ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबतच्या महत्त्वपूर्ण गोष्टी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबतच्या महत्त्वपूर्ण गोष्टी

ज्योतिराव गोंविदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान भारतीय वैचारिक, समाजसेवक, लेखक आणि नेतृत्व करणारे क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले म्हणजेच ज्योतिबा फुले या नावाने ओळखलं जात असे. ज्योतिबा यांचे कार्य तर सर्वज्ञात आहेच पण आजही महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात दिशादर्शक मानले जातात. आपल्या कार्याने त्यांनी समाजाला कुप्रथा, अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी खर्ची पाडलं. फुले यांना महिलांचे स्त्री-पुरूष भेदभावापासून वाचवायचे होते. त्याकाळातील स्त्रियांची दयनीय अवस्था पाहून ते व्याकुळ आणि दुःखी होते. म्हणून त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल आणण्याचं निश्चित केलं. आज इंटरनेटच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती आपल्याला वाचायला मिळते. पण तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या खालील महत्त्वपूर्ण गोष्टी नक्कीच माहिती असायला हव्यात.

जाणून घेऊया महाराष्ट्रातील या थोर व्यक्तिमत्वाशी निगडीत काही महत्वपूर्ण गोष्टी –

  • महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यात झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म साताऱ्यात झाला असला तरी त्यांचे कुटुंबीय अनेक पिढ्यांआधीच साताऱ्याहून पुण्यात आले आणि फुलांपासून गजरे बनवणे व इतर कामं करू लागले. फुलांशी निगडीत माळी कामामुळेच त्यांना ‘फुले’ ही ओळख मिळाली होती. 
  • ज्योतिबा यांनी मुख्यतः महिला आणि विधवांच्या कल्याणासाठी कार्य केलं. स्त्रियांचा समाजातील दर्जा वाढण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी ज्योतिबांनी 1848 साली शाळा सुरू केली. देशातली अशा प्रकारची ही पहिली शाळा होती. 
  • मुलींना शिकवण्यासाठी जेव्हा योग्य शिक्षिका मिळाली नाही तेव्हा त्यांनी आपल्या बायको सावित्रीबाई फुलेंना या कामायोग्य बनवलं.
  • उच्च वर्गातील लोकांनी सुरूवातीपासूनच त्यांच्या कामात अडसर आणण्याचा प्रयत्न केला. पण असं करूनही जेव्हा ज्योतिबा फुले बधले नाहीत तेव्हा त्यांनी ज्योतिबांच्या वडिलांवर दबाव आणला. ज्यामुळे ज्योतिबा आणि त्यांच्या पत्नीला बेघर व्हावे लागले. यामुळे ज्योतिबांचं समाजकार्य काही काळासाठी थांबल खरं पण लवकरच त्यांनी एका पाठोपाठ एख मुलींसाठी तीन शाळा सुरू केल्या. 
  • दलितांना आणि निर्बल वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबा यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 
  • ज्योतिबाचं समाजकार्य पाहून 1888 साली त्यांना मुंबईतील एका विशाल सभेत ‘महात्मा’ ही उपाधी बहाल करण्यात आली. 
  • ज्योतिबा यांनी ब्राम्हण-पुरोहितांशिवाय विवाहसंस्कारांना आरंभ केला आणि यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचीही परवानगी मिळवली. ते बालविवाहाचे विरोधक तर विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. 
  • आपल्या जीवनकाळात त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, शेतकर्‍यांचा आसूड, गुलामगिरी, इशारा, सार्वजनिक सत्य धर्म, दीनबंधू, तृतीय रत्न इ. पुस्तकांचा समावेश आहे. 
  • महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेने केलेल्या संघर्षामुळे सरकारला एग्रीकल्चर एक्ट पास करावा लागला. ब्रिटीश सरकारद्वारे 1883 साली ज्योतिबा फुले यांना स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्याबद्दल ‘स्त्री शिक्षणाचे आद्यजनक’ म्हणून गौरविण्यात आले होते. 
  • सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी वंचित समाजाच्या विकास आणि प्रतिष्ठेसाठी जो मार्ग तब्बल 146 वर्षांपूर्वी दाखविला होता. तो सामाजिक न्यायाच्या संदर्भात आजही तितकाच महत्त्वपूर्ण आणि प्रासंगिक आहे. 
31 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT