आपल्याकडे टीव्ही असो अथवा चित्रपट, कोणत्याही अभिनेता वा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सगळयांनाच जाणून घ्यायचे असते. विशेषतः त्यांचे लग्न आणि त्यांना होणारी मुलं याबद्दल. आता पुन्हा एकदा ‘नागिन’फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी गरोदर असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे आणि याचं निमित्त ठरलं आहे ते तिचा पती रोहित रेड्डीने शेअर केलेला व्हिडिओ. अनिता आणि रोहितच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत आणि तिच्याबरोबरच्या जवळजवळ सगळ्यांनाच मुलं झाली असून मागच्या वर्षीच्या ‘नच बलिये’मध्येही अनिताने आपल्याला बाळ हवं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून आता या चर्चांना सुरूवात झाली आहे. दोघांकडूनही अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही त्यांचे चाहते मात्र अनिताच्या चेहऱ्यावरील चमक बघून ती गरोदर असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.
या’ कपलमधील दुरावा होतोय कमी, सोशल मीडियावर एकमेकांना रिप्लाय
व्हिडिओ बघून अनिता गरोदर असल्याचा अंदाज
रोहित रेड्डीने एक अनिताबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित एक मॅजिक ट्रिक दाखवत आहे. अनिताने यामध्ये जो पंजाबी सूट घातला आहे तो अतिशय ढगळ असून ती गरोदर असल्याकडेच इशारा करत आहे. या व्हिडिओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘हे थोडे ढगळ कपडे आहेत असं जरी म्हटलं तरी माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अनिता गरोदर आहे.’ तर दुसऱ्या चाहत्यांने म्हटलं आहे, ‘अनिता हसनंदानी गरोदर असल्यासारखे वाटते आहे,’ तर एकाने शेअर केले की, ‘अनिता ताईच्या चेहऱ्यावरील तेज ती गरोदर असल्याचे दिसून येत आहे.’ बऱ्याच जणांना अनिता गरोदर असल्याचे वाटत आहे. इतकंच नाही तर याआधीही अनिता आणि रोहितने ‘गुड न्यूज’ द्यावी असे अनेकांना वाटत होते. तर रोहितचं अनितावर असलेलं प्रेमही नेहमी दिसून येतं. अनिता आणि रोहित एकमेकांना खूप वर्ष ओळखत होते आणि नंतर त्यांनी लग्न केलं. मात्र आजही ते एखाद्या घट्ट मित्रमैत्रिणींप्रमाणेच वावरतात. त्यामुळे लवकरच या दोघांनी गुड न्यूज द्यावी असंही त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.
या बॅक डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख
लग्नाला झाली अनेक वर्ष
अनिता विशाखा खन्नाच्या भूमिकेत मागच्यावेळी नागिन या मालिकेत दिसली होती. तर नच बलियेमध्येही तिने मागच्या वर्षी रोहितबरोबर सहभाग घेतला होता. त्यांना त्यावेळी परीक्षकांकडूनही खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनिताने याआधी अनेक मालिका केल्या असून एकता कपूरच्या बऱ्याच मालिकांमधून अनिता दिसली आहे. ‘ये है मोहब्बतें’मधील तिची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. नकारात्मक भूमिकेत अनिताने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. तर आता सध्या अनिता कोणत्याही मालिकेत नाहीये. त्यामुळे ती खरंच गरोदर असल्याचे तिच्या चाहत्यांना वाटत आहे आणि ही गुड न्यूज कधी एकदा अधिकृतरित्या शेअर करण्यात येते याचीही चाहते सध्या वाटत पाहत आहेत. आता अनिता आणि रोहितच यावर अधिक प्रकाश टाकू शकतात. मात्र अनिता गरोदर असेल तर तिच्या मित्रमैत्रिणींनाही तितकाच आनंद होईल यात काही दुमत नाही. रोहित आणि अनिता हे टीव्ही इंडस्ट्रीतील ‘Most Loved Couple’ असल्याचे नेहमीच म्हटले जाते.
गरजू विद्यार्थ्यांना सोनु सूदचा मदतीचा हात,ऑनलाईन शिक्षणासाठी वाटले स्मार्टफोन
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा