातून 9 ते 10 वेळा केला जाऊ शकतो. 

आय रोटेशन एक्सरसाइज  

डोळे हळूहळू काही सेकंदांसाठी क्लॉकवाईज गोल गोल फिरवायचे आणि काही सेकंदांनी हळूहळू अँटीक्लॉकवाईज दिशेने गोल गोल फिरवायचे. कमकुवत दृष्टी सुधारण्यास मदत करणारा हा व्यायाम दिवसातून चार ते पाच वेळा केला पाहिजे. 

पापण्यांची उघडझाप करणे 

हा व्यायाम कोरड्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. स्क्रीनकडे एकटक बघत राहिल्याने डोळे आळशी होतात आणि पापण्यांची उघडझाप जितकी व्हायला हवी तितकी होत नाही. यामुळे डोळे कोरडे पडतात व चुरचुरतात. यासाठी हा व्यायाम केला पाहिजे. 20 ते 30 वेळा वारंवार डोळे मिचकावून पापण्या वेगाने फडफडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर डोळ्यांना थोड्यावेळ विश्रांती देण्यासाठी थोड्यावेळ डोळे बंद ठेवून शांत बसा. हे दिवसातून दोनदा केले पाहिजे. 

अधिक वाचा – डोळे आकर्षक दिसण्यासाठी असा करा डोळ्यांचा मसाज

ADVERTISEMENT

सूर्यप्रकाशात जाणे

सूर्यप्रकाश असताना बाहेर जा आणि सूर्याच्या दिशेने उभे राहून डोळे बंद करा. तुमच्या बंद पापण्यांवर सूर्यप्रकाश पडू द्या. हा व्यायाम दररोज काही मिनिटांसाठी करा. सकाळच्या कोवळ्या उन्हात हा व्यायाम करणे सगळ्यात उत्तम आहे.    

स्विंगिंग आय एक्सरसाइज

दोरी किंवा तारेच्या मदतीने बॉल टांगून ठेवा जेणेकरून तो तुमच्या नाकाच्या उंचीपर्यंत येईल. बॉल स्विंग करा आणि तो जवळून बघा.डोळ्यांनी चेंडूच्या हालचालींचे अनुसरण करा. 

डोळ्यांचा नियमित व्यायाम केल्याने केवळ डोळ्यांवरचा ताणच कमी होत नाही तर मुलांचे लक्ष आणि एकाग्रता सुधारण्यास देखील मदत होते.  म्हणून, तुमच्या मुलांना त्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून द्या आणि त्यांना दृष्टी सुधारण्यासाठी हे सोपे डोळ्यांचे व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT

 

10 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT