फरहान अख्तर कधी शिबानी दांडेकरशी लग्न करेल अशी उत्सुकता सगळ्यांना असताना फरहान- शिबानी विवाहबंधनात अडकले. अनेक चाहत्यांना आनंद झाला. त्यांच्या या आनंदोत्सवात अनेक जण सहभागी झाले. अनेकांनी या नव दांम्पत्याला शुभेच्छा देखील शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांचे लग्न चांगलेच गाजले. पण आता एका नव्या पोस्टने हे लग्न पुन्हा चर्चेत येणार आहे. फरहानची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानी ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. पण थांबा… ती नुसती ट्रोल झाली नाही तर तिने तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. सोबत एक चांगला निर्णय देखील घेतला आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक
सरळ ब्लॉक करणार…
सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे कधी कोणाला ट्रोल केले जाईल आणि कधी कोणाला प्रसिद्धी मिळेल काहीही सांगता येत नाही. अधुना भाबानी शिबानी- फरहानच्या लग्नादरम्यान बरीच ट्रोल झाली. तिला अनेक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. खूप जणांनी तिला या फरहानच्या या नव्या नात्यावरुन अनेक टोमणे देखील दिेले. पण तिने गप्प न राहता या ट्रोलर्सना उत्तर देण्याचा निर्णय घेतला. तिने एक मस्त पोस्ट शेअर करत तिला वाईट कमेंट करणाऱ्यांना सांगून टाकले की, या पुढे चांगले बोलता येत नसेल तर अशांना सरळ ब्लॉक करण्यात येईल. काही सकारात्मक करता येत नसेल तर ब्लॉक करणेच उत्तम अशा स्वरुपातील ही पोस्ट असून तिला अनेकांना पाठिंबा देखील दिला आहे. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तिने या पोस्ट खाली #liveandletlive असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
अधुना आहे प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट
अधुना भाबानी हिची ओळख फरहान अख्तरची बायको अशी नाही. तर ती एक प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आहे. लंडनमध्ये वाढलेली अधुना बी ब्लंट नावाची सलोन फ्रांचायसी चालवते जी जगभरात प्रसिद्ध आहे. 2000 साली अधुना आणि फरहानचा विवाह झाला. 2016 साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोळा वर्षांचा संसार केल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुली आहेत. या लग्नावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसताना अनेक जण तिला टार्गेट करत होती. ज्यामुळे अधुना संतप्त झाली असावी आणि तिने अखेर ही पोस्ट करण्याचा निर्णय घेतला असावा
फरहान- शिबानीचा असा पार पडला लग्नसोहळा
फेब्रुवारी महिन्यात अनेक सेलिब्रिटींची लग्न पार पडली. यामध्ये सगळ्यात धक्का देणारे लग्न होते ते म्हणजे शिबानी आणि फरहानचे लग्न. त्यांचे फोटो बाहेर आल्यानंतर सगळ्यांनाच आनंदाचा धक्का बसला. हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे ते कधी लग्न करणार असे अनेकांना झाले होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली. एकदम हटके असे त्यांचे लग्न पार पडले. शिबानीने लग्नात लाल रंगाचा गाऊन घातला होता. तर फरहानने काळ्या रंगाचा सूट. लग्नात जोडी एकदम झक्कास दिसत होती. हे लग्न फारच सिक्रेट असे ठेवण्यात आले होते. यासाठी कोणालाही आमंत्रण करण्यात आले नव्हते. लग्न हे फारच घरच्या मंडळीच्या उपस्थितीत पार पडलेले दिसत आहे. 4 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी लग्न केले याचा आनंद अनेकांना झाला आहे.
पण ट्रोलर्सनी अशा प्रकारे अधुनाला टार्गेट करणे देखील अजिबात चांगले नाही. ज्याचे उत्तर अधुनाला अखेर द्यावेच लागले.