ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
कुटुंबातील भांडणे

घरातल्या सततच्या भांडणाने हैराण आहात, मग हे नक्की करा

 घर म्हटलं की, घरात भांड्याला भांडं आपटणारच. पण काहींच्या घरात भांडणं ही अगदी रोजच्या रोज ठरलेली असतात. म्हणजे विषय काहीही असू दे. कुटुंबात खूप जणांना जास्त राग, रुसवा खूप असतो. अशा व्यक्तींना भांडणातून बाहेर काढणे खूपच जास्त कठीण असते. कुटुंब एक असले तरी अनेकदा एकमेकांचे स्वभाव वेगळे असल्यामुळे क्षुल्लक कारणांवरुन सुरु होणारी भांडण मोठी होताना तुम्हीही अनेकदा पाहिली असतील. एखाद्या घरात मुलं लहान असे पर्यंत पालकांचे ऐकतात. थोडी मोठी झाली, ते ऐकणे बंद होते. अशावेळीही भांडण उद्भवतात. भांडणाची कारणं कोणतीही असतील पण ती योग्य वेळी मिटवता आली नाही तर मात्र घरात एक नकारात्मक उर्जा निर्माण होते. ही नकारात्मकता घरात अधिक काळासाठी राहिली की, प्रगतीच्या वाटा कमी होतात. तुम्हालाही असे वाटत असेल की, भांडणाला 50 टक्के कारणीभूत मी आहे तर एकदा वाचा.

आपल्याशिवाय इतरांना खाली लेखणे थांबवा

आपल्या आयुष्यात आपल्या मेहनतीवर जे हवं ते मिळालं की, त्याहून अधिक आनंद नसतो. पण हा आनंद गर्वात बदलला की, त्याचा त्रास अधिक होतो. घरात एक तरी व्यक्ती अशी असते जी कधीच कोणाचं ऐकत नाही तिला फक्त आपल्याच गोष्टी खऱ्या वाटतात. इतरांनी कितीही काही सांगितले तरी देखील त्यांना त्या गोष्टी फारच क्षुल्लक वाटतात. जर तुमच्यातील हा स्वभाव सतत डोक वर काढत असेल तर तुमच्यासोबत घरातल्यांचे कधीच जुळू शकत नाही. 

उदा. एखादे काम हाती घेताना बायको किंवा आईला सतत तुला काय येतं असं म्हणून तुम्ही त्यांना कमी लेखत असाल तर अशाने तुमची चिडचिड तर वाढतेच. शिवाय दुसऱ्यांना शह देण्याकडेच तुमचे लक्ष लागते. असे वागणे तुमच्या प्रगतीला मारक ठरत असते. 

भलत्यात विषयावरुन वाद टाळा

अनेकदा घरात वाद हे त्या घरातील व्यक्तींना सोडून तिसऱ्याच व्यक्तींमुळे होत असतात. हे वाद म्हणजे कारण नसताना केलेले वाद असतात. घराचा उंबरा ओलांडून घरात आल्यानंतर बाहेरच्या व्यक्ती आणि त्यांची नकारात्मक उर्जा घरात अजिबात आणू नये या गोष्टींना मुळातच घरात थारा देता कामा नये. जर तुम्हीही कोणत्या तिऱ्हाईत व्यक्तीसाठी आपल्या घरात वाद करत असाल तर अशावेळी संशय, जोडीदाराबद्दल राग आणि अविश्वास निर्माण होतो. त्याचा परिणाम आपसुकच भांडणात होतो. 

ADVERTISEMENT

उदा. खूप जणांना सवय असते. एखाद्या बाहेरच्या व्यक्तींची सतत तारीफ करण्याची. पण कधी कधी तुम्हाला कोणासमोर आणि कितीवेळासाठी तारीफ करायला हवी याचे भान असायला हवे. याचा तुम्हाला विसर पडला तर भलत्याच विषयावरुन तुमच्यात वाद होणे स्वाभाविक आहे.

कुटुंबाला वेळ द्या

भांडणांना अनेकदा कारण हे वेळ न देणे असते. तुम्हाला खरंच वेळ नसेल आणि कामाचा लोड असेल त्यावेळी तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकते. पण काही जणांना वेळ नाही याची नायरी लावायची सवय झालेली असते. सतत नाही म्हणणे आणि वेळ न देणे हे तुमच्या घरातील तुमची किंमत हळुहळू कमी करत असतात. त्यामुळे कुटुंबाला वेळ द्यायला शिका. वेळ द्याल तर तुम्हाला वेळ मिळेल हे लक्षात असू द्या. 

उदा. खूप जणांना घरातल्या लोकांसोबत बाहेर जाण्याचा कंटाळा असतो. पण फ्रेंड, कलिगसोबत ते आपला बराच वेळ घालवतात. त्यांना कुटुंबाला वेळ देण्याची संकल्पनाही पटत नाही. त्यामुळे घरात वादजन्य परिस्थिती निर्माण होते. 

एकूणच घरात भांडण होण्यासाठी आपण स्वत: जबाबदार असतो. याचे भान ठेवा घरात सकारात्म उर्जा आणण्यासाठी थोडासा बदल करा.

ADVERTISEMENT
02 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT