उन्हाळा म्हटला की, घाम आणि खूप घाम… तुम्हालाही खूप घाम येत असेल तर या दिवसात तुम्ही कपडे निवडताना अधिक काळजी घेणे फारच गरजेचे असते. कारण खूप जणांच्या घामाला दुर्गंधी येण्याचा त्रासही या दिवसात होत असतो. आता सीझननुसार कपडे बदलण्याची सवय आपल्या सगळ्यांना असते. पण असे असले तरी देखील काही कपडे हे उन्हाळ्यात तुम्हाला घाम आणि त्याचा त्रास होण्यापासून वाचवू शकत नाही. खूप जणांना या दिवसात चुकीचे कपडे घातल्यामुळे काखेत पुळ्या येते. काख घासली जाणे. काखेकडे घाम येऊन कपडे खराब होणे असे काही त्रास होतच असतात.अशांनी कपडे निवडताना नेमकी कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊया.
लाही लाही करणारे कपडे नाही

उन्हाळ्यात काही कपडे अंगाला न लागलेले बरे असतात. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे जॉर्जेट, सिंथेटीक, ब्रासो, ऑरगेन्झा असे काही प्रकार. कितीही लाईट वाटले तरी देखील या कपड्यांमध्ये खूप घाम येतो. हे कपडे शरीराला या दिवसात अजिबात चालत नाही. विशेषत: लहान मुलांना तर तुम्ही हे कपडे अजिबात घालायला नको. कारण अशा कपड्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. मुलांना रॅशेश देखील यामुळे येऊ शकतात. हे कपडे जास्त वेळ अंगावर राहिले तर खूप जणांच्या अंगाला खाज देखील येऊ लागते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी शक्यतो टाळलेल्या बऱ्या
ऑफ सीझन कपडे नको
यंदा थंडी बरेच दिवस होती. त्यामुळे खूप जणांकडे थंडीपासून बचाव करणारे कपडे अधिक होते. सीझन बदलला की कपडे बदलणे हे देखील तितकेच गरजेचे असते. पण काही जण कोणताही सीझन आला तरी देखील आपले कपडे बदलत नाही. जे खरंतर अजिबात चांगले नाही. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही देखील शक्यतो ऑफ सीझन कपडे टाळले तर ते बरे.
लाईटवेट कपड निवडा
उन्हाळ्यात खूप जाड कपडे घालणे कोणालाही शक्य नसते. आपण पातळ आणि सुती अशा प्रकारातील कपड्यांची निवड करत असतो. पण सुती कपडे हे खूपच जास्त पातळ असतात. काखेतील घामाच्या संपर्कात ते सतत आल्यामुळे त्या ठिकाणी विरण्याची किंवा डाग पडण्याची शक्यता असते. अशावेळी कपडा लाईटवेटच निवडा पण त्याला किमान वरच्या बाजूला अस्तर लावायला विसरु नका. असे केले तर तुमचे कपडे खराब होणार नाही आणि तुमच्या काखेमध्ये घर्षण होऊ तुम्हाला काखेतील पुळीसुद्धा येणार नाही
कपड्यांचे रंगही महत्वाचे
कपड्यांचे रंग या दिवसात खूप महत्वाचे असतात. तुम्ही घरी असलात तरी देखील तुम्ही कपड्यांचे रंग हे योग्य निवडणे खूपच जास्त गरजेचे असते. कपड्यांचा रंग जितका लाईट आणि आल्हाददायक असेल तितके ते तुम्हाला अधिक शोभून दिसतात. त्यामुळे खूप घाम येणाऱ्यांनी तर ही खबरदारी अगदी अवश्य घ्यायला हवी. तरच त्यांना हा उन्हाळा आल्हाददायक वाटू शकतो.
आता तुम्ही या दिवसात कपड्यांचे कोणते प्रकार निवडायचे असा प्रश्न असेल तर असे कपडे निवडा जे तुम्हाला अधिक सुखावणारे असतील.