सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण आपापल्या परीने गरजूंना मदत करत आहे. त्याशिवाय प्राण्यांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रस्यांवर फिरणाऱ्या प्राण्यांना सध्या अनेक त्रासाचाही सामना करावा लागत आहे. त्यांना उपाशीपोटी राहावं लागत आहे. पण यांच्यासाठी आता मोठं पाऊल उचललं आहे ते दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराहा खानच्या मुलीने. फाराहा खानची मुलगी अन्याने यासाठी एक वेगळा पर्याय शोधून काढला आहे. ती लोकांंच्या पाळीव प्राण्यांचे स्केच बनवून ते सध्या 1 हजार रूपयांना विकत आहे. यामधून मिळणाऱ्या पैशातून ती या प्राण्यांसाठी मदत करणाऱ्या संस्थांना दान देणार आहे. अन्या केवळ 12 वर्षांची असून तिने हे उचललेलं पाऊल खूपच मोठं आहे. याबाबत खुद्द फराहा खानने सोशल मीडियावरून सांगितलं आहे.
फराहा खानने केले स्पष्ट
अन्याने घेतलेल्या या निर्णयाबद्दल स्वतः फराहा खानने आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहे. फराहा खानने लिहिलं आहे की, ‘माझी मुलगी अन्या पाळीव प्राण्यांचे स्केच बनवून 1 हजार रूपयांमध्ये विकणार आहे आणि तिने हा निर्णय घेतला आहे. यातून मिळणारी सर्व उत्पन्न हे भटक्या आणि बेघर असणाऱ्या प्राण्यांच्या खर्चासाठी वापरण्यात येतील. जास्त नाही ती आता केवळ 12 वर्षांची आहे. अग्रीम ऑर्डर्ससाठी तब्बू, राजीव मसंद, आरती शेट्टी, शाजिया गोवारीकर यांचे धन्यवाद’. अन्याला आतापर्यंत आपण फराहाच्या सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओमध्येही पाहिलं आहे. त्याशिवाय फराहा खानचे अनेक व्हिडिओ अन्या रेकॉर्डही करत असते. ती अतिशय फ्लेक्झिबल असून तिचे अनेक बॅले व्हिडिओदेखील फराहा खान पोस्ट करत असते. फराहाच्या तिन्ही मुलांपैकी अन्याचे व्हिडिओ जास्त असतात.
शाहीद कपूरवर चिडली मीरा राजपूत
आधीच मिळाल्या ऑर्डर्स
फराहा खानची ही पोस्ट वाचल्यानंतर अन्याची सगळ्यांनी प्रशंसा केल आहे. तिच्या चाहत्यांनी तर अभिनंदनाचा वर्षावही केला. तर दुसऱ्या बाजूला अनेक सेलिब्रिटींना तिला अॅडव्हान्स ऑर्डरही दिली आहे. अॅडव्हान्स ऑर्डर देणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये सानिया मिर्झा, सोनाली बेंद्रे, मनिष पॉल, आदिती राव हैद्री, झोया अख्तर, सोनी सूद आणि ताहिरा कश्यप यांचा समावेश आहे. तर तब्बूने आधीच ऑर्डर दिली असल्यामुळे तिने ‘चिन्नू की चांदी’ अशीही कमेंट केली आहे.
वडिलांच्या आठवणीने भावूक झाला सलमान, गेल्या तीन आठवड्यांपासून झाली नाही भेट
आठवड्यापूर्वीच पिगी बँकचे सर्व पैसे अन्याने केले होते दान
आठवड्याभरापूर्वीच अन्याने आपल्या पिगी बँकेतील सर्व पैसे स्ट्रीट डॉग्ज अर्थात रस्त्यावरील कुत्र्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी दान केले होते. या पैशांमुळे 30 कुत्र्यांच्या आठवड्याच्या खाण्याचा प्रश्न सुटला होता. हेसुद्धा फराहा खानने सोशल मीडियावर मदत करणाऱ्यांना धन्यवाद करणारा मेसेज केला तेव्हा सर्वांना माहिती झाले होते. तसंच अन्याच्या बाबतीत ती मोठी होऊन अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट होणार असंच फराहा खानला वाटतं. तिने तसं बोलूनही दाखवलं आहे. फराहाला तीन मुलं आहेत पण यापैकी अन्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टी करत असताना दिसते. तिच्या दोन्ही मुली या अतिशय फ्लेक्झिबल असून दोघीही बॅले डान्सही शिकतात. तर अन्याला स्केचिंगचीही आवड आहे. त्यामुळेच तिने आपल्या या आवडीचा वापर करून मदत करायचा निर्णय इतक्या लहान वयात घेतला आहे. तिच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सलमान, शक्तिमानसारखे कपडे घालून तुम्ही काढलेत का तुमचे फोटो
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.