ADVERTISEMENT
home / मनोरंजन
शाक्या अख्तर

फरहानची टीनएज मुलगी आहे खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

 कलाकारांच्या मुलींकडे अनेकांचे लक्ष असते. त्या कशा दिसतात कशा राहतात?  त्यांची स्टाईल स्टेटमेंट काय?  हे पाहायला अनेकांना आवडते. आज आपण ज्या कलाकाराच्या मुलीबद्दल बोलत आहोत तो आताच लग्नबंधनात अडकलेला फरहान अख्तर (Farhan Akhtar) आहे. फरहानला पूर्वाश्रमीच्या पत्नीपासून एक मुलगी असून तिचाच ग्लॅमरस अंदाज सध्या सगळ्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.  फरहानची मुलगी इतकी मोठी असेल असा विश्वास खरंतरं पहिल्यांदा कोणालाच बसत नाहीए. पण ही फरहानचीच मुलगी असून ती नेमकं काय करते ते घेऊया जाणून 

कोण आहे फरहानची मुलगी?

फरहानची मुलगी शाक्या

फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) मुलीचे नाव शाक्या अख्तर (Shakya Akhtar) असे असून ती सध्या 22 वर्षांंची आहे. इतर सेलिब किड प्रमाणे ती सतत लाईम लाईटपासून फारच दूर आहे. पण लाईमलाईटपासून दूर असलेल्या या शाक्याच्या फोटोंनी सध्या धुमाकूळ घातला आहे. शाक्या कोण हे आतापर्यंत कोणाला माहीत नसेल. पण फरहान खानने (Farhan Akhtar) तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा फोटो टाकल्यामुळे अनेकांच्या नजरा या तिच्याकडे वळल्या. ही सुंदर मुलगी कोण? याचा शोध घेतला जाऊ लागला त्यावेळी हे कळाले की, अन्य कोणी नसून त्याची मुलगी आहे. फरहानची पहिली पत्नी अधुना आणि तिची ही मुलगी आहे. शाक्याने सोळल मीडियावर आपली कोणतीही ओळख दाखवलेली नाही. तिने कुठेही तिच्या आडनावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळेच ती इतर कोणाप्रमाणेही सोशल मीडियावरील क्रिएटिव्ह असावी हे वाटणे फारच साहजिक आहे. 

आहे खूपच स्टायलिश

शाक्याचा अर्थ हा बौद्ध धर्माशी निगडीत आहे. भगवान बौद्धांची उत्पत्ती जिथे झाली होती त्या झाडाला शाक्या असे म्हणतात. त्यावरुच तिचे हे नाव ठेवण्यात आले असावे. तिचे नाव जितके स्टायलिश आहे तितकीच ती देखील स्टायलिश आहे असे दिसून येते. तिची एकूणच इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहिल्यानंतर तिला मुक्त आणि आपल्या स्टाईलमध्ये राहायला आवडते असे दिसते. शाक्या ही खूप प्रयोगशील आहे असे दिसते. कारण तिच्या कपड्यांपासून ते तिच्या वेगवेगळ्या स्टाईलला पाहता असे दिसून येते. इतकेच नाही तर तिच्या केसांची स्टाईलही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्टार्सना पाहून केली आहे असे दिसून येते. त्यामुळेच तिच्या नव्या फोटोंची चर्चा सध्या सगळीकडे होऊ लागली आहे. 

फरहान (Farhan Akhtar) लग्नामुळे चर्चेत

फरहान हा त्याच्या चित्रपटांसाठी नाही तर सध्या तो त्याच्या लव्ह लाईफमुळे अधिक प्रसिद्ध आहे. मधल्या काळात तो श्रद्धा कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. त्यांचे हे नाते श्रद्धाच्या घरातल्यांना अजिबात आवडत नव्हते. म्हणून हे नाते तोडण्यात आले. त्यानंतर फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकर आली. तिच्यासोबत त्याचे नाते अधिक काळ टिकले. इतकेच नाही तर त्यांनी या वर्षी अखेर लग्नही केले. त्यामुळे त्याची लव्ह लाईफ सगळीकडेच प्रसिद्ध झाली होती.  

ADVERTISEMENT

दरम्यान, फरहानला पहिल्या बायकोपासून दोन मुली आहेत. शशाक्याचा ग्लॅमरस अंदाज पाहता आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल असा अंदाज आहे तर त्याची दुसरी मुलगी अकीरा हिला पाहण्यासाठीही अनेक जण उत्सुक आहेत. 

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text