ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
famous-food-of-mumbai-everyone-should-taste

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध पदार्थ, जे इथे आल्यावर खायलाच हवेत

मुंबईचे नाव घेतले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गर्दी, कायम भरलेली ट्रेन आणि मुंबईतील खाण्याचे पदार्थ. मुंबईमध्ये कधीच कोणी उपाशी राहात नाही असं म्हणतात. इथे येणारा प्रत्येक माणूस आपलं पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करतच असतो. मुंबईमधील असे काही पदार्थ आहेत, ज्याचा स्वाद इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही. मुंबईत आल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध पदार्थ खायलाच हवेत. मुंबईमध्ये पदार्थांची रेचचेल असते. तुम्हाला आम्ही यापैकी काही पदार्थांची नावं सांगतो जे तुम्ही मुंबईत आल्यानंतर खायलाच हवेत. 

बन मस्का (Bun Maska)

Instagram – Bun Maska

बन मस्का हा मुंबईमधील खाण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक अशा बेकरी आहेत, जिथे सकाळी बन मस्का खाणारे अनेक लोकं आहेत. बन मस्का हा असा पदार्थ आहे जिथे बनपावाला मस्का लावण्यात येतो आणि हा बनमस्का अत्यंत मऊ असतो. याशिवाय या बनमस्काचा स्वाद वाढविण्यासाठी अप्रतिम असा इराणी चहा मागविला जातो. मुंबईत आल्यानंतर इराणी चहा आणि बनमस्काचा स्वाद घेतला नाही तर तुमची ट्रीप नक्कीच अर्धवट राहील. 

बन मस्का मिळण्याची प्रसिद्ध ठिकाण – कयानी बेकरी, धोबी तलाव

वडा पाव (Vada Pav)

Instagram – Vada Pav

वडापाव आणि मुंबई हे समीकरणच आहे. मुंबईत ठिकठिकाणी वडापाव मिळतो. वडापाव मिळण्याची अनेक प्रसिद्ध ठिकाणंही आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वडापावची चवही वेगळी आहे. चविष्ट असा वडापाव ही मुंबईची ओळख आहे. वडापावचा स्वाद अधिक चांगला करण्यासाठी हिरवी आणि गोड चटणीचाही वापर करतात. 1966 मध्ये अशोक वैद्य या व्यक्तीने वडापावचा शोध लावला आणि दादरला पहिला वडापावचा स्टॉलही या व्यक्तीने लावला होता. 
वडापाव मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण – आराम वडापाव, सीएसटी समोर

ADVERTISEMENT

चायनीज भेळ (Chinese Bhel)

Instagram – Chinese Bhel

चायनीज भेळदेखील मुंबईतील प्रसिद्ध पदार्थ आहे. तुम्ही मुंबईचे नसाल तर तुम्हाला हे नाव नक्कीच थोडं विचित्र वाटेल. पण हा पदार्थ म्हणजे काही भाजी आणि नूडल्स, मसाल्यांचे मिश्रण असते. चायनीज भेळ हा पदार्थ मुंबईत सर्वात पहिले तयार झाला. चायनीज भेळमधील नूडल्स तळल्या जातात आणि त्यात कांदा, मिरची, टॉमेटो आणि शेजवान सॉस घालून तयार करण्यात येते. अत्यंत चटपटीत असणारी ही भेळ मुंबईत आल्यानंतर ट्राय करायलाच हवी. 

चायनीज भेळ मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण – चर्चगेट सबवे

फ्रँकी (Frankie)

Instagram – Frankie

तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स नक्कीच खाल्ले असतील. पण मुंबईतील फ्रँकी ही सर्वात भारी असं म्हटलं जातं. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीत फ्रँकी मिळते. तर यामध्ये अनेक पद्धतीचे आणि चवीचे फ्रँकी तयार करण्यात येतात. प्रसिद्ध क्रिकेटर फ्रँक वॉरेलच्या नावावर या पदार्थाचे नाव ठेवण्यात आले आहे. कधीही मुंबईत कमी पैशात भूक भागवायची असेल तर तुम्हाला फ्रँकी कमी पैशात पण अधिक चवीचा पदार्थ असा खायला मिळतो. एक फ्रँकी खाऊन तुमचे पोट भरते. यामध्ये बटाट्याची भाजी, मसाले आणि मटण, चिकन याचा समावेश असतो. 

फ्रँकी मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण – टिब्स, दादर शिवाजी पार्क 

ADVERTISEMENT

पाव भाजी (Pav Bhaji)

Instagram – Pav Bhaji

वडापाव नंतर सर्वाधिक मुंबईत खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पाव भाजी. टॉमेटो, कांदा, बटाटा, मटारचे दाणे अशा अनेक भाज्या आणि पावभाजीचा चविष्ट मसाला घालून ही भाजी तयार करण्यात येते. यावर बटर अर्थात मस्काचा मारा करण्यात येतो. पावही बटरमध्ये भाजण्यात येतात. तर कांदा टॉमेटो मसाल्यावर परतून पावभाजी खाण्याची मजा काही औरच आहे. तर मुंबईत गाडीवरील पावभाजी खाण्यात एक वेगळीच मजा आहे. मुंबईच्या नाईट लाईफमध्ये अनेक जण पावभाजीचा स्वाद घेताना दिसतात. 

पावभाजी मिळण्याची प्रसिद्ध ठिकाण – भुलेश्वर खाऊ गल्ली, घाटकोपर खाऊ गल्ली

बॉम्बे सँडविच 

Instagram – Bombay Sandwitch

सँडविच हेदेखील मुंबईतील सर्वात प्रसिद्ध खाणे आहे. बॉम्बे सँडविचमध्ये काकडी, बटाटा, टॉमेटो, कांदा, बीट, सिमला मिरची, मस्का, ब्रेड, चटणी याचा मस्त एकत्रित स्वाद असतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही यामध्ये कच्च्या भाज्यांचा समावेश करू शकता. याशिवाय तुम्ही साध्या सँडविचसह हे सँडविच टोस्ट करूनही खाऊ शकता. 

बॉम्बे सँडविच मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण – झेवियर्स कॉलेज, धोबी तलाव

ADVERTISEMENT

तुम्हालादेखील मुंबईत आल्यानंतर हे पदार्थ नक्कीच ट्राय करायला हवेत. तर तुम्ही मुंबईतील असाल आणि या ठिकाणी गेला नसलात तर आवर्जून भेट द्यायला हवी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT